पोस्ट्स

मनोज जरांगेचा जीव महत्वाचा: आरक्षणाच्या लढ्याचे नायक

इमेज
  म नोज जरांगेचा जीव महत्वाचा: आरक्षणाच्या लढ्याचे नायक मनोज जरांगे, मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील प्रमुख चेहरा, आज केवळ एका व्यक्तीचा नाही तर लाखो मराठा समाजाच्या हक्कासाठी लढणाऱ्या आवाजाचा प्रतीक बनला आहे. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून आंदोलनाचा एक सशक्त लढा उभारला आहे. त्यांच्या या संघर्षामुळेच मराठा समाजाचे हित सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सरकारवर मोठा दबाव आला आहे. जरांगे यांनी आपल्या आंदोलनादरम्यान केलेल्या उपोषणामुळे शारीरिक अवस्था खालावली, ज्यामुळे त्यांचा जीव धोक्यात आला होता. मात्र, त्यांचा जीव फक्त त्यांच्या कुटुंबापुरता मर्यादित नसून, मराठा समाजाच्या एकात्मतेचे प्रतीक बनला आहे. जरांगे यांचा जीव सुरक्षित राहणं म्हणजे मराठा समाजाच्या संघर्षाचं चालू राहणं आणि त्यांच्या मागण्यांसाठी लढण्याची शक्ती कायम राहणं होय. जरांगे यांचा जीव महत्वाचा आहे कारण त्यांची लढाई फक्त एका समाजापुरती मर्यादित नसून, हा लढा सामाजिक न्यायासाठी आहे. त्यांच्या नेतृत्वाने मराठा समाजातील असंतोषाला आवाज दिला आहे आणि त्या समाजाच्य...

कर्णाच्या भावविश्वाचं चित्रण करणारी कांदबरी –मृत्यूजंय

इमेज
"मृत्युंजय" ही शिवाजी सावंत यांनी लिहिलेली मराठी कादंबरी आहे, जी महाभारतातील कर्णाच्या जीवनावर आधारित आहे. ही कादंबरी कर्णाच्या जीवनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकते आणि त्याच्या संघर्षमय जीवनाची कथा सांगते. कर्णाच्या दृष्टीकोनातून लिहिलेल्या या कथेच्या माध्यमातून लेखकाने समाजातल्या विषमतेविरुद्धचा त्याचा लढा, त्याची दुःखे, त्याच्या नैतिकता आणि त्याचे विचार यांचा सखोल अभ्यास केला आहे. कथानक: "मृत्युंजय" कादंबरी सात भागांमध्ये विभागली आहे, आणि त्यामध्ये कर्णाच्या जीवनाचे विविध टप्पे उलगडण्यात आले आहेत. कादंबरीत मुख्यतः कर्णाचा संघर्ष, त्याचे दानवीरपण, त्याची मैत्री, त्याचे राजनिष्ठा आणि त्याच्या आयुष्यातल्या विविध घटना यांचा समावेश आहे. कर्णाला जन्मतःच समाजाने नाकारले, कारण त्याच्या जन्माची गोष्ट गुप्त ठेवली गेली होती. सूर्यदेवाचा पुत्र असूनही त्याला समाजात स्थान मिळाले नाही. त्याच्या अंगावर कवच कुंडले असतानाही तो आपल्या जन्माच्या सत्यामुळे अपमानित होत राहिला. मात्र त्याने स्वतःच्या सामर्थ्याने आणि निष्ठेने आपली ओळख निर्माण केली. कर्णाच्या जीवनातील मोठी घटना म्हणजे त...

सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!!

