पोस्ट्स

जानेवारी, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महाभारत लाईव्ह: तुमची भूमिका काय? धर्म विरुद्ध अधर्माची लढाई!

इमेज
आज आता तुमच्या समोर महाभारत घडत आहे. तुम्ही कुरुक्षेत्रावर  उभे आहात.ते सारं लाईव्ह  पहात आहात. असं समजा. जे घडतयं ते तुमच्या डोळयासमोर घडते आहे? इमॅजिंग करा. कल्पनाचं करायच्या आहेत तर भव्य दिव्य कराव्यात.त्यात कसली कंजूषी करता?त्याला कुठं पैसे लागतात? एवढं महाभारत  घडते आहे तर तुम्ही  कुणाच्या बाजूनं आहातचं. नाही कळलं? इझी ते. कौरवांच्या की पांडवांच्या..? धर्माच्या की अधर्माच्या? काय म्हणता? तुम्हाला धर्म  नि अधर्मचं  ठरवता येईना?  आता कोण  कौरव? कोण पांडव? कोण श्रीकृष्ण? ते ठरवताच येईना. त्याची काय मेथड असती काय? कमाल बुवा..!! त्याची कसली मेथड भिंथडं यार? आपण कोण आहोत हे ठरवा की फर्स्ट...? कोण आहात तुम्ही नक्की? तुम्ही तिथं आहात म्हणजे तुमचा भी काही तरी रोल असेलचं ना?  आपला रोल  ठरवता आलं की महाभारत समजायला सोप जातं? तुम्हाला पुढं सारं सहज ठरवता येऊ शकतं. नायक भी खलनायक ही?  तुमचा मित्र  दुर्योधन ही असू शकतो किंवा सुदाम्याही..!! तुम्ही पांचली भी असू शकता किवा सुभद्रा ही?उत्तरा  किंवा कुंती ही...!! अगदी तुम्ही कुणी ही असू...

नविन वर्षाच्या शुभेच्छा व काळ पुरूष वगैरे

इमेज
 आज  नवीन वर्षाचा पहिला दिवस.काल वर्ष 2024 गेलं.वर्ष 2025 आलं.भिंतीवरलं एक कलेंडर गेलं नि नवीन आलं.काय घडलय? उगवणारा सूर्य तोच असत़ो.त्यातून निथळणारा प्रकाश ही तोच असतो.पृथ्वीच्या परीवर्तन व भ्रमण गतीत काहीचं फरक पडतं नाही.सर्व भवताल जसा सदैव असतो तसाच असतो. फक्त नव्याचा भास असत़ो.सारं सारं नवं नवं वाटायला लागतं.हातातलं बरचसं निसटून गेल्यासारखं वाटतं.आपल्या आयुष्याची ओंजळ हातात घेऊन आपण उभे असतो. ओंजळ ओली असते पण रितीच असते. मकाही क्षणांच्या अस्तित्वाची ओल सांभाळत.एक एक क्षण क्षण अलगद निखळून पडतात.गेलेले क्षण परतं येत नाहीत.आपल्याला हवे असलेले क्षण आपण पकडून ठेऊ शकत  नाहीत.नको असलेले क्षण रोखू शकत नाहीत. खर तरं या विश्वात आपण काहीचं करू शकत नाही.        या सृष्टी चक्रात तुम्ही भिंतीवरच कलेंडर बदल म्हणून काहीच घडणार नसतं.जे घडतं ते आपल्या मनाच्या अवकाशात.ते भास असतात.काही अभास असतात.नाहीतरी हे जग भास- अभासाच्या हिंदोळयावरच झुलत असते.त्यात आनंदाचे,दु:खाचे क्षण आपण गोळा करत राहतो.काही क्षणांचे ठसे आपण मनावर छापून ठेवलेले असतात.काही क्षण मनावर ओरखडे उमटवून...