तिने केले बाॅयफ्रेंडच्या प्रेतासोबत लग्न
मानवी भावना मध्ये प्रेम ही अतिशय उत्कट भावना आहे.कोवळया वयात ही भावना अधिक मनावर गारूड करते.आई वडीलांवर-मुलांच प्रेम, बहीण भावाचं प्रेम, या सा-यात मुलं मुलीच प्रेम असतं.त्याच्या,लौकिक कथा आपण चित्रपटातून पहात असतो. प्रेम अजिंक्य असतं. प्रेम उदात्त असत असचं आपल्याला वाटत आलेलं आहे पण प्रेम ही माणसाच्या मनाची अवस्था आहे. मन बदल की प्रेम ही बदलत.कमी वयात जे प्रेम होत ते शारीरिक आकर्षणचा भाग असतो. ते आकर्षण कमी झालं की प्रेम ही विरत जातं. खर प्रेम असतच नाही.असा दावा केले आहे विश्वासाचं धागे अधिक घट्ट झाले की प्रेम अधिक दृढ होत जात.
![]() |
| She,married, with boyfriends corspe |
नांदेड२शहरात,८ नोव्हेंबर २०२५ रोजी घडलेल्या एका प्रेमप्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. प्रेमसंबंध आणि जातीय विखारामुळे एका तरुणाची निर्घृण हत्या झाली, आणि त्याच्या प्रेयसीने त्याच्या पार्थिवाशीच प्रतीकात्मक लग्न करून आपल्या प्रेमाची अमर कबुली दिली. ही घटना सैराटसारखी वाटते, पण तिचा शेवट अत्यंत दर्दनाक आहे. चला, या घटनेची संपूर्ण कथा सांगतो...
प्रेमाची सुरुवात: तीन वर्षांची प्रेमकथा
आचल मामीडवार (वय २१) आणि सक्षम ताटे (वय २०-२५). हे दोघे नांदेडमधील रहिवासी असून, गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंधात होते. सक्षम हा आचलच्था भावाचा मित्र. या स्नेहसंमेलनाच आचल व सक्षम मनी जुळली. ते एकमेकांवर प्रेम करूल लागले.आंचल उच्च जातीची, तर सक्षम दलित समाजातील.
या विजातीय प्रेमाला आंचलच्या कुटुंबाचा तीव्र विरोध होता. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, पण कुटुंबीयांना ही बातमी कळताच संताप उफाळला. त्यांच्या प्रेमाला घरातून माझ्या मिळाली नाही.उलट संताप वाढत गेला. आपल्यासोबत येऊनच आपल्या बहिणवर प्रेमाचं जाळं टाकणा-या सक्षमचा राग सा-यांनाच आला. आचलला प्रेमाच्या या गावापासून बाहेर काढण्यासठी प्रयत्न झाला. आचल व सक्षम याचं प्रेम अधिक दृढ होत गेले. प्रेमाला विरोध झाला की ते अधिक बहरत तसच हे झाल.
२८ नोव्हेंबर २०२५, संध्याकाळी.आंचलचे वडील गजानन मामीडवार, भाऊ साहिल मामीडवार आणि त्यांचे साथी सोमेश लाखे, वेदांत कुंदेकर यांनी सक्षमला फसवून घरी बोलावलं. त्यांना आंचलच्या घरी नेलं गेल्या. सक्षमला प्रथम गोळ्या घालून जखमी केलं. नंतर त्याच्या डोक्यात दगड घालून त्याला ठार मारलं. हे सर्व आंचलच्या घरातच घडलं.सक्षमचा मृतदेह रस्त्यावर फेकला गेला.आचलला तिच्या घरातच सक्षमचा मृतदेह दाखवला गेला. तिने पोलिसांना सांगितलं की, तिच्या कुटुंबीयांनीच हे कृत्य केलं आहे. आपला प्रियकर,रक्ताच्या,थारोळ्यात पाहून भय आणि संतापाच्या लाटा आचलच्या मनात उठणार साहजिकच होतं. आपल्या प्रेम असं हिरावून घेतलं गेले आहे ही बाब आचल सहन होत नव्हती.,आपलं प्रेम अमर आहे. सक्षम जरी राहिला नसला तरी त्याचं प्रेम आपल्यासोबत कायम राहणार.मी सक्षमची होऊनच राहणार.मी सक्षमच्या घरी जाऊन राहणार.आचल कमालीची भावूक झाली. तिनं आचलच्या प्रगतिशील लग्न लावून घेतले.सक्षमच्या नावाने कुंकू लावून घेतले ती सक्षमची सौभाग्य वती बनली हा लग्नाची विधी: २९ नोव्हेंबर २०२५ रोजी, सक्षमच्या अंत्यसंस्कारापूर्वी आंचलने एक असामान्य पण भावनिक निर्णय घेतला. तिने सक्षमच्या पार्थिवाला हळद लावली, कपाळावर कुंकू भरलं आणि प्रतीकात्मक लग्नाचे विधी पार पाडले. "आमचं प्रेम अमर आहे," असं म्हणत तिने हे लग्न केलं.
भावना: हे पाहून उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले. आंचलने सांगितलं, "सक्षम माझ्या प्रेमात जिंकला. मी त्याच्याशिवाय जगणार नाही." लग्नानंतर तिने सक्षमच्या घरी राहण्याचा निर्णय घेतला, जणू त्याच्या आठवणींशी जोडून राहण्यासाठी. व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. अनेकांनी आंचलच्या धैर्याची प्रशंसा केली, तर काहींनी कुटुंबाच्या क्रौर्यावर संताप व्यक्त केला.
आचलने पोलिसांना आणि माध्यमांना सांगितलं, "माझ्या वडिलांना आणि भावाला फाशी द्या. त्यांनी माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं." तिने गुन्हा दाखल केला आणि दोषींना कठोर शिक्षेची मागणी केली.
पोलिस कारवाई: नांदेड पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गजानन मामीडवार, साहिल मामीडवार, सोमेश लाखे, वेदांत कुंदेकर आणि एका अन्य व्यक्तीला अटक केली. हत्येचा गुन्हा (IPC ३०२) दाखल झाला असून, तपास सुरू आहे. पोलिस म्हणतात, "हे प्रेम-सन्मान हत्येचं प्रकरण आहे. सत्य बाहेर काढू."
ही घटना महाराष्ट्रातील जातीय विखार आणि प्रेमाला होणाऱ्या विरोधावर प्रकाश टाकते. आंचल-सक्षमची कथा सैराट चित्रपटाची आठवण करून देते, पण वास्तविक आयुष्यात तिचा शेवट किती वेदनादायक आहे!
नांदेडमध्ये या प्रकरणाने खळबळ उडाली असून, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेतेही यावर बोलत आहेत. आंचलला न्याय मिळावा, हीच अपेक्षा. प्रेम ही भावना उत्कट व,उदात्त असली तरी सक्षम या जगात नसताना अवघड आयुष्य आचलला फक्त,त्याच्या,आठवणीत कर्जावर लागणार आहे .आज दोन्ही कुटूंबातील सदस्य तिचा द्वेष करत आहे तिचं वय लहान आहे. तिला नक्कीच तिच्या पुढे काय,काय वाढून ठेवलं आहे याची जाणिव नाही.
जग इतक चांगल थोडच आहे?


टिप्पण्या