पोस्ट्स

डिसेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एका काॅलगर्लची डायरी भाग 2

इमेज
एका काॅलगर्लची  डायरी                                                                         भाग -2 ब्ल्यूस्टार हॉटेलच्या भव्य हॉल मध्ये लग्‍नाच्या गर्दीत राधा मॅडमला अचानक आवाज आला.त्या वर्दीतच होत्या.त्याचं एकमेव महिला त्या लग्नात असतील की त्या साडीत नव्हत्या.नटलेल्या,सजलेल्या नव्हत्या. त्या ऑनडीयुटी सहभागी झाल्या होत्या.त्यामुळे वर्दीतच होत्या. “तुम्ही राधा.. देसाई ना?”ओळखीचा चेहरा.ओळखीचा आवाज.कोण असावा याचा अंदाज त्या बांधत बसल्या.खरतर त्यांना काहीच आठवत नव्हतं.गर्दीत असं कुणी तरी अचानक येते आणि डायरेक्टं नावानंच बोलत.त्यावेळी इतकं गोंधळून तर माणूस जाणारच ना?एक सुंदर बांधेसूद तरूण महिला त्यांच्याकडे हासत येत होती.काही क्षण त्या नुसत्या तिच्याकडे पहात राहिल्या.त्या एकटयाचं तिच्याकडे पहात नव्हत्या.अनेक नजरा तिच्यावर खिळल्या होत्या.ती बाई नटलेली असली तरी ओव्हर मेकअप मुळीच के...

रावण: राजा राक्षसांचा वेगळा दृष्टीकोन देणारी कांदबरी

इमेज
 रावण: राजा राक्षसांचा वेगळा दृष्टीकोन देणारी कांदबरी शरद तांदळे यांची रावण राजा राक्षसांचा (४३२ पृष्ठे, न्यू एरा पब्लिशिंग हाऊस) ही कादंबरी मराठी साहित्यातील एक महत्त्वाची संशोधनात्मक कृती आहे. पारंपरिक रामायणात रावण हा केवळ अहंकारी खलनायक म्हणून दाखवला जातो, पण तांदळे यांनी रावणाच्या दृष्टिकोनातून त्याचे पूर्ण जीवन चित्रित केले आहे. ही कादंबरी रावणाला एक महान नेता, विद्वान, शिवभक्त आणि न्यायप्रिय राजा म्हणून उभी करते, ज्याने दैत्य, दानव, असुर आणि भटक्या जमातींना एकत्र करून सोन्याची लंका निर्माण केली. लेखकाने अनेक पौराणिक संदर्भांचा अभ्यास करून काल्पनिक अतिशयोक्ती टाळली आहे, ज्यामुळे कथा वास्तववादी आणि विचारप्रवर्तक वाटते. Ravan:Raja Rakshncha Novel कादंबरी रावणाच्या बालपणापासून सुरू होते – त्याच्या कौटुंबिक कलह, आई-वडील, आजोबा सुमाली आणि भावंडांशी असलेले नाते. रावण हा ब्राह्मण वंशज असूनही राक्षस संस्कृतीत वाढतो. त्याची महत्त्वाकांक्षा, ज्ञानाची भूक आणि अन्यायाविरुद्ध बंडखोरी यातून तो लंकेचा राजा बनतो. तो देवांना पराभूत करतो, पण त्याचे निर्णय नेहमी न्याय आणि स्वाभिमानावर आधारित अस...

एका काॅलगर्लची डायरी - भाग 1

इमेज
  भाग एक Callgril काॅलगर्ल पहाटेचे पाच वाजले होते.पूर्वेला तांबडा रंग दाटून आला होता.वारं मंद वाहत होतं.थंडी ही चांगलीचं बोचत होती.स्वेटर,मफलिरी गुंडाळून माणसं चालत होती.स्ट्रीट लाईट जळत होत्या.गुलमोहरांच्या फुलांचा खचीचं खच पडला होता रस्त्यावर.कुणाकुणाच्या दारात पारिजाताकांचा सडा पडला होता.त्यांचा मंद पण धूंद गंध मनाला मोहित करीत होता.पाच वाजून गेल्या होत्या तरी माणसांची वर्दळ फारसी नव्हती.तुरळक तुरळक माणसं टोळक्या टोळक्यांनी चालत होते.काही नवीन पोरं पळूपळू घाम काढीत होते.            राधा देसाई ही जाँगींग करत होत्या.रनिंग केल्यामुळे अंग सारं घामेजून गेलं होतं त्यांच.अंग सारं  थबथबलेलं होतं.थोडसं थकल्या ही होत्या त्या.तेवढयात मोबाईल वाजला.               इतक्या सकाळी फोन एकतरी घरीहून तरी असावा नाहीतर पोलिस स्टेशनवरून तरी.दुसरा कॉल या नंबरवर शक्यचं नव्हतं कारण त्यांचा हा प्राव्हेट नंबर होता.अश्या ऑफिसर्सना असे फोन ठेवावेच लागतात.त्या थोडया थांबल्या.कॉल रिसिव...

एपस्टीन फाइल्स १९ डिसेंबरला उघड: भारतातील सत्तापालटाची अफवा की सत्य? पूर्ण विश्लेषण

इमेज
  जगाच्या राजकारणात काही तारखा अशा असतात, ज्या केवळ कॅलेंडरवरच्या आकड्यांपेक्षा जास्त काही दर्शवतात. १९ डिसेंबर २०२५ ही अशीच एक तारीख ठरली आहे, ज्याकडे केवळ अमेरिकेच नव्हे, तर जगभरातील अनेक देशांच्या राजकीय वर्तुळांचे लक्ष लागले आहे. अमेरिकेतील कुख्यात जेफ्री एपस्टीन सेक्स स्कँडलशी निगडित गोपनीय कागदपत्रे – ज्यांना 'एपस्टीन फाइल्स' म्हणतात – या दिवशी अमेरिकन न्याय विभागाकडून (DOJ) सार्वजनिक होण्याची शक्यता आहे. ट्रम्प प्रशासनाने नोव्हेंबरमध्ये 'एपस्टीन फाइल्स ट्रान्स्परन्सी अॅक्ट' कायद्यावर स्वाक्षरी केली, ज्यामुळे ३० दिवसांत ही फाइल्स उघड करण्याची बंधनकारकता आली. आता वेळ जवळ आली आहे, आणि या फाइल्समधून काय बाहेर येईल, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. जेफ्री एपस्टीन हा नाव अमेरिकेच्या उच्चभ्रू वर्तुळातले एक काळे पडदे उघडणारा आहे. धनाढ्य उद्योगपती, राजकारणी, सेलिब्रिटी आणि प्रभावशाली व्यक्तींशी जवळीक असलेला हा माणूस, अल्पवयीन मुलींच्या माध्यमातून एक घाणेरडे जाळे विणत होता. हनीट्रॅप, सेक्स ट्रॅफिकिंग आणि ब्लॅकमेलिंगचे आरोप त्याच्यावर होते. २०१९ मध्ये तुरुंगात त्याचा मृत्य...