गुंतता ह्रदय हे भाग 1

संध्याकाळचं आकरा वाजलं होतं.कॉलनीतलं सारी सामसूम झाली होती.रस्त्यावरले बल्बं ढणाढणा जळत होतं.निलेशनं गाडी उभी केली. झटक्यात गेट उघडलं. बाईक आत मध्ये घेतली. बाईक पार्क केली. पाय आपटत आपटत चालत पाय-या चढून वर गेला.असं वर जाण्यासाठी तो लिप्टं ही वापरू शकला आसता. तो नेहमी वापर करायचा ही लिप्टचा पण आज असं काहीचं केलं नाही.तृप्ती नुसती उभी राहिली. सारं त्याचं पहात होती. भितीनं तिचं अंग थरथर होतं.त्याच्या मागं चालत जावं की लिप्टं वापरावी?तिला हा प्रश्न पडला. काही क्षणच. ती मुकाटयाने पाय-याच चढू लागली. अजून ही निलेश रागरागनचं पहात होता पण तिची काय चूक होती? एखादं आपल्या कडं पहात असेल तर स्त्री काय करू शकते? लग्नासारख्या समारंभात तर अश्या गोष्टी घडतचं असतात. आता ते बावटं सारखचं आपल्याकडं पहात होतं.त्याला ती काय करू शकत होती.असे पागल तर जळी स्थळी काष्ठी पाषाणी भेटतचं असतात.मुलीसाठी हे नक्कीचं नवीन नव्हतं.निलेशला एवढं एक्साईड होण्यासारख कुठं काय झालं होतं? तो बावळटं पहात असताना त्याच्याकडं तिचं लक्ष गेल होतं.सारखं सारखंच लक्ष गेलं. त्याचं...