तुला पहाते रे

#TulaPhateRe तुला पहाते रे एका अतृप्त आत्म्याची प्रेम कथा मी पराग.नवीन शहर, नवा जाॅब.पुणे हे माझ्यासाठी नवीनचं शहरं होतं. पुण्याला,जाॅब लागला आणि एका अपार्टमेंटमध्ये मी खोली घेतली ती पण तिसऱ्या मजल्यावर.पहिलाचं दिवस होता.झोप येत नव्हती. नविन जागा म्हटलं की झोप सहसा लागत नाही.जागाचं होतो.बाहेर लख्ख चांदण पडलं होतं.मी खिडकीत उभा राहिलो.बाहेरच्या अंधारात काहीतरी हलतंय असं वाटलं.माझं लक्ष गेले.बाजूच्या गॅलरीत एक सुंदर स्त्री उभी होती.ती टक लावून माझ्याकडेच पहात होती.एकटक .!! मी तर घाबरलोच.अशी अनोळखी स्त्री अशी आपल्याकडे पहाते आहे ही कल्पनाच मला विलक्षण व विचित्र वाटली.असल्या चांदण्या रात्री. 'तुला पहाते रे' मी फार वेळ तिच्या कडे पाहू शकलो नाही. नजरानजर झाली.चक्क तिन मंद स्मित केल.माझ्या अंतरंगात अनोख चांदण बरसून गेलं.ती कुमारिका नव्हती तरी मला ती खूप आवडली.कुणी पहाते आहे म्हणून आपल्या प्रेमात आहे असं कसं समजावं? असा मी कोण लागून गेलो होतो?पहिल्याच नजरेत माझ्या कुणी परस्त्री प्रेमात पडायला?तिच्याकडे पाहण्याचं मला धाड...