पोस्ट्स

या खलनायकांच काय करायचं?

आज सकाळची गोष्ट.रस्त्यानं जात असताना एका काॅर्नरवर एक स्कूल बस थांबली होती.तो त्यांचा थांबा असावा.तिथं अनेक मुलं थांबली होती.त्या सोबत काहीच्या आया ही होत्या. पाॅश ड्रेस,शूज,टाय.स्कूलबॅग्जस्  पाठीवर ....आता सरकारानं किती ही दप्फतराच्या ओझ्याचं टेन्शन घेऊ दया .पालक आणि त्यंचे टिचर..हे मात्र गंभीर होत नाहीत .ते होणार पण नाहीत .दप्फतर हा  विषय फक्त मुलांशी संबधीत राहिलेला नाही .तो पालकांच्या आणि शाळांच्या प्रिस्टेजचा प्रश्न  झालेला  आहे. असो.त्य सोबत पुन्हा टिपिन बॅग्स ....त्या बाॅटल.... . . त्यात मुलांच्या घोळक्यात एक फारच लहान मुलगा होता.अडीच -तीन वर्षाचं मुलगा असेल तो..त्यला शाळेत जायचं नव्हतं.त्यानं अंदोलन पुकारल होतं.तो रडत होता. आरडत होता.तिथं कुणीचं त्याच दखल घेणार नव्हतं.ती घेतली ही जाणार नव्हती. आमच्या काळात आजी नावाच एक जबरदस्त सरकार असे.तिथं आपले कसले ही लाड पुरवले जायचं. नातवाला मारणं सोडा .साध धमकावनं ही शक्य नसायचं. आजी आजोबा आता घरातून हद्यपार झाले.त्यानं जी  बापाच्या पॅन्टीला मिठ्ठी मारली ते सोडत नव्हत. त्याच्या मम्मीला त्याचा फोटो काढयाचा असेल .ह...

पळस-धगधगती अग्नी फुले

इमेज
               पळस -धगधगती अग्नी फुले                      पळसं-धगधगती अग्नी फुले वक्षावरती तुझ्या एकदा मी असा रंग पाहिला होता. रानातल्या रान पळसाला तो कधीच सुचला नसता .      कुसूमाग्रज गावाकडं जाण्याचा योग आला . उन्हाळाचं दिवस होते . रा नं रानं भकास झालेली . दुष्काळां चं सावटं   गाव शिवा री पसरलेलं होतं . वर आग ओकणारा सूर्य . अख्ख्या शिवारात कुठं पाण्याचा थेबं नाही . रान रान रणणत्या उन्हात भाजतं होतं . दूरवर क्षितीजावर मृगजळाचं तळं घुसमुसतं होतं . तापलेल्या मातीतून चटके बसते होते.आता गाव बदलली . गावाची शहरं होऊ लागलीत. रान - वन ही बदलेले . शिवारं बदलं . सारं सारं बदलं आसलं तरी   भर उन्हाळयात भेटणारा पळसं मात्र अगदी पहिल्यासारखचं दिमाखत भेटला . पळसं . भर उन्हाळयात लाल फुलांची उधळणं करत तो बांधा बांधावर बहरला होता . नदीच्या तरी , टेकडीच्या कुशीत , डोंगराच्या दरीत द...

सावर रे..!

इमेज
ती उठली.खिडकी जवळ आली.पडदा मागे सारला.हळूच बाहेर ‍ डोकावली.बाहेर सारं सारं कसं शांत शांत होत.घरासमोरचा रस्ता.निपचीत पडलेल्या अजगरासारखा वाटला तिला.अकाशाचा विशाल कलश कलंडून चांदण जिथं तिथं विखूरल होतं. झांडाच्यापानापानांत.फुलाफुलांत.सृष्टीच्याकणाकणात.गच्चीवच्या रातराणीकडं तिचं लक्ष गेलं.ती तर चांदण्यात न्हाहूनच गेली होती.हलकसं वारं आलं. ते पहाटं वारचं.गारा अगांस झोंबला. तसं थोडसं तीनं अंग चोरलं.तिचं मोकळे केसं नकळतचं भुरं भूरले.भुरभूरते केस तिनं सावरले. तशी इतकीसी गरज नव्हती पण तिची ती स्टाईलच होती. हटकेच स्टाईल.तिची हीच तर स्टाईल तर अनेकांना पागल करून गेली होती. पागलच करत होती. झोंबत्या गा-यामुळे तिनं नकळत अंग चोरलं.शहारलेलं तिचंच अंग न्याहळणाचा मोह तिला आवरता आला नाही.आठवणीच असंख्यं फुलं तिला लगडून गेली. आज ती झोपूच शकली नव्हती. दुपारचा प्रसंग तिला जसाच तसाच आठवत गेला.आठवला कसला? ते चलचित्र नुसतं डोळया समोरून सरकत होतं. पश्चतापाच्या सूक्ष्मं सुईनं काळीज नुसतं टोकरलं जातं होत.समीरची तरी काय चूक होती? मुळात तसा नाहीच तो. पण आज नको तेच झालं.त्यानं ओढलं की तिचं त्याच्या मिठठीत...