आपण फक्त क्रिकेटचे प्रेक्षकरूपी ग्राहक आहोत
RCB नामक कोणे एका टिमच्या विजयोत्सवामध्ये 11 चाहते चेंगरून मरण पावले. जे झाले ते दुर्दैवीच.IPL-2025 #कथा आणि व्यथा
वास्तविक पाहता IPL वगैरे हे शुद्ध व्यवसायिक गणितं डोळ्यांसमोर ठेवून आयोजित केलेला तद्दन व्यवसाय आहे.
लिलाव होतात खेळाडूंचे.
ते ही ठीक.
मनोरंजनही ठीक.
प्रत्येक देशाचा एक स्वभावधर्म असतो व त्यानुसार त्या देशाचे वर्तन असते.
तशी भारताची राष्ट्रभक्ती ही पाकिस्तान व क्रिकेट या दोन गोष्टींवर ऊतू येते.
यानंतर ती कोमात जाते.
वास्तविक पाहता उद्योजकांनी विकत घेतलेल्या या संघांचा आणि देशाचा नेमका काय संबंध ?
काही उत्पादनांची खरेदी -विक्री व टॅक्स सोडला तर देशाशी याचा संबंध नाही.
देशतपातळीवरील क्रिकेट टिम ही देशासाठी खेळते असाही एक समज सातत्याने बिंबविण्यात आला आहे.
वास्तविक पाहता हा संघ BCCI या खाजगी संस्थेसाठी खेळतो.
यापुढेही कमाल म्हणजे जगात 200 पेक्षा अधिक देश आहेत आणि 12 देशातल्या स्पर्धेला हे विश्वचषक (World Cup ) म्हणवून घेतात.
अगदी अलीकडच्या काळापर्यंत या 12 देशांमध्ये इंग्लंड व ऑस्ट्रेलिया देश सोडले तर बहुतांशी मागास देश होते.
चीन,जर्मनी,जपान, फ्रान्स आणि अमेरिका अशा विकसित देशांचे वन डे वगैरेसाठी संघ नव्हते.
दिवसभर एकाच जागी कामधंदा सोडून वन डे मॅचेस पाहणं त्यांना शक्य कसं व्हावं IPL-2025
तर क्रिकेटही या देशाचा अधूनमधून धर्म असतो आणि त्या धर्मासाठी धर्म अनुयायी नाहक स्वतःचा जीव गमावतात.
भयानक गोष्ट म्हणजे त्या गर्दीत लहान लेकरांनांही घेऊन जाणारे सुज्ञ पालक होते.
भारत नेहमीच मोठी बाजारपेठ असलेला देश आहे.
ह्या बाजारपेठेला भुलविण्यासाठी अस्मिता -राष्ट्रभक्ती वगैरेचा मुलामा आवश्यक असतो.
90 च्या दशकात अभिनेत्री सुश्मिता सेनला मिस युनिव्हर्स हा पुरस्कार देण्यात आला व ऐश्वर्या रायला मिस वर्ल्ड.
यानंतर देशात सौंदर्य प्रसाधनांच्या उत्पादनांची विक्री सातत्याने वाढतच गेली.
उत्पादनं विक्रीचे फंडे बहुराष्ट्रीय कंपन्या आखत असतात.
बाळासाहेब नागरगोजे,बीड
🙏Subscribe me🙏
https://www.youtube.com/@PrshuramSondge
Follow me:
https://www.facebook.com/share/1Ewrz9YBiq/
टिप्पण्या