सत्याचा शोध प्रवास
|| आपलाचं संवाद आपुल्याशी|| हे जग आहे त्याचं एक कारण आहे. कारणाशिवाय काहीचं असू शकत नाही असं गृहीत धरून तेच कारणं युगेनोयुगे माणसं शोधत आहेत.कधी धर्माचं साधन तर कधी विज्ञानाचं माध्यम घेऊन माणसं धडपडत आहेत. माणूस हाच सर्वात बुध्दीमान प्राणी आहे हे माणसांनं स्वतःजाहिर केलेले आहे. दॅटस् इट्स. धर्म असेल किंवा विज्ञान असेल दोन्हीच्या माध्यमातून माणसांनी हाच प्रयत्न केलेला आहे.प्रयत्न अजून ही चालूं आहेत.अंतिम सत्य अजून तरी कुणाच्या हाती लागलं नाही.तसा कुणाचा दावा ही नाही.आजच ज्ञान उद्या अज्ञानात रुपांतरित होत जाते. आपण जे खरं समजतं असतो.तेचं काही दिवसांत मिथ्य ठरवले जाते.सत्याचा हा शोध प्रवास अखंडित पणे सुरूच राहणार आहे. मलाच फक्त समजतं,मीच तेवढा शहाणा आहे अशी अतिशहाणी माणसं तुम्हाला पावलोपावली भेटतं असतील.त्यांना पाहून तुम्हाला काय वाटतं? हे महत्वाचं आहे. तुम्ही त्यांच्या पेक्षा जास्त हुशार किंवा शहाणे असण्याचा साक्षात्कार होतो की त्यांची दया येते? का तुम्हीचं स्वतः जगात. सर्वात हुशार असण्याची दाटं शक्यता वाटते? खरं काय...