इंग्लिशस्कूलचं फॅड
.jpeg)
गावचा नामा त्या दिवशी बॅंकेच्या दारात भेटला.गडी जरा घाईतच होता.घाईत म्हणजे गरबडीत.हातात बरीचं कागद होती.त्याला बॅंकेचं कर्ज काढायचं असावं.मी सहज त्याला हटकलं. मी:अरे कर्ज कशाला काढतो?" तो:"कशाला म्हंजे...? पोरग टाकलं की शाळात" मी:"शाळात टाकलं ?त्यासाठी कर्ज ?" तो:"मग ?"इंग्लीश स्कूल मध्ये टाकलं.साध्या साळात नाही. रोज येतं की स्कूलबसात बसून पाटादयाला." मी: "किती पैसं भरलं ? तो:आता तुर्त भरलं पंच्चीस. पुन्हा दयाचेत वीस.तसं काय नाही .सारे संभाळून घेतात आपल्याला आपल्या रामाचं पोरग घेतलं की पियोन म्हणून चिटकवून." मी:"आरं, आता एवढ पैसं कशी आणणारेस वर्षाला ?" तो:"कसं म्हंजे? काय झाडाला तोडायचेत व्हयं ? उचल घेणारं .बायको भी समजदार. ती पण म्हंती काय भी करू.कुणाचा गू काढू पण पोरग इंग्रजीतच शिकू.मुकादम उचल देतो की.त्याच्या मेहूण्याचीच शाळा जनू" मी:" पोराचं काय वय?" तो:" चौथं लागलं असलं बघा आवंदा." मी: "अजून त्याचं वय नाही की झाली शाळाचं " तो:आता पोटातचं असल्या पासून शिकशान सुरू होतं.आ...