देव,नरेंदमोदी आणि भाविक भक्त महेश कोठारे

 देव,नरेंदमोदी आणि भाविक भक्त महेश कोठारे ************************************* तुम्हाला  माहित का? पंतप्रधान  पण बिचारे असतात.क्काय..?? खरचं..!!! सारी टीकाचं त्यांच्या वाट्याला येते.कधी कधी त्यांची पण स्तुती केली पाहिजे.त्यांना पण आपल्या कौतुकाचे दोन शब्द ऐकायचे असतात. का ते माणूस नसतात का?  खरंतर अशी मोठी माणसं दोन कौतुकाच्या शब्दांसाठी आसुसलेले असतात.पंतप्रधानाचे पण भक्त असतात. भक्ताची मांदियाळी कुणाला नको असते बरं?

Narendra Modi and Mahesh Kothare


 भक्तात  अंधभक्त नि डोळस भक्त असे प्रकार करू नका.भक्ती ही आंधळीच असते. भक्ताकडून आपल्या आरत्या करून घेणं देवाला आवडतं तसं आपले पोवाडे केलेले कोण्या राजाला आवडत नाहीत?  राजाचं काय घेऊन बसले?आमच्या ऑफीसात आमच्या बाॅसचा एका  टिमके नामक कर्मचाऱ्यांने पोवाडा लिहीला.नुसता लिहिला नाहीतर  तो  जाहीर पणे गाऊन दाखवला. बाॅसची स्वारी खूश..!! मोगँबो खूश हुआ..!! त्या टिमके नावाच्या कारकुनाचे ऑफिसातले महत्व फार वाढले हे सांगणे नको. भक्तीत एक विलक्षण ताकद असते.  आमच्या ऑफिसातील सुंदर चेहरा असलेल्या सुजाता मॅमने मग साहेबाची आरती लिहीली. त्या कायम ती आरती म्हणत असतं.आरतीने  देव प्रसन्न होतो तर आमचं ढेरपोटं साहेब काय चीज ? झाले ते प्रसन्न.. !! परिणामी तिचं प्रमोशन ही झाल.राज्यस्तरीय  पुरस्कारासाठी  नामांकन ही झालं. नामांकन झालेल्या सुंदर बाईला पुरस्कार  न मिळणं अशक्यच असतं.काही पुरस्कार  हे सुंदर स्त्री चेह-यासाठी पण राखीव असतात काय? शंका माझी. देव भक्तीचा भुकेला असतो.बाॅस...?? त्याला अपवाद कसा राहिलं?झालं बाॅसच्या आरत्या नि पोवाडे लिहीण्याची स्पर्धाच सुरू झाली आमच्या ऑफीसात.बाॅसला जे आवडत ते देणं त्यात काय गैर होतं. बाॅसच्या भक्तीत तरी काय गैर? गणपतीच्या आरती म्हणताना सुध्दा टाळी मनोभावे न वाजवणारे असतातच की. काही भक्ताचे लक्ष फक्त प्रसादावरच असतं. तसं आरत्या न करणं.पोवाडे न गाणे असा  किडा काही माणसात मुळातचं असतो.आरत्यांचे व पोवाडे पेव फुटले की तो जास्त वळवळ करत असतो. स्वभावाला औषध नसतच की.  असे दैत्यस्वरूप माणसं आमच्या ही ऑफीसात होतेच.परिणामी  त्यांच्यावर बाॅसची वक्रदृष्टी पडे. जशी दिव्यदृष्टी असते तशी वक्रदृष्टी पण असते देवाला.सारेच देव सदैवचं क्षमाशील  राहतीलच असं नाही.त्यामुळे बाॅसला ही तुम्ही अपवाद नका समजू. जे पिंडी तेच ब्रम्हांडी..!! असं वेदांत सांगतो. जे आमच्या ऑफीसात घडते आहे.तेच या देशात घडते आहे. तेच या ब्रम्हांडात घडते आहे. ऑफीस जसं या आपल्या ब्रम्हांडात आहे तसे आपला देश ही आहे.  त्यामुळेच पंतप्रधानाला पण भक्त असतात.भक्तांना आपल्या भक्तीचा माज ही असतो.माज कधी सुप्त राहत नाही. तो उफाळून  येतो. भक्ती असेल नाहीतर प्रेम  प्रदर्शन  हवचं असतं माणसाला. कुणी जर आपल्या भक्तीचा प्रदर्शन मांडलं तर कुणाच्या पोटात नाही दुखलं पाहिजे.  काही कारण ही नाही पण कारणाशिवाय घडणारी घटना जगात कोणती असेल तर ती आहे अश्या विरोधकांची पोटदुखी..!! काय करणार? या भक्ताच्या भक्तीला महाराष्ट्रभूषण या पुरस्काराचा वास येतोय असे काही लोक म्हणतात.  ते भक्त म्हणजे...!! महेश कोठारे नि त्यांचे देव म्हणजे साक्षात परमपूज्य नरेंद्र मोदी महाराज. हे तर घडणारच ना? देव भक्तीचा भुकेला असतो. आपलं कौतुक करावं असं कुणाला वाटत नाही? रावाला वाटतं.रंकाला वाटत? वेडयाला वाटत नि विद्वानाला वाटत.फलाची अपेक्षा न करता कर्म करा हे शक्यं का? कर्मवादातला हा मूलमंत्र असला तरी तो व्यवहार्य आहे का?  पंतप्रधानाचं कौतुक एखाद्या भिका-याने करावं. त्याचं रडगाणं न गाता.त्यांनं आपलं दुःख वेदना विसरून महान माणसाचं थोरपण जगाला सांगत सुटावं. ही सहज घडणारी घटना थोडीचं असते, त्यात पण त्याग नि अस्सिम धैर्य असतं.इतकी निस्सीम भक्ती 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

युध्द पेटले आहे – जगण्याचा चंग आणि संघर्षाच्या गर्जना करणा-या माणसांच्या कविता.

धर्मयोगिनी अहिल्यादेवी- आजच्या पिढीला मूल्यांचा आरसा दाखवणारं पुस्तक

जत्रातील प्रेमाची गाेष्ट