पोस्ट्स

मे, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संशयाचा व्हायरस

इमेज
  संशयाचं व्हायरस फोटो सौजन्य pinterest  माझ्या लग्नानंतर काही आठवड्यांनी रवीच्या जवळच्या नातेवाइकांच्या लग्नाला आम्ही गेलो होतो. रवीच्या नातेवाईकांच्या लग्नात मी सुंदर दिसले पाहिजे अशी रवीचीचं खूप इच्छा होती.तिथं मला न पाहिलेले अनेक नातेवाईक असणार आहेत.त्यात मी कशी उठून दिसले पाहिजे अशी रवीची इच्छा होती.नटायला सजायला कुणाला आवडणार नाही?       मी गुलाबी रंगाची साडी, हलका मेकअप आणि माझ्या आवडीचं मंगळसूत्र घातलं होतं.रवीने मला तयार होताना पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं. "रचना, तू आज खूपच सुंदर दिसतेस.मला गर्व आहे की तू माझी बायको आहेस,"तो म्हणाला आणि मिठ्ठी मारली. त्याच्या या अतितायीपणाचा मला राग आला.माझं सारं मेकअप ही खराब होऊ शकला असता आणि साडी चुरगाळली पण असते.एक झालं माझं मन भरून आलं.नव-याच्या असल्या गोड हरकती कुणाला नको असतात?  "रवी, हे काय केलस? मी फक्त तुझीच आहे ना? मग इतका उतावीळपणा का?" मी लटकेच राग चेह-यावर पसरवला.त्याने माझा हात हलकेच दाबला,आणि चक्क गालावर ओठ...  माझं अंग शहारून आलं.मी त्याला लाडात येऊन गुद्दे घातले.तसा तो बाहेर पळाल...

गुणवत्ता यादी बंद असातना कोण मुलांना जीवघेण्या स्पर्धेत ढकलत आहेत? Merit list

इमेज
      SSC Merit list प्रस्तावना   नुकताच म हाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल लागला . गुणवंत विद्यार्थ्यांचे सोहळे , कौतुकाचे ढोल वाजवधक सुरूच आहे. गुणवंतांना प्रोत्साहन पण पाहिजे.अलीकडे याचा ही बाजार सुरू करण्यात आला आहे. ज्या उददेश्यांनी सरकारीनी ही यादी बंद केली. ते सारे हेतू धूळीस मिळवण्याचे काम काही लोक करत आहेत.आता जिकडे तिकडे जाहिरती सुरू आहेत. गुणवत्ता यादीत आपणच कसे अव्वल आहोत अश्या जाहिरती करण्यात येते आहेत.क्लासची आणि खाजगी शाळांची त र सुगी च सुरू होते. पालकांना चुकीची माहिती देऊन त्यांना प्रभावित केले जात आहेत. पण , महाराष्ट्र सरकारने गुणवत्ता यादी ( Merit List) बंद केली असतानाही , खासगी शाळा आणि कोचिंग क्लासेस बनावट यादी तयार करून पालकांना आकर्षित करतात. तसेच अनेक खाजगी परीक्षा उन मुलांना मानसिक ताणास व जीवधेण्या स्पर्धेत ढकलत आहेत. शालेय प्रशासन या सा-या गोष्टीकडे दुललललर्लक्ष करत आहेत.           सरकारने गुणवत्ता यादी बंद करण्यामागील कारणे आणि खासगी संस्था तसेच प्रसारमाध्यमे याचा ...

नरकातील स्वर्ग – संजय राऊत यांचे कारागृहातील अनुभवकथन Narkatil Swarg by Snjay Raut

इमेज
  नरकातील स्वर्ग – संजय राऊत यांचे कारागृहातील अनुभवकथन   Narkatil Swarg by Snjay Raut लेखक: संजय राऊत प्रकाशक: New Era Publications प्रकाशन दिनांक: 17 मे 2025 प्रकार: आत्मकथन / मराठी राजकीय साहित्य मिट्ट काळोखाची अखेर नजरेला सवय होतेच. समाजाला आणि माणसांनाही. म्हणून कोणालाही मिट्ट काळोखाची भीती वाटणं काही कमी होत नाही. ज्या काळोखाची पुढे सवय होते, त्या काळोखाला अगोदरच आव्हान देऊन त्यात उडी मारणारी माणसं फार कमी असतात. मुळात ती माणसं तशीच जन्मत असतात की घडत जातात, हाही एक विवाद्य विषय आहे. संजय राऊत हा असाच एक माणूस. २०१४ साली भारतात फॅसिस्ट काळोखाची छाया पसरू लागली. २०१६ च्या मनमानी नोटबंदीने तो काळोख देशभर पसरवला, अधोरेखित केला. त्यानंतर भाजप संघप्रणीत राजवटीचे स्वमर्जीने स्लीपर सेल बनलेल्या अस्सल भारतीय गेस्टापो एजन्सीज, आयटी, ईडी, सीबीआय, एनएसए आणि एनसीबी यांनी सत्तापक्षाच्या राजकीय विरोधातल्या सर्व व्यक्ती, संस्था आणि राजकीय पक्ष यांना लक्ष्य बनवले. देशभर खोट्या आरोपपत्रांद्वारे विरोधातल्या व्यक्ती, शक्ती, उद्योगपती आणि पक्ष यांच्यावर लाखो पानांची आरोपपत्रं लिहिली ग...

