पोस्ट्स

सत्याचा शोध प्रवास

 || आपलाचं संवाद आपुल्याशी|| हे जग आहे त्याचं एक कारण आहे. कारणाशिवाय काहीचं असू शकत नाही असं गृहीत धरून तेच कारणं युगेनोयुगे माणसं शोधत आहेत.कधी धर्माचं साधन तर कधी विज्ञानाचं माध्यम घेऊन माणसं धडपडत आहेत. माणूस हाच सर्वात बुध्दीमान प्राणी आहे हे माणसांनं स्वतःजाहिर केलेले आहे. दॅटस् इट्स. धर्म असेल किंवा विज्ञान असेल दोन्हीच्या माध्यमातून माणसांनी हाच प्रयत्न केलेला आहे.प्रयत्न अजून ही चालूं आहेत.अंतिम सत्य अजून तरी कुणाच्या हाती लागलं नाही.तसा कुणाचा दावा ही नाही.आजच ज्ञान उद्या अज्ञानात रुपांतरित होत जाते. आपण जे खरं समजतं असतो.तेचं काही दिवसांत मिथ्य ठरवले जाते.सत्याचा हा शोध प्रवास अखंडित पणे सुरूच राहणार आहे.  मलाच  फक्त समजतं,मीच तेवढा शहाणा आहे अशी अतिशहाणी माणसं तुम्हाला पावलोपावली भेटतं असतील.त्यांना पाहून तुम्हाला काय वाटतं? हे महत्वाचं आहे.               तुम्ही त्यांच्या पेक्षा जास्त हुशार किंवा शहाणे असण्याचा साक्षात्कार होतो की त्यांची दया येते? का तुम्हीचं स्वतः जगात. सर्वात हुशार असण्याची दाटं शक्यता वाटते? खरं  काय...

शूभेच्छांची मांदीयाळी

 ||आपुलचं संवाद आपुल्याशी|| आज मक्ररसंक्रांतीचा दिवस.सण आनंदचा,सण समृध्दीचा, सण सौभाग्याचा.सण सुवासिनीचा...!!! कालपरवा पासूनचं मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा मोबाईल वर येऊन धडकत असतील.शुभेच्छांचा नुसता वर्षाव सुरूच असेल.हल्ली प्रत्येक सणाला माणसं कमालीचं शुभेच्छूक होताहेत.सोशल मिडीयावर धो धो शुभ संदेश कोसळतं आहेत.जे सहज देता येतं ते माणूस देतं.शुभेच्छा....!! सण म्हटलं की संसाराच्या दगदगीत आलेली थंडगार झुळूकच असते माणसाला.माणसं स्वतः ला कुठं कुठं बांधून घेतात.सण म्हटलं की तेवढच निमित्त...व्यक्त होण्याला.दुसरं काय?असो. मकरसंक्रांत हा तसा देण्या-घेण्याचा सण.वाण लुटण्याचा सण.वाण लुटू देण्याचा सण.आपल्या शेतात पिकलेले दुस-याला देणे. वाणोळा देणे.वाणोळा घेणे.बोरचं ती पण प्रत्येकाच्या बांधावरल्या बोरीची चव वेगळीच की.वाणोळा म्हणून दोन चार चाखायची. लहानपणी या सणाचं केवढ अप्रूप असे.काय खावं आणि काय नाही खावं हा प्रश्न असे आम्हा पुढे. सारी रानं पिकानं बहरलेली बावरलेली असतं.काही पिकं रसानं चिकांनं ओथंबलेली असतात.थंडी वाढत चाललेली...सूर्याचं उन्हं ही गारठा घेऊन येणारं...दिवस शिळू झालेले....दिवसांन आपल...

