पोस्ट्स

अंनतरावांच प्री-विडींग आणि आमचा रम्या

इमेज
 अंनतरावचं प्रि- विडींग आणि आमचा रम्या त्या अंबानींच्या पोटयाचं प्रि-विडींग लयईचं गाजलं.नट नि बीटं ,नट्या न्  बिटया...सा-या जगातलं टाॅपची सेलेब्रिटी तिथं आल्ते जणू. आपल्याला काय आमंत्रण बिमंत्रण नव्हतं.असल्या एकदम मोठ्या लोकांच्या लग्नात गावोगावी पंक्ती उठाया पाहिजेत. अन्न दान करायला पाहिजे.उग  म्या आपली आपेक्षा केली. तसल्या झंझटीत तसली मोठी लोकं कशाला पडतेलं? काही का असेना मला मात्र मेरा देश महानच्या खळाखळा उकळया फुटल्या हायती. त्याचं कारण मी तसंच हाय. हे अंनतरावाचं प्री -विडींग  सइम्पलं प्रोग्रॅम नाय.त्या प्रोग्रामनं देशाचं नाक भलं मोठं उंचावलयं‌. हलक्यात घेऊ नका.                   आपल्या देशास कमी समजण्याची टाप कुणी करायचं नाय.त्या भिकारडया पाकिस्तानात तर असं ग्रेट लगन पण कधी झालं असलं का? कवा होईल का? प्री-विडिंग तर सोडाचं. म्या तर नुसते ह्या प्रोग्रमचं फोटू पाकिस्तान्यांना टॅग करणार हाय. एक हजार कोटी का काय? नुसता खर्च झालाय जणू. या प्री-विडींगचा.जोक हाय काय? बजेट नसेल पाकडयांच इतकं. मला लग्नात  जायला भेटलं नाय म...

पक्षफुटी,सदू आणि बंडया

इमेज
पाराजवळ सकाळ सकाळ एक टोळकं जमा झालं होतं.सकाळ पासूनचं दोन चार गाबडी नुसती तोटं वाजवीत होतं. सकाळ सकाळचं ठो..ठो...  बारं व्हायला लागलेत म्हणल्यामुळे  गलका तर होणारच ना? त्यांच्या भोवती येणारी - जाणारी माणसं गराडा टाकित हुती.जसा जसा गरदा जमा होतं व्हता.तसं ती गाबडी चेकाळतं व्हती.त्या  रामा सावकाराच्या बंगल्याकून डीजेचा भी आवाज येतं हुता.नेमकं कशाचं काय ? हे ब-याचं जनाला कळतं नव्हतं.  सदू  यटण पाठीवर टाकून झपाझपा शॅतात निघाला होता.एवढा गराडा पाहून तेव्हं भी थांबला.उग आपला उल्लीकसा टायेम पास करावा म्हणूनचं तेव्हं तिथं घुटमळला व्हता. "अरं कमून  असं बारं करित्यात रं? "सबागती त्यांनी बंडयाला परशन केला. कुठं काय घडलं?त्याला काय माहित ? तेव्हं शेतकरी माणूस.लयं कुणाच्या राड्यात पडतचं नाय. "आरं काल मोठा भूकंप झालायं की...तुला नाय व्हवं ठावं?"बंड्या त्याच्या हातावर टाळी देत  बोलला.  "भूंकंप...??कुठं ?कवा ?" सदू हादरला ना?त्याला काही इश्यचं ठाऊक नव्हता.तेव्हं हादरायचं नाय तर काय?दोन च्यार थोबाडातून नुसते दातं विचकले.उगाच दाताड विचकल्यामुळे तर सदू  एकदमचं ...

राजकारण आहे की बहुरंगी बहुढंगी नाटक?

