पोस्ट्स

सावर रे..!

इमेज
ती उठली.खिडकी जवळ आली.पडदा मागे सारला.हळूच बाहेर ‍ डोकावली.बाहेर सारं सारं कसं शांत शांत होत.घरासमोरचा रस्ता.निपचीत पडलेल्या अजगरासारखा वाटला तिला.अकाशाचा विशाल कलश कलंडून चांदण जिथं तिथं विखूरल होतं. झांडाच्यापानापानांत.फुलाफुलांत.सृष्टीच्याकणाकणात.गच्चीवच्या रातराणीकडं तिचं लक्ष गेलं.ती तर चांदण्यात न्हाहूनच गेली होती.हलकसं वारं आलं. ते पहाटं वारचं.गारा अगांस झोंबला. तसं थोडसं तीनं अंग चोरलं.तिचं मोकळे केसं नकळतचं भुरं भूरले.भुरभूरते केस तिनं सावरले. तशी इतकीसी गरज नव्हती पण तिची ती स्टाईलच होती. हटकेच स्टाईल.तिची हीच तर स्टाईल तर अनेकांना पागल करून गेली होती. पागलच करत होती. झोंबत्या गा-यामुळे तिनं नकळत अंग चोरलं.शहारलेलं तिचंच अंग न्याहळणाचा मोह तिला आवरता आला नाही.आठवणीच असंख्यं फुलं तिला लगडून गेली. आज ती झोपूच शकली नव्हती. दुपारचा प्रसंग तिला जसाच तसाच आठवत गेला.आठवला कसला? ते चलचित्र नुसतं डोळया समोरून सरकत होतं. पश्चतापाच्या सूक्ष्मं सुईनं काळीज नुसतं टोकरलं जातं होत.समीरची तरी काय चूक होती? मुळात तसा नाहीच तो. पण आज नको तेच झालं.त्यानं ओढलं की तिचं त्याच्या मिठठीत...

चाफयाचं फूलं

इमेज
चाफ्याची फूलं सावल्या पार पायाखाली आल्या होत्या . सूर्य डोक्यावर आला होता तरी गारठा कमी होत नव्हता . वारा गारा घेऊन भणाभणा वाहत होता . हळूहळू सारी माणसं पांगत चालली होती . भरलेले घर रिका मं होऊ लागलं होतं . समोर दादाचा फोटो होता खूर्चीवर . हार घातलेला . शायनासरीत . आताचं उठून बोल तेलं असा . फुटू पाहीला की   नुसता   पोटात जाळ उठायचा . तेव्ह जाळ काळीज जाळीत पारवर डोक्यापर्यंत जायचा . हुंदका नुसता नरडयातचं आडकून बसायचा . वरचा श्वास वर . खालचा श्वास खाली व्हायचा . आता डोळं नाही पाझरतं . डोळयातलं पाणीच आटून गेलं आसलं . धा - बारा दिसं झालं की दादानी फाशी घेतलेली . कव्हरं डोळ तरी वाहतेल ? चाफ्याचं फुलं                     काल तेरावा झाला . आज गंगापूजन . त्या फोटूच्या पुढंचं बारकाली पोर जेवत होती . वश्या ही त्यातचं होता . त्याला काहीचं कळत नव्हतं . अजून साळात त्याचं नावच नव्हतं टाकलं . आवदा च साल टाकायचं ही नव्हतं . चुलतीची बारकी पोरगी … सीती ..! लयं गांधनमाशी . आगीचं घर चं ती. तिच्याच हा वाट जाय...

लोकशाहीवर बोलू काही…

इमेज
लोकशाहीवर बोलू काही… कर्नाटक विधानसभेचे निकाल लागले. लोकांनी सपष्टं कौल कुणालाच दिला नाही.त्यामुळे पेच निर्माण झाला.सरकार स्थापनेचे दावे प्रतीदावे झाले. नेहमी प्रमाणेच न्यूज चॅनलवर चर्चेचे एरडांची गु-हाळ रंगली.अनेक तज्ञ.विद्रवान लोक आपली मत मांडु लागली.विधानसभा कर्नाटकची निवडणूक नसून ती मोदी विरूध राहूल अशी आहे. असं भासवण्यात आलं.काँगेस व भजपा अशी ही निवडणूक झाली असं म्हणायला कुणी तयार नाही.दोन व्यक्तीची तुलना करण्यात आली. संसदीय लोकशाहीमध्ये व्यक्तीपेक्षा पक्षला महत्त्व आहे. बहूपक्षीय संसदीय लोकशाही आपण स्वीकारली आहे.त्यात या दोन राष्ट्रीय पक्षांच्या व्यक्तीमत्वाची तुलना का करावी? या निवडणूकीचं ‍विश्लेषण व्यक्तीकेंद्रीत का करावं? तशी अपरीहार्यता तरी आहे का?   आपण   सांसदीय व बहूपक्षीय लोकशाहीच्या चौकटीतच राहून आपल्याला विश्लेषण करता नाही येणारं का? विरोधी पक्षाची भूमीका घ्यायला तयार नाही.पक्षांना व त्या पक्षांच्या समर्थकांना आपल्या पक्षाकडेच सत्ता का हवी आसते? सत्ता हे कोणत्याचं पक्षाचं साध्य असू नाही पण दुदैवानं सा-याचं पक्षाचं साध्य सत्ता झाली आहे.हारणं व जिंकणं हे शब्...

जत्रातील प्रेमाची गाेष्ट

इमेज
पाराकं आरगन वाजल . बॅन्डवाल आलं . ते आलं की सलामी देत्यात . आरगनाचा मोठा आवाज सा - या गावात घूमू लागला . तशी बारकाली पोरं ... पोरी चींगाट पाराकं पळाली . मोठाली बरीचं माणसं तिथचं होती . कुणी रावश्याच्या दुकानाच्या दारात .. कुणीबुणी चावडीच्या दगडाला बूड टेकून बसलेली … आज गावची जत्रा . शेताभीतात कुठं जाता येतं ?   तिथचं टायमपास करीत बसलेली . चार पाच टोळभैरी पोरं भी व्हती . सांवताच्या घराला पाठ देउन बसलेली . पोरं कुठं नुसते गप बसत आसतेत व्हयं ? मोबाईल चिवडीत होती . बँन्डवाल्यानं सलामी दिली . आगोदर .. गणपतीची आरती . मग एक मस्तं गाणं .. वाजवल . त्यां च्या भो वती गर्दी जमा झाली आणि ते थांबले . सलामी झाली की ते पारावर टेकलं . आरगानाची गा डी ति थचं पारा म्होंरं सोडली होती . त्या गा डी भोवती पोरानी गराडा टाकला . तेवढयात आशुक्या व इलाश्या आलं . कुठं होतं नि कुठं नाय . गापकुणी बोळीतून आलं . डायरेक्ट बॅन्डवाल्या पाशीचं हजर झालं . दोन्ही हात वर करून लगेच आशुक्या म्हणाला ,” बजावं …. बजाव ” दोघ ही पंगाट झालेले . ” आताच सलामी झालीय मालक .” बँन्डवाल्या आत्म्यानं जरा आदबीनं त्यांना सांगितलं . ज...