इमेज
  सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!! सरकारला विचार नसतात.राजकीय पक्षांना विचार असतात. तशी विशिष्ट विचारांची सरकार चालवायला अजिबात गरज नसते.सरकार हे आपल्याला घटनेशी प्रामाणिक राहूनच चालवायचे असते‌.घटनेतील उद्देश्यासाठी सरकारने प्रमाणिक काम करावे अशी अपेक्षा घटनेची आहे.सरकारने काय करावे,काय करू नये याचे नियम आहेत.कायदे आहेत.या देशात घटनेपेक्षा कुणी ही मोठा नसतो.जेव्हा कायद्याचा,पदाचा गैरवापर केला जातो आणि स्वायत्त संस्था जेव्हा सरकारच्या हाताच्या बटीक बनतात तेव्हा देश हुकूमशाहीच्या उंबरठ्यावर उभा असतो.या स्वायत्त संस्थेच्या खांद्यावर बंदूक ठेऊनच हुकुमशाही आपले पाय हळूहळू पसरत जाते.आपला झेंडा रोवत असते हे सा-या जगाने पाहिले आहे. हुकुमशाहीची सुरूवात घटना आपल्याला हवी तशी लवचिक करूनच होत असते.आपण लोकशाहीचे किती सुंदर गीतं गायली तरी हुकूमशाही आपली मूळं खोलवर रूजवत जात असते.एक कंपूशाही निर्माण होत जाते.दुर्बल,भित्रे,लाचार लोक कंपूशाहीत सामिल होऊन आपली जागा तयार करून घेतात.सोन्याच्या पिंजरा त्यांना महाल वाटु लागतो.त्यांना गुलामीची जाणीव होतेच असं नाही.झाले तरी ते हतबल असतात.  ...

अंनतरावांच प्री-विडींग आणि आमचा रम्या

इमेज
 अंनतरावचं प्रि- विडींग आणि आमचा रम्या त्या अंबानींच्या पोटयाचं प्रि-विडींग लयईचं गाजलं.नट नि बीटं ,नट्या न्  बिटया...सा-या जगातलं टाॅपची सेलेब्रिटी तिथं आल्ते जणू. आपल्याला काय आमंत्रण बिमंत्रण नव्हतं.असल्या एकदम मोठ्या लोकांच्या लग्नात गावोगावी पंक्ती उठाया पाहिजेत. अन्न दान करायला पाहिजे.उग  म्या आपली आपेक्षा केली. तसल्या झंझटीत तसली मोठी लोकं कशाला पडतेलं? काही का असेना मला मात्र मेरा देश महानच्या खळाखळा उकळया फुटल्या हायती. त्याचं कारण मी तसंच हाय. हे अंनतरावाचं प्री -विडींग  सइम्पलं प्रोग्रॅम नाय.त्या प्रोग्रामनं देशाचं नाक भलं मोठं उंचावलयं‌. हलक्यात घेऊ नका.                   आपल्या देशास कमी समजण्याची टाप कुणी करायचं नाय.त्या भिकारडया पाकिस्तानात तर असं ग्रेट लगन पण कधी झालं असलं का? कवा होईल का? प्री-विडिंग तर सोडाचं. म्या तर नुसते ह्या प्रोग्रमचं फोटू पाकिस्तान्यांना टॅग करणार हाय. एक हजार कोटी का काय? नुसता खर्च झालाय जणू. या प्री-विडींगचा.जोक हाय काय? बजेट नसेल पाकडयांच इतकं. मला लग्नात  जायला भेटलं नाय म...

ऐ,प्रभू,तूझं आम्ही मंदिर बांधलयं.