इमेज
हल्ली महाराष्ट्रात जनता सरप्राइज शाॅक खाऊन खाऊन घायाळ झाली आहे.उत्सुकता माणसाला पराकोटीचा आनंद देत असते.सस्पेंन्स..आता पुढे काय?  पुढे काय..?? पक्ष फुटला..आता राष्ट्रवादी कुणाची ? या प्रश्नांच उत्तर मिळवण्यासाठी कमीत कमी वर्ष  भरी तरी महाराष्ट्राला वाट पहावी लागेल.शिवसेना कुणाची या प्रश्नांच उत्तर अजून ही महाराष्ट्राला मिळाल नाही.ते मिळेलंच असं ही नाही.तो वरचं राष्ट्रवादी  पक्ष कुणाचा हा प्रश्न महाराष्ट्राच्या मानगुटीवर ठेवण्यात  आला आहे. काही प्रश्न कायम प्रश्नच राहतात.नव्या प्रश्नाला जन्म देतात. माणसं बारा बापाचे नसतात पण प्रश्न  बाराचंचे काय  शंभर बापाचेचं पण असतात.                 या  महाराष्ट्रात  मडकी फुटावीत तशी फटाफट पक्ष कसे काय फुटतात? एवढी प्रचंड गद्दारी  कशी काय होते?कोण गद्दार ? कोण खुद्दार ?असे प्रश्न मेंदूचा पार भूगा करत आहेत.चक्क वाघाची शिकार हरणं कशी काय करतात? सध्या महाराष्ट्रात काही घडू शकतं?तुम्हाला हरिण वाघाच्या बछड्याला दूध-भात भरवताना  लाईव्ह दृश्यं दाखवलं तर तुमचं कसं होईल? ...

इंग्लिशस्कूलचं फॅड

इमेज
  गावचा नामा त्या दिवशी बॅंकेच्या दारात भेटला.गडी जरा घाईतच होता.घाईत म्हणजे गरबडीत.हातात बरीचं कागद होती.त्याला बॅंकेचं कर्ज काढायचं असावं.मी सहज त्याला हटकलं. मी:अरे कर्ज कशाला काढतो?" तो:"कशाला म्हंजे...? पोरग टाकलं की शाळात" मी:"शाळात टाकलं ?त्यासाठी कर्ज ?" तो:"मग ?"इंग्लीश स्कूल मध्ये टाकलं.साध्या साळात नाही. रोज येतं की स्कूलबसात बसून पाटादयाला." मी: "किती पैसं भरलं ? तो:आता तुर्त भरलं पंच्चीस. पुन्हा दयाचेत वीस.तसं काय नाही .सारे संभाळून घेतात आपल्याला आपल्या रामाचं पोरग घेतलं की पियोन म्हणून चिटकवून." मी:"आरं, आता एवढ पैसं कशी आणणारेस वर्षाला ?" तो:"कसं म्हंजे? काय झाडाला तोडायचेत व्हयं ? उचल घेणारं .बायको भी समजदार. ती पण म्हंती काय भी करू.कुणाचा गू काढू पण पोरग इंग्रजीतच शिकू.मुकादम उचल देतो की.त्याच्या मेहूण्याचीच शाळा जनू" मी:" पोराचं काय वय?" तो:" चौथं लागलं असलं बघा आवंदा." मी: "अजून त्याचं वय नाही की झाली शाळाचं " तो:आता पोटातचं असल्या पासून शिकशान सुरू होतं.आ...
 ||आपुलाचं संवाद आपुल्याशी|| काल पूर्वसंध्येला एक भंयकर घटना या जगात घडली.माहितयं का तुम्हाला?भारत काल सिमी फायनल मॅच हारला. इतका महत्वाचा मॅच भारत हारूच कसा शकतो.राग ,संताप आणि त्रागा समाज माध्यमांवर उसळून आलेला पाहिलाच असेल.त्यात ही एक बरं झालं होत.हा मॅच पाकिस्तानासोबत नव्हता.नाहीतर भारतीय क्रिकेटपटूच काही खरं नव्हतं. भारत -पाक क्रिकेट मॅच युध्दा पेक्षा नक्कीच कमी नसतात.  खेळ म्हटलं की हारणं आणि जिंकण आलचं.खेळात कुणाला तरी हरावाचं लागणारं असतं.कुणी तरी हारल्याशिवाय कुणीतरी जिंकणार नसतंचं. हारणं तसं कुणालाचं आवडतं नसतं.खेळाडू कधीच पराभवाची भीक मागत नसतात.प्रत्येकालाचं जिंकायचं असतं पण कधी कधी पराभवाचा धोंडा पदरी पडतोचं.पदरी जे पडलं ते पवित्र करून घेण आवश्यक असते.कुठलाचं पराभव हा अंतीम नसतो तसाच विजय ही.  एखादी मॅच हरणं ही साधी गोष्टं असते पण हल्ली माणसं मॅच हारला की हताश होतात.रडतात.संतापतात.शिव्या देतात.फुकटचे सल्ले तर विचारूच नका.खेळात ही माणसं इतकं इमोशनल आणि गंभीर का होतात? कारण सध्या मॅच खेळले जात नाहीत तर लढले जातात.खेळाचे  सामने आपण युध्द करून ठेवले आहेत. खे...

