पोस्ट्स

वीरचक्र विजेते माळी साहेब -अमर रहे

इमेज
 वीरचक्र विजेते तालुक्याचे भूषण माळी साहेब आपल्यात नाहीत ही गोष्टचं फार वेदनादायी आहे.संपूर्ण स्वच्छता अभियान मध्ये काम करत असताना त्यांच्या सोबत काम करण्याची संधी भेटली. वय झालं तरी कमालीची धडाडी व सकारात्मक विचारांची उर्जा त्यांच्या अंगी होती.त्यांच्या गावाच्या व  पाटोदा तालुक्याच्या स्वच्छता चळवळीला गती देण्यामागे त्यांचा फार मोठा वाटा आहे.    आजची सकाळ शुभ नाही. माळी साहेब आपल्या नाहीत.ही अतंत्य दुंखद घटना आहे.मृत्यू जरी अटळ असला तरी आपल्या तून आपल्याचं एका माणसाला घेऊन जातो ही बाब  जीवनाची क्षणभंगूरताच अधोरेखीत करते.मानवी जीवनाची ही पराधिनता सांगून जाते.   माळी साहेब शरीराने आपल्यात नसतील पण त्यांच्या आठवणी कायम मनात राहतील.तारूण्य ओसरलं तरी घडाघडी आणि जिद्द कशी उरात तेवत ठेवायची ,आपणच आपल्याशी प्रमाणिक कसं राहयच हे  त्यांच्याकडून शिकायच. मी एकदा त्यांना विचारलं होत," वीर चक्र भेटलं यासाठी तुम्ही अतुलनीय शौर्य दाखवलं असेलच ना?" ते हासत हासत म्हणाले," सरजी असं काही नाही.मी माझं काम प्रमाणिकपणे केले.अतुलनीय वगैरे काही नाही.मी लढाईत खेळत नव्हतो.मी लढ...

मरगळ

इमेज
दिवा जळत राहतो.प्रकाश उधळत राहतो.निरतंर. जळता जळता दिवा काजळत जातो.नकळतं.त्याचं त्यालाच कळतं नाही.हळू हळू अंधूक होतो.काजळी त्याच्याच शरीराचा काही अंश असते.तोच अंश त्याचं तेज गिळतो. ती काजळी झाडली की तो पुन्हा नव्याने पेटतो.प्रकाशाने फुल्लारून येतो.पुन्हा जळत राहतो.अंधाराच्या उरावर प्रकाश रेषा अधिक गडद करत राहतो. माणसाचं भी तसचं आहे ना? माणसाला येणारी मरगळ म्हणजे काजळीच की. अधिकचं प्रकाशमान होण्यासाठी,तेवण्यासाठी  अंग झटकावचं लागतं ना? ती जगण्याची अपरिहार्यताच असते.आपल अंग झटकून पुन्हा तेवत राहवचं लागतं. आपल्याला काजळीने वेढलं तर गेलं नाही ना? अंग तर झटकून पाहूया.कालच्या पेक्षा आज अधिक प्रखर तेवायचं आहे ना? आपलं असणं अधिकचं ठळक करूया.              शुभ प्रभात.                                  परशुराम सोंडगे  भेट दया :prshuramsondge.blogspot.com

ह्रदय गुंतता ह्रदय हे.(भाग 4)

इमेज
  रात्रीचे दहा तरी वाजलं असतील. तृप्ती नि निलेश मार्केटमधून घरी परतत होते.आज निलेशचा मूड ही चांगला होता. बराच वेळ फिरल्यामुळे एक थकवा आला होता.एका हॉटेल जवळ त्यानं गाडी पार्क केली. ते हॉटेलात शिरले. जेवायचं की नुसतं कॉफी घ्यायचं हे त्यांनी काहीच ठरवलं नव्हतं. तसं बाहेर येण्याचं काही प्लॅन नवहता.दोघ ही गप्पात मग्न होते. समोरच्या टेबला वर एक कप्पल होतं. अर्थात त्यांच्याकडं याचं लक्ष नव्हतं.ती बाई सारखं तयांच्याकडं पहात होती. तृप्तीचं लक्ष ही गेलं पणतिनं ते इग्नोर केलं. ती दोघाकंड पहात आहे की एकटया निलेशकडं पहात आहे याचा अंदाजला घ्यावासा वाटला.तिच्या समोर जो माणसू बसला होता. तो नक्की कोण असावा तिचा? नवरा की वडील? समोर छान्‍ अक्क्ल पडलं होतं. देह कसा बसा खूर्चीत मावला होता. इतकं तंतोतंत तो कसा काय खूर्चीत बसू शकला असेल? तृप्तीला प्रश्न पडला.              जास्त वेळ त्याच्या कडं पाहण्याचा प्रयत्न तृप्ती करणार नव्हती. ते बावळट पुन्हा पहात बसायचं आपल्याकडं. आपल्या बायका, पोरी बरोबर आसल्या तरी बरीचं थोराडं माणसं दुस-याच्य बायका...

ह्रदय गुंतता हे (भाग 3)

इमेज
  तृप्ती हॉस्पीटलला पोहचली. रक्तदान ही केलं. खर तर तिला लगेच परत फिरायचं होतं पण थोडसं थकल्यासारखं वाटतं होतं. डॉक्टरंनी तिला अराम करायाला सांगितलं.तृप्तीला बराच वेळ तिथे बसावं लागणारं होतं. घर काही हाकेच्या जवळ असले तरी लगेच जाता येणार नव्हतं.श्रेया होतीच तिच्या सोबत. चहा, बिस्कीटं ही घेतले.शांत थोडी बेडवर पडली होती. बेडवर पडून भिरभिरणा-या फॅनकडं ती एक टक पहात होती.भीतीचं सावटं होतंच चेह-यावर. श्रेया आली.तिचंत हात हातात घेत बोलली,“तृप्ती, थँक्सं.तू आलीस.नाहीतर केवढं टेन्शन आलं होतं मला.” तृप्तीनं बोलण्यापेक्षा हासणं पंसत केलं.ती छानसं हासली “नाही म्हणालीसं नि परत आली?” श्रेयाला  स्वत:चं झालेलं कन्फूजन दूर करायचं होतं. अजून एक वर्षं ही झालं नव्हतं तृप्तीच्या लन्नाला. एवढं का घाबरते ती निलेशला. आपल्याला लग्नाला दोन वर्ष झालं तरी विवेकची अशी भिती नाही वाटतं. “आलेयं मी. न येणं मला आवडलं नसतं नि आलेलं निलेशला आवडणार नाही.” “निलेशला बोलू का मी? तू चांगलचं काम केलं आहे. एका माणसाला जीवंत राहण्यासाठी मदत केलीस.” “शपथ.  हे तू असं काही करणार नाहीस.” तृप्तीनं तिच्या तोंडाला हा...

