सामाजिक न्यायासाठी एल्गार पुकारणारा काव्यसंग्रह- वीरा राठोड

'युद्ध पेटले आहे' हा सामाजिक न्यायासाठी एल्गार पुकारणारा काव्यसंग्रह- वीरा राठोड कवी वीरा राठोड भाष्य करताना बीड – साहित्य म्हणजे केवळ शब्दांची मांडणी नव्हे, तर ते समाजाच्या मनातील आंदोलनाची अभिव्यक्ती असते. सामाजिक अन्यायाविरोधात लढा देणाऱ्या भावना शब्दरूपात मांडत, कवी बाळासाहेब नागरगोजे यांनी रचलेल्या 'युद्ध पेटले आहे' या महाराष्ट्र शासनाच्या साहित्य व संस्कृती मंडळ अनुदान प्राप्त काव्यसंग्रहाचा भव्य प्रकाशन सोहळा नुकताच बीड येथे पार पडला. क्रांतिकारी उद्घोषणांचा सोहळा हा प्रकाशन सोहळा केवळ साहित्यिक कार्यक्रम नव्हता, तर तो परिवर्तनाच्या निर्धाराचा महोत्सव होता. प्रगतिशील लेखक संघ व एकता फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नगर रोड, बीड येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात क्रांतिकारी गीतांनी वातावरण भारावून गेले. शाहीर समाधान इंगळे, शाहीर अमरजीत बाहेती आणि नभा यांच्या स्फूर्तीदायक गीतांनी उपस्थितांची मने जागृत केली. शहीद दिनाचे औचित्य साधून अभिवादन कार्यक्रमाची सुरुवात शहीद भगतसिंह, राजगुरू, सुखदेव तसेच अवतारसिंह ‘पाश’ आणि साळूब...