खरं कधी कधी बोलूया

 ||आपलाचं संवाद आपुल्याशी || कधी कधी खरं बोलूया. *************************  शालेय जीवनात अनेक सुविचार आपल्या कडून गोठून घेतले जातात.घरात ही माणसं मुलांवर चांगले संस्कार करायचे म्हणून सदैव उठता बसता संस्काराच्या उपदेशाचे डोस पाजत असतात. त्यात 'माणसांनं खोटं बोलू नाही.' हा सुविचार प्रामुख्याने सांगितला जातो. मुलांचं मन निर्मळ असतं.ते निरागसं असतं. कोवळ मन नाजूक असतं.थोडक्यात काय तर मुलांची. मन संस्कारक्षम असतात.काही संस्काराचे बीज आपण त्यात  पेरले तर उगवू शकतात.खरं बोलणं हा सुविचार माणसाच्या मनात का रूजतं नाही. मूलं जसं मोठं मोठं होतं जातं तसं तसं ते अधिक लबाड बोलत राहतं.खोटन बोलण्याची एक कला आहे .ती हळूहळू आत्मसात करत राहतं.      खोटं  बोलणं हे एक चातुर्य समजलं जातं.जी माणसं सराईतपणे खोटं बोलतात त्यांना हे जग व्यवहार चातुर्य समजत. खरं बोलणारांना अर्थात च मूर्ख समजलं जातं.आपण मूर्ख आहोत हे मान्य करणारा सज्जन माणूस अजून या पृथ्वीतलावर अवतारायचा आहे.त्यामुळे या जगात जिकडे तिकडे सदैव सातत्याने कारण असताना काहीच किरण नसताना ही माणसं खोटं बोलत राहतात.   ...

जगजेत्ते जंतू

 ||आपुलचं संवाद आपल्याशी| हे जग सा-यांच आहे.प्रत्येक प्राण्यांच,कीटकांच,वनस्पतींचं. ज्यांनी ज्यांनी  या पृथ्वीवर जन्म घेतला आहे त्या सर्वांचं हे जग आहे. फक्त माणसांचं एकट्याचं हे जग नाही.माणूस मात्र हे जग आपलं एकटयांचं आहे असं  समजतो. कुणी काय समजावं  हा ज्याचा त्याचा खाजगी प्रश्न आहे. बेडूक सुध्दा त्याच्या जागाचा राजा असतो.भलं आपणं त्याला डबकं समजतं असलो तरी. त्या डबक्याला आपण जग समजतं नाही पण बेडकांची ते जग असतं.  जंगलाचा राजा सिंह असतो.अर्थात टोळयांनी तर त्यांना पण राहवचं  लागतं.एखादया समुद्रातल्या राजा शार्क मासा असतो.प्रत्येक मोठा मासा लहान माश्याला खात असतो. मासेचं माश्याला खातात असं नाही.बोके ही आपलीं पिल्लं खातो.माणसं ही माणसांचं  शोषण करतात. माणसं माणसाला खातात.(मी बातम्या वाचल्या आहेत. काही हाॅटेल मधून माणसाचं मानस खायला दिले जात होते.) असो. मोठी माणसं लहान माणसाला गुलाम करतात. शोषण करतात.आपलं वर्चस्व या जगावर ठेवण्याचा प्रत्येक जीव प्रयत्न करत असतो.  कोणे एके काळी डायनासोरची सत्ता या जगावर होती म्हणे.     आता दोन वर्षा पूर्वी ...

संख्या रेषा आणि आयुष्यरेषा

 ||आपलाचं संवाद आपुल्याशी|| विद्यार्थ्यांना शिकवायचं म्हणून मी एक संख्या रेषा फळयावर काढली.शून्यातून दोन्हीही बाजूंनी वाढतं जाणा-या धन आणि ऋण संख्या. रेषा अनंत असते.प्रतल ही अनंत असते.आरंभ ही अंनत आणि शेवट ही अनंत असलेली रेषा. भूमितीय संज्ञा समजून घेताना मला नेहमी सारखंचं तत्वज्ञानाच्या काही संकल्पना मनात खुणावू लागल्या.खरचं शेवटचं नाही असं काही असू शकत? फक्त अनंत..??? अंनत विश्वाची, ब्रम्हांडाची किंवा अंनत कालाची कल्पना आपण नाही करू शकत.ती आपल्या बुद्धीची मर्यादा आहे.असो.       आपलं आयुष्य पण एक रेषाच आहे.काळाच्या अवकाशात वाढत जाणारी रेषा.संख्यारेषेसारखी.भूतकाळ  व भविष्य काल अनंत असलेली. वेदांत तत्वज्ञानाच्या कल्पसिध्दांता प्रमाणे आपण कालचक्राच्या अंनत प्रवासात आहोत.वाढत वाढतं  जाऊन पून्हा शून्य होणारं.शून्यातून पुन्हा हे विश्व व्यापतं जाणार. मृत्यू  हा कोणत्याचआयुष्याचा शेवट नाही असू शकत.तो एक टप्पा असेल.आयुष्यचा रेषा खंड असतं नाही. मृत्यू हा जीवाचा शैवट नाही तर एका देहातून दुस-या देहात स्थलांतरणंअसते. वैदिक तत्वज्ञानानुसार.विज्ञान तर जन्म मृत्यूचं अ...

