तरुणाईच्या काळजाचा विषय: सुरेश (आण्णा) धस
तरुणाईच्या काळजाचा विषय: सुरेश (आण्णा) धस
![]() |
| तरूणाचं काळिजं : सुरेश धस |
आजच्या या डिजिटल आणि डायनॅमिक काळात जिथे प्रत्येक गोष्ट स्क्रोल करताना बदलते,तिथे एक नाव असं आहे जे थांबवतं अनेकांच्या श्वासांना,थेट हृदयात उतरतं, आणि काळजात घर करतं... ते नाव आहे सुरेश अण्णा धस..!!
वयानं मोठे,पण ऊर्जेनं, विचारानं आणि कृतीनं तरुणाईला वेडं लावणारं व्यक्तीमत्व. सुरेश आण्णा धस याच्या कडे तरूण आकर्षिला का जातो? का आहेत तरुणाईच्या गळ्यातील ताईत, सुरेश (आण्णा) धस ?
प्रत्येक तरूणाच्या मनात एक हिरो जोपसलेला असतो. तो हिरो अन्याय विरूध पेटून उठणारा..... दबंग व निडर...... व सत्याची कास धरणारा....अन्यायाची चीड असणारा व न्यायाची चाड असणारा असतो.तो निष्कपट पण दमदार असतो.तो प्रचंड अशावादी असतो. माणसाच्या मनातला हिरो कधीच पराभूत होत नसतो.तो लढणारा.. भिडणारा व कुणाला ही नडणारा हिरो असतो.
मला वाटत तरुणाई आपल्या मनातील सुपर हिरो... सुरेश आण्णा धस यांच्यात आपला सुपर हिरो पहात असावा.त्यामुळेच तर आण्णा त्यांच्या गळयातील ताईत आहेत. वयाची सारी बंधन या माणसापाशी गळून पडतात.
सुरेश अण्णा हे तरुणांना फक्त मतदार म्हणून पाहत नाहीत,ते त्यांना कुटुंबातील सदस्य म्हणून पाहतात.नोकरीच्या मागण्या, स्पर्धा परीक्षांचा ताण, स्टार्टअपचे स्वप्न, शिक्षणाचे प्रश्न... सगळ्यांवर ते बोलतात,लढतात आणि आधार देतात. प्रत्येक प्रश्नांचे उत्तर सुरेश धस आण्णा यांच्याकडे असते असे विश्वास तरूणांना वाटतो. त्यामुळे अद्वैतचंद्र कायम गर्दीत हरवलेला असतो.
सोशल मीडियावर त्यांच्या भाषणांच्या क्लिप्स व्हायरल होतात,तरुण ते शेअर करतात. असंख्य रिल्स त्यावर बनतात. आण्णाःच एक एक वाक्य ट्रेंड बनत राहते कारण ते बोलतात ते तरुणांच्या मनातलं बोलतात..!!
ते फक्त शब्द देत न नाहीत ते प्रत्यक्षात उतरवतात. त्यासाठी प्राणांची बाजी लावतात.
रक्तदान शिबिरे, लेझिम खेळ, तरुणांसोबत सेल्फी ,खेळ यात ते सहभागी होतात. आपलं जेष्ठ त्व विसरून,तरूणाईत एकरूप होतात.
मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे मुलगे डॉक्टर, इंजिनिअर, उद्योजक होण्याचे स्वप् पहातात.त्यांना कायम प्रोत्साहित करण्याचे काम सुरेश(आण्णा) धस करतात.
त्यांनी सरपंच,आमदार ते मंत्री असा प्रवास केला आहे, त्यामुळे की स्वप्न कसे पेलायचे आणि कसे पूर्ण करायचे याचं उदाहरण ते स्वतःच आहेत.ते तरुणांच्या डोळ्यात स्वप्न पेरतात.त्यांच्या पंखात बळ देतात.
सुरेश धस हे निडर आहेत, दबंग आहेत, आणि दमदार आहेत! संतोष देशमुख प्रकरण असो, पीकविमा घोटाळा असो, किंवा इतर अन्याय – ते थेट नाव घेऊन बोलतात, सरकारला आव्हान देतात आणि लढतात.
ते म्हणतात, "चुकीला माघार नाही!रगेल वागलं पाहिजे. त्यांचा हा रगेलपणा तरूणांना आवडतो. कारण तरुणांना असाच नेता हवा – जो डरत नाही, जो दबंगाईला दाद देत नाही, जो दमदारपणे उभा राहतो. त्यांची निडरता तरुणाईला प्रेरणा देते – "जर अण्णा लढू शकतात, तर आम्ही का नाही?" ते दबंगाईला थेट सामोरे जातात, आणि त्यामुळे तरुणांच्या मनात त्यांचं स्थान हिरो सारखं आहे!
आण्णांची क्रेझ लेव्हल अनलिमिटेड आहे!
सुरेश अण्णांचं व्यक्तिमत्त्व हे मॅग्नेट सारखं आहे! बिनधास्त भाषा, ग्राम्य पण अचूक शब्द, निर्भीड संवाद, आणि संवेदनशील हृदय हे सगळं मिळून तरुणाईला आकर्षित करतं. सोशल मिडीयावर ते हसवतात, रडवतात, प्रेरणा देतात आणि कधी आग ओकतात. रगेल वागण्याचं आव्हान ही करतात. तरूणाच्या,नसानसात आत्मविश्वास ते ओतत राहतात.
वयानं मोठे असले तरी त्यांच्यातली ऊर्जा तरुणांसारखी आहे. राजकारणात जिथे बरेच नेते ,तरूणाई पासूनदूर राहतात, तिथे सुरेश अण्णा तरुणांच्या जवळ येतात..! त्यांच्या गळयातील ताईत होतात.
सुरेश (आण्णा) धस हे तरुणाईच्या काळजाचा विषय आहेत कारण ते फक्त नेते नाहीत. ते भावना आहेत, रंजलेल्या ,गांजलेल्या तरूणाईचे ते आधार आहेत. तरुणाईच्या गळ्यातील ताईत आहेत. सुरेश आण्णा कुणासाठी काही असेल पण तरुणाईसाठी आण्णा मात्र काळजाचा विषय आहे.एवढं खरं...!!! लाखो तरूणाच्या काळजाचा विषय आहे एवढ मात्र खरं.
आण्णा,वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!!
परशुराम सोंडगे,पाटोदा

टिप्पण्या