आज आता तुमच्या समोर महाभारत घडत आहे.
तुम्ही कुरुक्षेत्रावर उभे आहात.ते सारं लाईव्ह पहात आहात.
असं समजा.
जे घडतयं ते तुमच्या डोळयासमोर घडते आहे?
इमॅजिंग करा.
कल्पनाचं करायच्या आहेत तर भव्य दिव्य कराव्यात.त्यात कसली कंजूषी करता?त्याला कुठं पैसे लागतात?
एवढं महाभारत घडते आहे तर तुम्ही कुणाच्या बाजूनं आहातचं.
नाही कळलं? इझी ते.
कौरवांच्या की पांडवांच्या..?
धर्माच्या की अधर्माच्या?
काय म्हणता?
तुम्हाला धर्म नि अधर्मचं ठरवता येईना?
आता कोण कौरव? कोण पांडव? कोण श्रीकृष्ण? ते ठरवताच येईना.
त्याची काय मेथड असती काय? कमाल बुवा..!!
त्याची कसली मेथड भिंथडं यार?
आपण कोण आहोत हे ठरवा की फर्स्ट...? कोण आहात तुम्ही नक्की?
तुम्ही तिथं आहात म्हणजे तुमचा भी काही तरी रोल असेलचं ना?
आपला रोल ठरवता आलं की
महाभारत समजायला सोप जातं?
तुम्हाला पुढं सारं सहज ठरवता येऊ शकतं. नायक भी खलनायक ही?
तुमचा मित्र दुर्योधन ही असू शकतो किंवा सुदाम्याही..!! तुम्ही पांचली भी असू शकता किवा सुभद्रा ही?उत्तरा किंवा कुंती ही...!!
अगदी तुम्ही कुणी ही असू शकता? नाही तर नुसतचं एखादं प्यादं....!!
कुणीच दिलं न घेतलेले.
आंधळे धृतराष्ट्र ही...!! किंवा संजय दिव्यदृष्टी असलेला...!! समजा ना स्वतःला काहीतरी.
काय म्हणता?
महाभारत इथं घडते आहे असं मी समजूच का?
मग बसा बोंबलत? काही तरी समजावायचा लागेल ना? महाभारत तर घडतेच आहे. तुम्ही काहीचं नाही ठरवलं तरी महाभारत हे घडणारच आहे. अटळ असतं ते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा