पोस्ट्स

लफडीचं पण राजकीय पक्षांची....

इमेज
पक्षाच्या युत्या किंवा आघाड्या नाही होतं. ते सरळ व्याभिचार करतात.ते लफडीचं असतात. लफडयाचे जे परिणाम गावाला घराला भोगावे लागतात.तेच परिणाम असल्या अभद्र युतीचे जनतेला भोगावे लागतात कसे  ? रमेश नावाचा एका आमदारांचा अतिमहत्वाच्या कार्यकर्ता होता.त्याचा पक्षचं फुटला.एका पक्षाचे दोन गट पडले.आता आपण कोणत्या गटात जायचं हा प्रश्न त्याला पडला.गद्दार व्हायचं की खुद्दार? इकडे निष्ठा व तत्व होती तर तिकडे सत्ता.इकडे सुविचार होते.गौरवशाली इतिहासाचे दाखले होते.धडाडीचा भूतकाळात होता. तिकडे आमिष होती,प्रलोभन होती. उज्जवलं भविष्याची स्वप्न होती.थोडक्यात मज्जाचं मज्जा होती. ऑफर तरी दोन्ही बाजूंनी सुरू होती.  काय करावं हे त्याला कळतं नव्हतं. पक्ष फुटला तर फुटला पण आपलं डोकंचं फुटायची वेळं येऊ नाही असं त्याला वाटू लागलं.     जुनं सारं झुगारून आपलेचं नेते आपल्या दैवतावर नको ते बोलू लागलेत हे त्याला  पचतं नव्हत.रूचतं नव्हतं.ज्यांच्या आरत्या केल्या त्यांना लाथा कश्या मारायच्या?शिव्या कश्या दयाच्या? राजकारणात असं चालायचं असे सारं म्हणतात पण दर्जा..? राजकारणाला पण एक दर्जा असतो की,नाही?इत...

शापित राजहंस रविंद्र महाजनी व मी

इमेज
काही घटना,काही माणसं,काही प्रसंग,काही गाणी मनात उतरतं उतरत खोलवर रुजतं जातात. त्यांचं आपलं एक अतुटं नातं तयारं होतं.मोरपिसाचा रेशीम स्पर्श कसा अलवार अनोखं चैतन्य  नसानसात जागवून जातो तसं आठवणींचा  स्पर्श गंध ही अंतरंगात खोल तरंग उठवत राहतो.एखादया आठवणीचा पापुद्रा उचकटला गेला की सारं भळभळत राहतं.ह्रदय नुसतं ओलावून पाझरतं राहतं. ऐन तारूण्याच्या उंबरठ्यावर  असताना एक गाणं मनावर रेशीम ओरखडे ओढून गेले. ते गाणं होतं. हा सागरी किनारा....़ओला सुगंध वारा..ओल्या मिठीत आहे रेशमी निवारा...  आताच्या सारखं गाणं ऐकावंस वाटलं की लगेचच एका क्लिकवर नव्हतं ऐकता येतं.त्यासाठी फार तरसावे लागे. त्याकाळी अशी थेटर पण नसतं.व्हीसीआर आणि टीव्ही असतं.त्या व्हिसीआरवर  सिनेमा दाखवला जायचा. ही  सिनेमाची पर्वणी अख्ख्या  गावाला दिली जायची एखादा सार्वजनिक उत्सव असेल किंवा उत्सव,एखादं सिलेब्रेशनसाठी अख्खं गाव एकत्र येऊन सिनेमा एन्जॉय करायचं. लग्नाच्या वरातीत  असे सिनेमा दाखवले जाऊ लागले होते.अश्याचं एका लग्नाच्या वरातीत मुंबईचा फौजदार हा पिक्चर पाहण्याचा योग आला.त्या चित्रपटाची कथा...