नवं वर्षाच्या शुभेच्छा आणि बरचसं काही.....!!

 ||आपलाचं संवाद आपुल्याशी| नवं वर्षाच्या शुभेच्छा आणि बरचसं काही.....!! आज  नवीन वर्षाचा पहिला दिवस.काल वर्ष २०२२ गेलं.वर्ष २०२३ आलं.भिंतीवरलं एक कलेंडर गेलं नि नवीन आलं. उगवणारा सूर्य तोच असत़ो.त्यातून निथळणारा प्रकाश ही तोच असतो.पृथ्वीच्या परीवर्तन व भ्रमण गतीत काहीचं फरक पडतं नाही.सर्व भवताल जसा सदैव असतो तसाच असतो. फक्त नव्याचा भास असत़ो. सारं सारं नवं नवं वाटायला लागतं.हातातलं बरचसं निसटून गेल्यासारखं वाटतं.आयुष्याची ओंजळ हातात घेऊन आपण उभे असतो. ओंजळ ओली असते पण रितीच असते. काही क्षणांच्या अस्तित्वाची ओल सांभाळत. एक एक क्षण क्षण अलगद निखळून पडतात.गेलेले क्षण परतं येत नाहीत.आपल्याला हवे असलेले क्षण आपण पकडून ठेऊ शकत  नाहीत.नको असलेले क्षण रोखू शकत नाहीत.  या सृष्टी चक्रात तुम्ही भिंतीवरच कलेंडर बदल म्हणून काहीच घडणार नसतं.जे घडतं ते आपल्या मनाच्या अवकाशात. ते भास असतात.काही अभास असतात.नाहीतरी हे जग अभासाच्या हिंदोळयवरच झुलत असते.त्यात आनंदाचे,दु:खाचे क्षण आपण गोळा करत राहतो.काही क्षणांचे ठसे आपण मनावर छापून ठेवलेले असतात.काही क्षण मनावर ओरखडे उमटवून जातात. ...

सकारात्मक उर्जा

 || आपुलाच संवाद आपुल्याशी ||   माणसाच्या पाणी,अन्न,वस्त्र व निवारा या मुलभूत गरजा आहेत. गरजांचा प्राधान्यक्रम आपल्याला योग्य ठरविता आला की आयुष्याचं पलॅनिंग जमलच की.  हल्ली गरजांचा प्राधान्य क्रम ठरविताना आपला संभ्रम होतो आहे.आपण नेमकं इथचं  गोंधळून जात आहोत. या मुलभूत गरजा इतकचं सकारात्मक विचारांनाही आपणं प्राधान्य दिले पाहिजे.श्रींमतीत व ऐश्रर्यात लोळत असलेली व शरीराने धष्टपुष्टं असलेली माणसं ही  मनानं खचलेली असतात तर भिकारी,दरिद्री व विकलांग ही उत्तूंग स्वप्न उराशी बाळगून जग जिंकण्यासाठी धडपडत असतात. विचारांची उर्जा बाहेरून लपेटता नाही येत.सकारात्मकतेची कॅप्सूल किंवा टॅब्लेट नसते बाजारात.ती अंतरंगातूनचं उसळावी लागते.मानवी पण हे प्रचंड उर्जेचा स्त्रोत आहे. मन ती उर्जा बाहेर फेकत असते.तिच उर्जा माणसाला आतून पेटवते,तेवत ठेवते.प्रखर करते.चकाकी आणते.   उलट नकरात्मक उर्जा माणसाला  काळवंडून टाकते.काजळून टाकते.ग्रासून टाकते. निस्तेज करते. शेवटी माणसाच्या विझण्याचे कारण ठरते.   सुविचार वाचून माणसं सुविचारी होत नाहीत.शाळकरी जीवनात काय आपण कमी सुविच...