पोस्ट्स

कथाकथनाची दखल

इमेज
http://dhunt.in/3i8IW?ss=cp&s=pa

तू असचं छान लाजत राहवं

इमेज
तुझे चांदण पाऊल या माझ्या प्रेम कविता संग्रहातील या कविता खास माझ्याच आवाजात. नक्की ऐका

युज अॅन्ड थ्रो.

इमेज
 आबाला बसस्टॉपवर सोडयासाठी आलो होतो. बसस्टॉपवर फार गर्दी होती. नुसती चेंगराचेंगरी... तसल्या गर्दीत शाम्या भेटला. शाम्या काय आमचा क्लासमेट बिट नाही.तेव्ह. आणि आमचा दादा...म्हणजे चुलता.एका वर्गात होते पण त्याला अख्खं गावचं शाम्या म्हणतं. लहान थोर सारेचं. शाम्या नावचं पडलं त्याचं .त्याचा ही कधी धताबाला राग आला नाई. समदचं म्हणतेय गडीच लयं सरळ.आपलं काम जानं नि आपून जानं. तो भेटला म्हणजी.. जरा गडी तारांबळीतच असावा.केस वाढलेले...दाढी वाढलेली...काळी पांढरी...खूटं लयं विद्रूप दिसतं होती. बरं कपडे धड नव्हतं त्याची. बेसूर दिसतं होता. पार कंबरात वाकून नमस्कार केला. अगदी मुजरा केल्यावाणी. "राम राम सायब..." "काय शामा काका ....कुणीकडे इकडं.?"  "आता लयं ताप झालायं. तुम्हाला नाही का माहित?"  "...नाय बुवा.काय झालय?"  "तेच..ते..इलेक्शनचा राडा."  "इलेकशनचा राडा...कसला...?"  "निल्या टाकलायना आत ..." "आत...निल्या..?"  "पोलसाडचं जिप्पडचं आल्लतं.उचल्लं पोरगं त्यांनी रातचंच." "पण कमून...?" "...

लोकशाही झिंदाबाद

इमेज
आता आताचं ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्या.गाव गावचं पुढारी निवडण्यात आलं.या गाव पातळीवरच्या निवडणूकात भी भारी रंगत आली.नात्या गोत्यात,पावण्या -रावळयातचं फाईटी लागल्या.सख्या सासू-सुना आमने सामने आल्या.भावा भावातल्या दुश्मन्या टोकाला गेल्या.बाप-लेक एकमेकांची उणी धुणी काढु लागले.बाधांवरल्या दुशमन्या गावाचे मोठे प्रश्न झाले.गावातल्या पोरा पोरीची लफडे,मोठयाला माणसाची जुगाड प्रचाराची मुद्दे झाले.जातीजातीचे गटाव झाले.भावकीचे गटाव झाले.तालुक्यातील,परिसरातली नेते मंडळी आपआपला पाऊर वाढण्यासठी गावागावात चकरा मारू लागले.डावपेच रंगलं.कुणी खुटया हाणू लागलं.कुणी गुंडया मनात धरू लागलं.सारं रोडची धाबे फुल्लं चल्लु लागली.पंग झालेली माणसं प्रचार करू लागली.इरोधातल्याची आयमाय उजारू लागले.पापंलेटी,बॅनरं झळकू लागले.गावातली हुशार माणसं बेरजा करू लागले.एक्झीट पोल सांगू लागले.कशाच्या ही वावडया उठया लागल्या.साध्या साध्या गोष्टीवर माणसं हमरी तुमरी येऊ लागले. वातावरण तंग झाले.कवा काडी पडणं कवा भडका उडलं.याचा नेम राहीला नवहता.रातच्या बैठका रंगू लागक्या.एकदंरीत वातावरण चांगलचं तापलं होतं. अशाच एका...