श्रध्दाळू ( वि ) ज्ञानी व चंद्रयान -३

इमेज
सध्या जग हे भारताकडे मोठ्या आशेने पहाते आहे.अवकाश संशोधनात  तर आपण जगात अमेरिका,रशिया चीन यांच्या पंगतीत आहोत.आपलं या क्षेत्रात नावं अधिकच गडद झालं आहे.ही बाब  आपल्या सर्वांसाठी  भुषणावह आहे. चंद्रयान २ च्या अपयशानंतर चंद्रयान-३ ही मोहीम इस्रोनी आखली आहे. अपयशात यशाची बीज असतात.अधिक क्षमतेने काम करून यानाचं प्रक्षेपण ही यशस्वी झालं आहे.ते चंद्राच्या दिशेनं झेपावले ही आहे.इस्रोतील संशोधकांना यश येवो.जगाच्या इतिहासात भारताचा गौरव व्हावा व देशातील नागरिकांचं ऊर अभिमानाने भरून यावा अशी सर्वांची अपेक्षा आहे.तसं होणारं ही आहे.आमच्या संशोधकाकडे तेवढ्या क्षमता आहेतच.विश्वास ही आहेचं  नियोजनाप्रमाणे चंद्रयान-३ चंद्रावर उतरले आणि ते त्याच काम करू लागेल ही.हा गौरवशाली महत्वकांक्षी प्रकल्प तडीस नेण्यासाठी संशोधकांनी अपार मेहनत केली आहे.त्यांचं सर्वत्र जगभर देशभर  अभिनंदन होत असताना ते टीकेची ही धनी झाले आहेत.त्याचं कारणं ही तसचं आहे.             हे विज्ञानाचे पुजारी तिरूपती(बालाजीच्या) चरणी लीन झाले.त्यांनी बालाजीला एक चंद्रयानाची छोटीसी प्रतिक...

पक्षफुटी,सदू आणि बंडया

इमेज
पाराजवळ सकाळ सकाळ एक टोळकं जमा झालं होतं.सकाळ पासूनचं दोन चार गाबडी नुसती तोटं वाजवीत होतं. सकाळ सकाळचं ठो..ठो...  बारं व्हायला लागलेत म्हणल्यामुळे  गलका तर होणारच ना? त्यांच्या भोवती येणारी - जाणारी माणसं गराडा टाकित हुती.जसा जसा गरदा जमा होतं व्हता.तसं ती गाबडी चेकाळतं व्हती.त्या  रामा सावकाराच्या बंगल्याकून डीजेचा भी आवाज येतं हुता.नेमकं कशाचं काय ? हे ब-याचं जनाला कळतं नव्हतं.  सदू  यटण पाठीवर टाकून झपाझपा शॅतात निघाला होता.एवढा गराडा पाहून तेव्हं भी थांबला.उग आपला उल्लीकसा टायेम पास करावा म्हणूनचं तेव्हं तिथं घुटमळला व्हता. "अरं कमून  असं बारं करित्यात रं? "सबागती त्यांनी बंडयाला परशन केला. कुठं काय घडलं?त्याला काय माहित ? तेव्हं शेतकरी माणूस.लयं कुणाच्या राड्यात पडतचं नाय. "आरं काल मोठा भूकंप झालायं की...तुला नाय व्हवं ठावं?"बंड्या त्याच्या हातावर टाळी देत  बोलला.  "भूंकंप...??कुठं ?कवा ?" सदू हादरला ना?त्याला काही इश्यचं ठाऊक नव्हता.तेव्हं हादरायचं नाय तर काय?दोन च्यार थोबाडातून नुसते दातं विचकले.उगाच दाताड विचकल्यामुळे तर सदू  एकदमचं ...

राजकारण आहे की बहुरंगी बहुढंगी नाटक?

इमेज
हल्ली महाराष्ट्रात जनता सरप्राइज शाॅक खाऊन खाऊन घायाळ झाली आहे.उत्सुकता माणसाला पराकोटीचा आनंद देत असते.सस्पेंन्स..आता पुढे काय?  पुढे काय..?? पक्ष फुटला..आता राष्ट्रवादी कुणाची ? या प्रश्नांच उत्तर मिळवण्यासाठी कमीत कमी वर्ष  भरी तरी महाराष्ट्राला वाट पहावी लागेल.शिवसेना कुणाची या प्रश्नांच उत्तर अजून ही महाराष्ट्राला मिळाल नाही.ते मिळेलंच असं ही नाही.तो वरचं राष्ट्रवादी  पक्ष कुणाचा हा प्रश्न महाराष्ट्राच्या मानगुटीवर ठेवण्यात  आला आहे. काही प्रश्न कायम प्रश्नच राहतात.नव्या प्रश्नाला जन्म देतात. माणसं बारा बापाचे नसतात पण प्रश्न  बाराचंचे काय  शंभर बापाचेचं पण असतात.                 या  महाराष्ट्रात  मडकी फुटावीत तशी फटाफट पक्ष कसे काय फुटतात? एवढी प्रचंड गद्दारी  कशी काय होते?कोण गद्दार ? कोण खुद्दार ?असे प्रश्न मेंदूचा पार भूगा करत आहेत.चक्क वाघाची शिकार हरणं कशी काय करतात? सध्या महाराष्ट्रात काही घडू शकतं?तुम्हाला हरिण वाघाच्या बछड्याला दूध-भात भरवताना  लाईव्ह दृश्यं दाखवलं तर तुमचं कसं होईल? ...