इमेज
  तू देव आहेस तू परमात्मा आहेस आम्ही जीवात्मा.... तूच हे सर्व तूच आहेस ना रे सर्वत्र? तू चराचरात ओतप्रोत भरलेला... इथल्या कणाकणात सामावलेला... पेशीपेशीत तू पेशी द्रव्याच्या अणू रेणूत ही... काय? भक्तांच्या ह्रदयात श्वासात तुच असतोस मग हे मंदिर आम्ही कशाला बांधलंय? असं का विचारतोस? पाचशे वर्ष झालयं तुझं मंदिर आम्ही बांधू शकलो नाहीत. ऊन,वारा,पाऊस,वादळ... सारं तू सोसत आलास तक्रार नाही केलीस कधी तू. आम्ही टोलेदार बंगल्यात राहीलो. एसीत रूम मध्ये राहिलो पण तुला मंदिर नाही ही खंत होतीचं की सदैव. तू परामात्मा असला म्हणून काय झालं? तुला  मी मंदिर पाहिजे ना. गावागावात, गल्लोगल्ली,घराघरात तुझं मंदिरे आहेतच ना. देवा-हयावर ही तू असतोस पण अयोध्येत मंदिर पाहिजेचं होत तुझं. आता आम्ही एक तुझं भव्य मंदिर बांधलंय. सोहळा साजरा करतोय आम्ही भव्यदिव्य....जबरदस्त. एकदम शाहीथाटात. काय म्हणालास? देह हेच मंदिर असतं तुझं..! हो मान्य की, पण तुझं मंदिर तुला हवं की नाही पण ते आम्हाला हवं असतं. भक्तीभावांन माथा टेकायला कधी लोकांची माथी भडकायला तू हवाच असतोस ना आम्हाला हिंदूत्वाची आग पेटायला. हे जग पण पेटतं रा...
इमेज
 नविन वर्षाच्या शुभेच्छा......!!! आज नवीन वर्षाचा पहिला दिवस.रात्री वर्ष २०२३ गेलं.वर्ष २०२४ आलं.बाय बाय २०२३  व वेलकम २०२४.. रात्री बारा वाजता घसाफोड ही झाली.नाचून झाल.गाऊन झालं. जग कैफात बुडालं.  भिंतीवरलं एक कॅलेंडर गेलं नि नवीन कोर करकरीत कॅलेंडर आलं. बस्सं एवढच घडलं. उगवणारा सूर्य तोच असत़ो.त्यातून प्रसवणारा  प्रकाश ही तोच असतो.पृथ्वीच्या परिवलन व भ्रमणगतीत काहीचं फरक पडतं नसतो.सर्व भवताल जसा सदैव असतो तसाच असतो.फक्त नव्याचा भास असत़ो. प्राणी पक्षी कीटक यांना नविन वर्षांचं भान नसतं.माणसाला मात्र २०२३ सरलं म्हणून दु:ख होतं.वर्ष २०२४ आलं म्हणून आंनदी ही होतो.काळ तशी मानवी कल्पनाचं. माणसांन त्याला ही आकार दिला.उकार दिला.आपला सखा-सखी करून माणूस त्याच्या प्रेमात ही पडला. नविन  सालकडून तर किती अपेक्षा....!! निरपेक्ष प्रेम हल्ली कुठं राहिलंय? सारं शुभ मंगलच घडावं अशी अपेक्षा.अशुभ आमच्या ओंजळीत टाकू नको रे बाबा...!! खरंतर अनंत ब्रम्हाडांत दिवस उगवत नाही.दिवस मावळत नाही.काळाच्या अनंत रेषेवर ब्रम्हांड सरकते आहे.असेच सरकत राहणार आहे अनंत काल.      आपल्य...

भिमा,तू असा सूर्य आहेस .

इमेज
  भिमा  तू, एक असा सूर्य आहेस की मावळलास किती वर्ष झाले तरी अजून ही तुझा तो प्रकाश  तसाच आहे. प्रखर होत गिळतोच आहे अंधार...  ती आग .... अधिकचं तीव्र होतेयं. युगानुयुगे तू तसाच तेवत राहणार आहेस कारण अंधाराच्या गर्भातच पेरलीस  तू प्रकाशाची बीज. ही पहा ना... फुललेली असंख्य फुले प्रकशाची. अंधार तर संपेलच ना आता एक दिवस... आमच्या जीवनातला या जगातला .....       परशुराम सोंडगे,बीड .