पोस्ट्स

जून, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

केसरी चॅप्टर २: द अनटोल्ड स्टोरी ऑफ जलियांवाला बाग -

इमेज
Kesari 2 केसरी चॅप्टर २: द अनटोल्ड स्टोरी ऑफ जलियांवाला बाग" हा चित्रपट १९१९ च्या जलियांवाला बाग हत्याकांडानंतरच्या घटनांना केंद्रस्थानी ठेवून, भारतीय वकील आणि बॅरिस्टर सी. शंकरन नायर यांच्या कायदेशीर लढ्याची कथा सादर करतो. रघु पलात आणि पुष्प पलात यांच्या द केस दैट शूक द एम्पायर या पुस्तकावर आधारित, हा चित्रपट ऐतिहासिक सत्य आणि काल्पनिक नाट्य यांचा सुंदर मिलाफ आहे. १३ एप्रिल १९१९ रोजी अमृतसरमधील जलियांवाला बागेत ब्रिगेडियर जनरल रेजिनाल्ड डायरच्या आदेशानुसार ब्रिटिश सैन्याने निःशस्त्र भारतीयांवर गोळीबार केला, ज्यामध्ये शेकडो निष्पाप लोक मारले गेले आणि हजारो जखमी झाले. या क्रूर घटनेनंतर ब्रिटिश सरकारने सत्य दडपण्याचा प्रयत्न केला, आणि त्याविरुद्ध नायर यांनी लंडनमधील कोर्टात ऐतिहासिक लढा दिला.   चित्रपटाची कथा नायर यांच्या दृष्टिकोनातून उलगडते, जे ब्रिटिश सरकारने हत्याकांडाच्या चौकशीसाठी नियुक्त केलेल्या हंटर कमिशनचे सदस्य होते. त्यांचा अहवाल, जो सत्य उघड करणारा होता, ब्रिटिश सरकारला मान्य नव्हता, आणि यामुळे नायर यांना वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर मोठ्या आव्हानांना सामोरं जावं...

सत्यवती: एक शापित कुमारी

इमेज
 सत्यवती: एक शापित कुमारी  सत्यवती: एक शापित कुमारी अकाशातून सूर्य सृष्टीवर सोनसळी प्रकाशाचा अभिषेक घालत होता.झाडांच्या पानापानावर ते सोन पिवळ उन्हं सा॔डलं होतं.यमुनेच्या गहि-या खोल प्रवाहाच्या उरावर ते  नाचत होतं.पक्ष्यांचा मंजूळ कुंजरव भवतालात सर्वदूर पसरला होता.यमुना संथ वाहत होती पण त्यात एक लयं होती.दूर पाण्यात कुणी दोन तीन नौका पैलतीरी सोडल्या होत्या. यमुनेच्या शांत निळ्या गहि-या पाण्यावर कुणी तरी ओल्या जलरंगात चित्र रेखाटवं तसं ते सारं विलोभनीय दृश्य दिसतं होतं .सत्यवती-एक- शापित- कुमारी  झाडं वेली बहरली होती.फुलं आपल्या गंधराशी वा-याच्या हवाली करत होते.तो मंद गंध  सर्वत्र दरवळला होता. रानवेली रंगबेरंगी फुलांनी डवरून आल्या होत्या. फुलपाखरं? फुलावर घिरट्या घालत होते.इतक्या शुभवेळी प्रभात समयी महर्षी पराशर मंद पावलं टाकीत किना-याकडे चालत होते.वर बांधलेल्या जटा.टोकदार दाढी.काळी पांढरी. भगवं उत्तरीय पांघरलेले.शुभ्र धवल पितांबर नेसलेले...हातात कमंडलू.लाकडी पादुकाचा टकटक अवाज करत होत्या.लाल गर्द मऊशार माती त्या पवित्र चरणस्पर्शासाठी अतुर  झालेली..!!  ...

हाके मिटकरी आणि प्राण्यांची सभाLaxman hake and Amol mitkari

इमेज
Laxman hake and Amol mitkari जंगलात सर्व प्राण्याची तातडीने एक सभा भरली.वाघ,सिंह,खोकडं,गेंडे,हत्ती,कुत्री,मांजर,डुक्कर,गाढव कोल्हा,हरीण,ससे एक नाय सारचं प्राणी झाडून आले होते. विषय काय होता तर?माणसं देत असलेल्या शिव्या. Laxman hake and Amol mitkari "त्यांच्या शिव्या आणि आपली सभा कमून बोलीली? माणसा सारख्या बुध्दिमान माणसाच्या फंदयात आपून कशाला पडायचं?"  चतुुर कोल्हयांनं प्रश्न उपस्थित केला.त्याचं भी खरचं होतं.माणसाच्या विरोधात सभा घेऊन काय होतं? "माणसानं त्यांच्या आया बहिणीचा उद्दार करणा-या शिव्या खुशाल द्याव्यात.आपल्याला फक्त मधी घेऊ नये एवढीचं माफक इच्छा. !!" माकडं म्हणालं."ते कशाला आपल्याला मध्ये घेतील? ते माणसं आहेत. सुसंस्कृत असतात.त्यांना धर्म,संस्कृती वगैरे असते." चित्याने स्पष्टीकरण  दिले' Laxman hake and Amol mitkari' "कशाची डोंबल संस्कृती त्यांची? गेल्या आठवड्यात नाही पाहिलय का तुम्ही हायवेवर काय करत होते? आम्हाला हाय शंकराचा शाप पण माणसांना काय?खुशाल भर रस्त्यावर..छी..!!लाज वाटली बुवा आपल्याला." एक कुत्रं आपली व्यथा मांडत बोलल...

आपण फक्त क्रिकेटचे प्रेक्षकरूपी ग्राहक आहोत

इमेज
  RCB नामक कोणे एका टिमच्या विजयोत्सवामध्ये 11 चाहते चेंगरून मरण पावले. जे झाले ते दुर्दैवीच .IPL-2025    #कथा आणि व्यथा आयपीएल-2025 विजयी मिरवणूक बंगलोर  वास्तविक पाहता IPL वगैरे हे शुद्ध व्यवसायिक गणितं डोळ्यांसमोर ठेवून आयोजित केलेला तद्दन व्यवसाय आहे. लिलाव होतात खेळाडूंचे. ते ही ठीक. मनोरंजनही ठीक. प्रत्येक देशाचा एक स्वभावधर्म असतो व त्यानुसार त्या देशाचे वर्तन असते. तशी भारताची राष्ट्रभक्ती ही पाकिस्तान व क्रिकेट या दोन गोष्टींवर ऊतू येते. यानंतर ती कोमात जाते. वास्तविक पाहता उद्योजकांनी विकत घेतलेल्या या संघांचा आणि देशाचा नेमका काय संबंध ? काही उत्पादनांची खरेदी -विक्री व टॅक्स सोडला तर देशाशी याचा संबंध नाही. देशतपातळीवरील क्रिकेट टिम ही देशासाठी खेळते असाही एक समज सातत्याने बिंबविण्यात आला आहे. वास्तविक पाहता हा संघ BCCI या खाजगी संस्थेसाठी खेळतो. यापुढेही कमाल म्हणजे जगात 200 पेक्षा अधिक देश आहेत आणि 12 देशातल्या स्पर्धेला हे विश्वचषक (World Cup ) म्हणवून घेतात. अगदी अलीकडच्या काळापर्यंत या 12 देशांमध्ये इंग्लंड व ऑस्ट्रेलिया देश सोडले तर बहुतांशी मागास द...