इंग्लिशस्कूलचं फॅड

इमेज
  गावचा नामा त्या दिवशी बॅंकेच्या दारात भेटला.गडी जरा घाईतच होता.घाईत म्हणजे गरबडीत.हातात बरीचं कागद होती.त्याला बॅंकेचं कर्ज काढायचं असावं.मी सहज त्याला हटकलं. मी:अरे कर्ज कशाला काढतो?" तो:"कशाला म्हंजे...? पोरग टाकलं की शाळात" मी:"शाळात टाकलं ?त्यासाठी कर्ज ?" तो:"मग ?"इंग्लीश स्कूल मध्ये टाकलं.साध्या साळात नाही. रोज येतं की स्कूलबसात बसून पाटादयाला." मी: "किती पैसं भरलं ? तो:आता तुर्त भरलं पंच्चीस. पुन्हा दयाचेत वीस.तसं काय नाही .सारे संभाळून घेतात आपल्याला आपल्या रामाचं पोरग घेतलं की पियोन म्हणून चिटकवून." मी:"आरं, आता एवढ पैसं कशी आणणारेस वर्षाला ?" तो:"कसं म्हंजे? काय झाडाला तोडायचेत व्हयं ? उचल घेणारं .बायको भी समजदार. ती पण म्हंती काय भी करू.कुणाचा गू काढू पण पोरग इंग्रजीतच शिकू.मुकादम उचल देतो की.त्याच्या मेहूण्याचीच शाळा जनू" मी:" पोराचं काय वय?" तो:" चौथं लागलं असलं बघा आवंदा." मी: "अजून त्याचं वय नाही की झाली शाळाचं " तो:आता पोटातचं असल्या पासून शिकशान सुरू होतं.आ...

जगण्याचा आराखडा

इमेज
जगण्याचा आराखडा आयुष्तयं तर आपलं आणि आपलंच असतं ना?इतरांना ना आपण ते देऊ शकतो.ना इतरांच आयुष्य आपण घेऊ शकतो.आयुष्याचे क्षण ही मर्यादित आहे.त्यामुळे इतरांवर ते खर्च नाही झाले पाहिजेत. आपला गेलेला वेळ आपण परत नाही आणू शकत.त्यामुळे आपल्या जीवनाचा आराखडा आपणच आखला पाहिजे. इतर कुणी तो आखला नाही गेला पाहिजे.आपलं जगणं कुणी नियंत्रित तर करत नाही ना ? हे पण पाहयला हवं. पाहण्याची वगैरे काही गरज नाही. बहुतांश लोकांच्या जगण्यावर  इतर लोकांचं नियंत्रण असतंच.     ए-हवी आपण फार इगो पाळतो पण खरंतर आपण आपल्या दो-या इतरांच्या हातात कायमचं दिलेल्या असतात.कुणी तरी येतो आपली कुणाशी तरी तुलना करतो.स्तुती असेल तर अंहकाराचे पंख घेऊन आपण  हवेत तरंगू लागतो.तिच तुलना जर उलटी असेल तर द्वेषाच्या, मत्सराच्या आगीत जळू लागतो.तुलना करणा-यांने ठरवलेलं असतं याला आज हवेत तऱगत ठेवायचं की मत्सराच्या आगीत होरपळत ठेवायचं. का रागात तडफडत? आपण आज कसं जगायचं ह्याचं काही प्लॅनिंग आहे का आपलं स्वत:च?असलं तरी ते ढासळला जातं.आपण कुणाच्या तरी अंकित असतो.   कळसुत्री बाहुल्या़चा खेळ आपण पाहिलाच असेल. ज्याच्या ह...