राजकारणं घाला चुलीत पहिले आरक्षण दया

इमेज
 राजकारण तुमचं  चुलीत घाला.  मराठा संघटना आरक्षणाच्या मुददयावर आक्रमक. राज्यातील मराठा समाजाला देण्याल आलेले आरक्षण सर्वच्च न्यायलायनं तात्पुरतं स्थगित केलेले आहे. दोन वर्षापासून मराठा समाजातील विदयार्थ्याना त्याचा फायदा झाला होता सर्वेच्च न्यायलयाने दिलेली स्थगिती राज्यातील मराठा समाजातील विदयार्थ्याना हवालदिल करणारी आहे व संताप आणणरी आहे.मराठा आरक्षण कायम राजकरणात ऐरणीवर राहीलेले आहे.आरक्षणाचं घोंगड भिजत ठेवण्यातचं सर्वच राजकीय पक्षांच कल राहिलेला आहे.सर्वेच्च न्यायलयच्या मराठा आरक्षणावरील स्थगिती नंतर ही मोठया प्रमाणात राजकराण करण्यात येत आहे.मराठा आरक्षणाच्या दिले त्या वेळेस श्रेयवादासाठी झुंबड उडाली होती.आता या सदर्भात आलेल्या अपयाशाचे खापर दुस-याच्या डोक्यावर फोडण्याची स्पर्धा लागली आहे.   सर्वच पक्ष व राजकीय व्यक्ती आपलं राजकीय हीत लक्षात घेऊन मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीवर बोलत आहेत. काही सरकार बाजू मांडण्यात कमी पडले आहे असं सांगून महाविकास आघडीवर त्याचं खापर फोडण्याचा प्रयत्न करत आहेत तर काही पक्ष सर्वच्च न्यायलयचा निकालवरचं  प्रश्न चिन्हं उपस्थि...
इमेज
                   नवरात्रोत्सव- शक्तीचा जागर     न वरात्र म्हणजे नऊ दिवस चालणारा शक्तीचा उत्सव.समाजात तो इतक्या विविध प्रकारे साजरा केला जातो तो पाहून थक्क व्हायला होतं. प्राकृतीक उपल्बधतेनुसार व सामाजिक गरजेनुसार त्यात विविधता व स्वरूप देण्यात आलेले आहे . अलीकड काही त्याचं वाढतं सार्वज नि क स्वरूप राजकीय प्रेरीत ही झालेले आहे . गणपती उत्सव संपला म्हणजे वेध लागतात नवरात्रीचे.जागोजागी देवीच्या पूजेसाठी , स्थापनेसाठी मंडप उभारले जातात.नवरात्रीच्या पहिल्या दिवशी , अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होते.   घराघरामध्ये  होणारा हा उत्सवं  आता   सार्वजनिक उत्सवा त रुपांतरीत झाला आहे . देवीला शक्तीचं रूप मानलं जातं . वेंदात तत्वज्ञानात ब्रम्हं - माया च्या रुपात विश्वाचं रूप गृहीत धरलं आहे . अनेकदा  देवांनाही राक्षसाचं संहारं करणं शक्य झालं नाही त्यावेळी देवीनी अवतार घे ऊ न राक्षसाचं संहार केल्याच्या अनेक पुराण कथा आहेत .              ...

त्या मराठवाडायाला

इमेज
           त्या मराठवाड्याला फक्त   मतदानाच्या दिवशी झोपेतून उठवलं तरी पुरेसं आहे तो ऊसाच्या बुंध्यापाशी असा कोणी  माणूस बांधला आहे ? हातां-पायांतल्या साखळदंडांना इथं चमकावित राहतात माणसं वेठबिगारीचा वारसा चालवित राहतात माणसं हे इतकं सुस्त पडलेलं कोणत्या परुडाने  फूकलेलं गाव आहे....? घोषणेवरच देतो ढेकर विकासाचे स्वप्न न पडलेला इथला माणूस... मुंबई मनसोक्त चघळून थूंकून टाकते पान- मराठवाड्यासारखे... जातींच्या खूराड्यात सरपटणारी माणसं, जगण्याचे सोपस्कार उरकून मातीत कूजण्यास होतात मोकळी पोटावरच्या टाक्यांवर हात ठेवून घरी जाणाऱ्या बाईचे गर्भाशय हरवले आहे.. एका रस्त्याच्या कडेला सकाळ - संध्याकाळ एक खरजूलं कूत्रं असतं  निरर्थक नख्यांनी स्वतःला रक्तबंबाळ करीत बसलेलं... असा उभा नांगूर धरला तर इथं मूलींची कोवळी हाडं येतील वर.. अनुशेषाच्या टपरीवर मिळतो मावा, गायछाप, कोंबडा कटेल, चारमिनार, 120........300 बेसुर, बेभान वारा, माशा बसलेले तोडलेले बोकडाचे मुंडके उकांडा उधळून गेलेले बदगे.. सामूहिक बधिरपणाचे वारुळ वाढत गेले आहे नेहमीच मराठवाड्याच्या आत्म्या...