DNA आख्यानं

 DNA आख्यान

DNA

तुमचा डीएनए  कोणता? असा प्रश्न कुणी तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय करणार? आहो,दात ओठ काय खाता? सध्या हा प्रश्न कुणी ही कुणाला विचारू शकत? DNA ही गोष्टं तितकीशी  खाजगी पण राहिली नाही.

ती एक सार्वजनिक  बाब झाली आहे. जीवाचा व त्याचा वंशवृक्षचा डीएनए असतो.DNA ची  एक लिपी पण असते.तिचे अर्थ ही उमगले आहेत.DNA ही एक सूक्ष्म जीवशास्त्रीय  संज्ञा आहे.

विज्ञान या क्षेत्रात  प्रचंड  गतीने प्रगती करत आहे. DNA चे आख्यान व ज्ञान पाजळण्याचा हेतू नाही माझा.मग कोणता हेतू?

 ..तर राजकरणात या DNA शब्दांचा फार वापर सुरू झाला आहे.महाराष्ट्राच्या झणझणीत  राजकीय  भाषेत  DNA ला पर्यायी शब्द आहे आवलाद. जीनस्...??

म्हणजे तुमची अवलाद कुणाची आहे? असा प्रश्न कुणी विचारलं तर लयं गरम नका होऊ.

 कुणी कुणाच्या अवलादीवर जाऊ नये.सध्या सर्रास माणसं आवलादीवर जातात.जे जातात त्यांना ही फॉलोअर्स प्रचंड  संख्येने आहेत. लोकशाहीत शेवटी आकडा महत्वाचा असतो. त्यामुळे त्यांचे ही बाहू स्फुरस्फुरतात.

नुसता जीव व वंशवृक्ष यांनाच डीएनए नसतो तर राजकीय पक्षाला पण DNA असतो.संघटनेला पण DNA असतो.जातीला-पातीला तर तो असतोच. हे तर काही नाही प्रवर्गाला पण डीएनए असतो. एखाद्या प्रवर्गात,400 जाती असल्या तरी त्यांचा एकच डीएनए  असतो. जातीचा वेगळा,पातीचा वेगळा,तुमच्या कुळाचा गोत्राचा वेगळा. तुम्ही  कुठ राहतात यावर ही तुमचा एखाद डीएनए  असू शकतो. तुमची जात कोणत्या प्रवर्गात  येते त्यांचा पण डीएनए  असतोच की.

कुणा पक्षाचा डीएनए ओबीसी असतो.तर कुणा पक्षाचा तो नसतो.

कुणाचा डीएनए  निजामाचा असतो कुणाचा औरंग्याचा...!! कुणाचा इंग्रजांचा.. कुणाचा पाकडयांचा...!!   तर कुणाचा बंगाली. कुणाचा कोणता ही डीएनए असू शकतो. असे सर्व प्रकारचे आनले डीएनए माहित असावेत. त्या शिवाय मतदान कसे करावे हे कसे कळेल? आपला डीएनए  असलेल्या पक्षांच्या माणसालाच आपण मतपान करावे ना? चुकून नये असे काही...!!

आता इलेक्शन आलं.पक्षांनी  सुध्दा मतदाराचे डीएनए  तपासून द्यावेत मतदारांना. कुणाच्या डीएनएची किती माणसं गावनिहाय कळतील 

आपल्या डीएनएची कितो माणसं गाव निहाय कळतील? राजकरण खेळताना सोप जाईल? डीएनए  तपासल्यावर कोणत्या पक्षाचे किती लोक आहे कळेल. गुप्त प्रचार जो प्रकार असतो इलेक्शन मध्ये त्या प्रचाराची तंतोतंत  प्लॅनिंग  करणं सोप जाईल.

मानववंशास्त्र वापरून सा-याचं भारतीयांचा एकदा डीएनए, तपासला गेला तर...??? किती सोप्या असेल निवडणूका? कुणाचा डीएनए श्रेष्ठ याचे पण नवे वाद उभे करता येतील. त्यामुळे राकारण सुलभ होईल.बघा, हा माझा सल्ला आहे.

फुकटचा आहे. 

            परशुराम सोंडगे, बीड

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

युध्द पेटले आहे – जगण्याचा चंग आणि संघर्षाच्या गर्जना करणा-या माणसांच्या कविता.

धर्मयोगिनी अहिल्यादेवी- आजच्या पिढीला मूल्यांचा आरसा दाखवणारं पुस्तक

जत्रातील प्रेमाची गाेष्ट