साहित्यवीर छत्रपती संभाजी महाराज – विद्वत्ता, शौर्य आणि राष्ट्रनिष्ठेचा अद्वितीय

इमेज
साहित्यवीर छत्रपती संभाजी महाराज – विद्वत्ता, शौर्य आणि राष्ट्रनिष्ठेचा अद्वितीय संगम  छत्रपती- संभाजी -महाराज छत्रपती संभाजी महाराज हे केवळ मराठा साम्राज्याचे दुसरे अधिपती नव्हते, तर ते एक अत्यंत विद्वान, तत्वज्ञानी आणि बहुभाषिक साहित्यिकही होते. त्यांच्या आयुष्याचा वेध घेतल्यास आपणास त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील असामान्य पैलू दिसून येतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र, राजमाता जिजाऊंचे नातू आणि राष्ट्रसंत तुकाराम महाराजांचे भक्त असलेल्या संभाजी राजांनी केवळ तलवारीचे धारच नव्हे, तर लेखणीचे सामर्थ्यही दाखवून दिले. " छत्रपती संभाजी महाराज संभाजी महाराजांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. बालपणापासूनच त्यांच्यावर संस्कारांचे आणि शास्त्रविद्येचे घडण झाले. केवळ युद्धशास्त्रच नव्हे, तर संस्कृत, हिंदी, इंग्रजी, पर्शियन, उर्दू, मराठी या सात भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांनी 'बुद्धिभूषण', 'नायिकाभेद', 'सप्तशतीचा' अनुवाद, अशा अनेक ग्रंथांची निर्मिती केली. ‘बुधभूषण’ हा संस्कृत भाषेतील त्यांचा ग्रं...

झापूक झुपूक मराठी चित्रपट समीक्षा | Zapuk Zupuk Marathi Movie Review in Marathi | Suraj Chavan | Kedar Shinde

इमेज
  झापूक झुपूक : हास्य, हृदय आणि हिट संगीत यांचा परिपूर्ण मेळ..!! झापूक झुपूक मराठी चित्रपट   Suraj Chavan | Kedar Shinde झापूक झुपूक मराठी चित्रपट समीक्षा | Zapuk Zupuk Marathi Movie Review in Marathi | Suraj Chavan | Kedar Shinde प्रदर्शन तारीख : २५ एप्रिल २०२५ दिग्दर्शक : केदार शिंदे मुख्य भूमिका : सूरज चव्हाण, जुई भागवत, इंद्रनील कामत, मिलिंद गवळी प्रकार : रोमँटिक कॉमेडी ड्रामा कथासारांश: 'झापूक झुपूक' म्हणजे प्रेमाची गंमत "झापूक झुपूक" ही गावातील निरक्षर शिपाई सूरजची (सूरज चव्हाण) प्रेमकथा आहे. त्याला नव्या शिक्षिका नारायणी (जुई भागवत) वर प्रेम जडते, पण तिला इम्प्रेस करणं हे काही सोपं नसतं. प्रेमपत्र लिहिण्यापासून ते गावकऱ्यांच्या कुजबुजीपर्यंतचा प्रवास थट्टा-मस्करीतून उलगडतो. मात्र शिक्षिकेच्या भूतकाळातील गुंतागुंतीमुळे आणि तिच्या आमदार वडिलांच्या दबावामुळे गोष्टी वेगळ्या वळणावर जातात. Reel Star to Hero अभिनय: सूरज चव्हाणची चमकदार एंट्री हा चित्रपट सूरज चव्हाणसाठी अभिनयातील पहिलं पाऊल आहे, पण त्याची सहजता आणि नैसर्गिक अभिनय शैली डोळ्यात भरते. गावातील टि...

धर्मयोगिनी अहिल्यादेवी- आजच्या पिढीला मूल्यांचा आरसा दाखवणारं पुस्तक

इमेज
धर्मयोगिनी अहिल्यादेवी-  आजच्या पिढीला मूल्यांचा आरसा दाखवणारं  पुस्तक परीक्षण : सोंडगे परशुराम , बीड      9527460358     धर्मयोगिनी अहिल्यादेवी- आजच्या पिढीला मूल्यांचा आरसा दाखवणारं  पुस्तक  by Dr.Ashok banger प्रस्तावना डॉ. अशोक बांगर लिखित धर्मयोगिनी अहिल्यादेवी होळकर हे पुस्तक नुकतचं वाचण्यात आले.पुस्तक लहान असलं तरी अहिल्यादेवी यां ची चरित्रात्मक तोंड ओळख करून देणारे आहे.  " महाराणी अहिल्यादेवी" युगचं आपले युग पुरूष जन्माला घालत असतो.ती त्या काळाची गरज असते.अर्थात अहिल्यादेवी ही याला अपवाद नाहीत. अहिल्यादेवीचं कार्य,शौर्य व संघर्ष यावर लेखकांनी वस्तु निष्ठ सहज सोप्या भाषेत प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय इतिहासात अनेक थोर व्यक्तिमत्त्वं उदयाला आली.जी केवळ त्यांच्या अतुलनीय शौर्यामुळे व कार्यामुळे नव्हे , तर त्यांच्या मूल्यनिष्ठ जगण्यामुळे आजही प्रेरणास्त्रोत ठरलेली आहेत.अशा तेजस्वी व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे अहिल्याबाई होळकर आहेत. त्यांच्या जीवनप्रवासाचा आदर्श आपणास सामाजिक न्याय , कर्तव्यनिष्ठा , ...