चेहरा वाचन

इमेज
 ||आपुलाचं संवाद आपुल्याशी|| किताबे बहूत पिढी है तुने | मेरा चेहरा मी जरा पढो|| बता दे मेरे चेहरे पे क्या क्या लिखा है||  हे बाजीगर चित्रपटातील गाणं फार लोक प्रिय झालं होतं.मला तर ते खूपचं आवडलं होतं.चेहरा पण वाचला जाऊ शकतो हे मला तेव्हा कळलं होतं.पुस्तकं वाचायचं  सोडून मी चेहरे वाचत सुटलो होतो. अर्थात चेहरे वाचत बसणं सोपी गोष्टं नसते.फार रिस्की कामं असतं. ते काही दिवस मी करण्याचा प्रयत्न केला होता.चेहरे वाचण्याची काही लिपी वगैरे असते का?  लिपी वगैरे काही माहित नाही पण कला मात्र जरूर आहे. त्या माणसाला न कळता आपण त्याचा चेहरा वाचू शकतो.प्रत्येक जणचं ते वाचत असतो. पोलिस खात्यातील लोक चेहरे वाचण्यात तरबेज झालेली असतात.  ओळखीच्या आणि अनोळखी माणसांचे पण आपण चेहरे वाचत असतो. समोर आला की आपण त्याला स्कॅन करत असतो.मनाच्या मेमरीत ते एकदा. डाऊन लोड केले की पुन्हा पुन्हा त्याला वाचत बसतो.आपल्याला भेटलेली सारीच माणसं लक्षात राहत नाहीत.सारीच माणसं कुठल्याश्या नाजूक नात्यांच्या धाग्यात गुंफली जात नाहीत.ह्रदयातल्या आपुलकीच्या ओलाव्यांन  ओथंबून येतं नाहीत. बोलल्याशिवाय माण...

रोजची सकाळ

 ||आपलाच संवाद आपल्याशी   दिवस रोज उगवतो. उगवलेला सूर्य रोज मावळतो.अंधाराचं जाळं फेडत फेडत सूर्य येतो. त्याची चाहूल पुर्वी आपल्या ओठांवर लाली पसरतं देते.पहाटं रंग उमटले की चैतन्य सृष्टीच्या कणाकणांत पसरतं जातं.प्रसन्नताच सकाळ घेऊन येते.अंगास झोंबणारा गारवा असेल.झुळझुळणारा वारा असेल.किलबिलणारे पक्षी असतील.सकाळी सारं कसं मस्त असतं.ताजं ताजं असतं. भेटणारी हवा असेल नाहीतर माणसं...   सकाळ रोज येते म्हणून उदास वाटत नाही.ती रोजच्या सारखीच येते.नटतं नाही.थटतं नाही. प्रसन्नता व ताजेपणा तिचं वैशिष्ट्यचं असतं.  सकाळ अल्लड पोरी सारखी निरागस असते.लोभस असते. हवीहवीशी असते.   ती रोज असते पण आपल्या सर्वांना ती रोज भेटतेच असं नाही.तिच्यासाठी आपल्याला काही वेळ आपल्या खुराडयातून बाहेर  पडावं लागतं? सकाळ कुणाच्या बेडरुम मध्ये नाही येत.त्यासाठी थोडं मुक्त व्हावं लागतं.मुक्त वगैरे म्हणजे  असं  फार काही नाही. मार्नींग वाकला जावं लागतं.बस्सं.. ती आपल्या स्वागताला सज्जचं असते.   सकाळी सकाळी फिरायला जायचा स़ंकल्प तर  या वर्षी तुम्ही पण केलाचं असेल?मी पण केलाय. बह...