
*उंदरीन सुंदरीन; बाल कल्पनालालसेचे चोचले पुरवणाऱ्या कविता मराठी साहित्यात बालकुमारांसाठी फारसे लिहिले जात नाही. जे थोड फार लिहले जाते. त्यात तोच तोपणा व अनुकरण जास्त असते. पांरपारीक चौकटीतच लिहील जात. चौकोटी मोडण्याचं धाडस मराठी साहित्यात फारसा होताना दिसत नाही. बालकांसाठी लिहायच म्हणजे फारच कठीण काम असत. त्यासाठी लहान व्हाव लागत. आपल्या भावविश्वावर बालकांच भावविश्व बेताव लागत. बालकांच वय कल्पनालोलुप असत. त्यांच्या संवेदना व जाणीवा वेगळ्या असतात.अभिव्यक्तीची भाषा वेगळी असते. त्यांच्या पातळीवर जाऊन आपल्या मनावर चढत गेलेले प्रौढत्वाचे स्तर अलगद बाजूला करावे लागतात. बालसाहित्य लिहिताना अनेकदा शिंग मोडून वासरात शिरण्याचा ही प्रयत्न होतो परंतु त्या लेखनाला अकृत्रिमता प्राप्त होत नाही. प्रौढत्वाचा एक दर्प त्यात डोकावत राहतो. दर्जेदार बालसाहित्य ही काळाची गरज आहे. चांगल्या संस्काराची रूजवण, मूल्यांचे बालमनावर रोपण, भाषेचे समृध्दीकरणं, संवेदना, जाणिवाची व नेणिवांच प्रगल्भीकरणासाठी अंकुरणक्षम बालसाहित्याची आवश्यकता आहे. संकारक्षम लिहीण तर धाडसाच काम. त्यात भवतालाच्या वास्...