तुफानातील दिवे

 तुफानातील दिवा...!!!

अंधार दाटला आहे. गच्च  सभोवती.अशात उजेडाची सुतराम शक्यता नाही.अश्या काळया कुट्ट अंधारात  एक पणती तेवत आहे.

तेवढयात वादळ ही सुटलं आहे.

आता कसं तेवायचं..??

कसं अंधाराच्या उरावर नाचायचं..???

अंधार असो नाहीतर वादळ असो. ते क्रूरचं असतं.

ते तेवत राहिले..

भिडत राहिले....

इवलीशी पणती शरण येत नाही.हा कदाचित तिचा विजय नसतो पण त्या क्रूर अंधाराचा नि वादळाचा सपशेल पराभव नक्कीच असतो.

Sanjay Raut


संजय राऊत साहेब,

तुम्ही अनेकदा पराभूत केले या भयंकर संकटांना.

तुमची झुंज फार कडवी. तुमच्या रक्तातचं आहे ती.

तुम्ही या गंभीर आजाराला हरवून ही लवकर बरे व्हालं असा विश्वास ही आहे.

पण काही छोटी माणसं मात्र...

तुमच्या आजाराला राजकीय संधी बनवतायत. कीचड उडवतायत. दिल ही छोटासा है..!!

खरा योध्दा तर आपल्या शत्रूवर  ही प्रेम करतो. तेच तर खरं शौर्याचं तेज असतं.

आज राजकारण बाजूला ठेवूया.माणुसकी पुढे येऊ द्या. 

मा.पंतप्रधान नरेंद मोदींनी लवकर बरे होण्येसाठी  शुभेच्छा दिल्या.पवार साहेबांनी फोन केला.फडणवीसांनी संवेदना  व्यक्त केल्या.हीच महाराष्ट्राची शान आहे.हीच भारताची माणुसकी आहे.

शेवटी माणुसकी जिंकते..!! प्रेम जिंकते..!!

 द्वेष नाही..!!!

परशुराम सोंडगे ,बीड

🙏 #GetWellSoonSanjayRaut

🙏 #मानवता_जिंकते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

युध्द पेटले आहे – जगण्याचा चंग आणि संघर्षाच्या गर्जना करणा-या माणसांच्या कविता.

धर्मयोगिनी अहिल्यादेवी- आजच्या पिढीला मूल्यांचा आरसा दाखवणारं पुस्तक

जत्रातील प्रेमाची गाेष्ट