बळीराजा, कर्जमुक्ती आणि कर्जमाफी वगैरे

इमेज
कथा आणि व्यथा बळीराजा आणि कर्जमुक्ती , कर्जमाफी वैगरे.....!! चालता फिरता रामू आण्णा आजारी पडला.ताप आला .काय केल्या ताप उतरेना .म्हतारी शांता काकू घाबरून गेली.आता सा-याला कळलं होतं म्हतार हलवायला पाहिजे .रामूआण्णाचे दोन लेक नोकरीला पुण्याला होते. कोणी न्याचं दवाखान्यात ? शांता काकून फोन करून कळवलं .पण दोघ ही काही काही कारणं सांगायची . "सुट्टी नाही ",धाकटा म्हणायचा. थोरला म्हणायचा," धाकटा आला का ? " धाकटा म्हणायचा ." त्यानं जायला पाहीजे .मला रजा नाही .मी फार केलं त्यांनी सेवा केली पाहिजे ." रामा आाण्णाला वाटायचं पोरं येतील दवाखान्यात नेतील .पण पोर कसली येतत? म्हतारीचा जीव खालीवर होऊ लागला. गावातल्या पुढा-यांनी फोन केला . आरं बापा कडं पहा जरा .तू तू मी मी नका करू . सारं विसरून जा" पण छया...छया...!! काही फरक पडला नाही .म्हतारं बेशुध्द झालं . शेवटी दोघ आले . थोरला: "दादा मी आलो .उठ बर.मी केळ आणलीत चिक्कू आणलेत .खा बर थोडं " धाकटा: "दादा बघ बदाम आणलेत .बिस्किट आणलीत बघ कपडे आणलीत" थोरला: "पाणी चांगल शुध्द प्यायला...

गरिबी अाणि जिद्द

इमेज
कथा आणि व्यथा गरिबी आणि जिद्द यवतमाळ शहरात सहज भरकटत होतो. सकाळची वेळ असून ही उन्हं चांगलचं चटकत होतं. रसत्यावर गर्दी होती. खरं तर आम्ही चहाच्या शोधात होतोत. फुटपाथवर अनेक टप-या थाटलेल्या होत्या. त्यात चहाच्या टप-या ही होत्या.पण  त्यात स्वच्छ तर एक ही नव्हती, पॉश पण  नव्हती. अस्वच्छ होत्या. किळसवाण्या होत्या. त्यावर ही लोकांची झुंबड उडालेली होती.आम्हाला पाॉश हॉटेल हवं होत.बरीच पायपीट झाल्यानंतर ही तिथं चहा जाऊन प्यावं असं हॉटेल सापडलं नाही. एका टपरीजवळ थांबलो.  आम्ही थांबल्याबरोबर ती सारीचं माणसं आमच्याकडं पाहू लागली.कारण ही तसचं होतं.आम्ही सारे नटून थटून आलो होतो. पुढी-या टाईप. एकदम पाॅश...आम्ही तिथचं बाकडयावर टेकलो. बाकडांनी आमचं कपडे मळू नाहीत म्हणून सावध बसलो. अल्लाद... " तीन चाय दे लवकर." मी आॅडर सोडली. तो हाॅटेलवाला पाण्याचा जग घेऊन आला. पलीकडं काही कागद पडले होते. काही खरकट सांडलं होतं.त्याच्या हातात जे ओलं फडकं होतं.त्यानं पुसून घेतलं. सापसूप करून घेतलं. "सायब पाणी...!!" मी आणि माझ्या मित्रांनी त्याच्याकडं पाहिलं.त्या नजरेत थोडी तुच्छता नि राग हो...

गुडमाॅर्नींग पथक (कथाकथन)

इमेज
गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी एका शिक्षकाची होणारी दमछाक.  .....व. शारदा काकूची जिद्द व प्रेरणेने गाव हागणदारमुक्तीसाठी सकारात्क होणारी भुमिका  .   (मराठवाडा साहित्यसंमेलब,अंबाजोगाई येथे प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेली कथा.परशुराम सोंडगे यांच्याच अावाजात)