DNA आख्यानं
DNA आख्यान तुमचा डीएनए कोणता? असा प्रश्न कुणी तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय करणार? आहो,दात ओठ काय खाता? सध्या हा प्रश्न कुणी ही कुणाला विचारू शकत? DNA ही गोष्टं तितकीशी खाजगी पण राहिली नाही. ती एक सार्वजनिक बाब झाली आहे. जीवाचा व त्याचा वंशवृक्षचा डीएनए असतो.DNA ची एक लिपी पण असते.तिचे अर्थ ही उमगले आहेत.DNA ही एक सूक्ष्म जीवशास्त्रीय संज्ञा आहे. विज्ञान या क्षेत्रात प्रचंड गतीने प्रगती करत आहे. DNA चे आख्यान व ज्ञान पाजळण्याचा हेतू नाही माझा.मग कोणता हेतू? ..तर राजकरणात या DNA शब्दांचा फार वापर सुरू झाला आहे.महाराष्ट्राच्या झणझणीत राजकीय भाषेत DNA ला पर्यायी शब्द आहे आवलाद. जीनस्...?? म्हणजे तुमची अवलाद कुणाची आहे? असा प्रश्न कुणी विचारलं तर लयं गरम नका होऊ. कुणी कुणाच्या अवलादीवर जाऊ नये.सध्या सर्रास माणसं आवलादीवर जातात.जे जातात त्यांना ही फॉलोअर्स प्रचंड संख्येने आहेत. लोकशाहीत शेवटी आकडा महत्वाचा असतो. त्यामुळे त्यांचे ही बाहू स्फुरस्फुरतात. नुसता जीव व वंशवृक्ष यांनाच डीएनए नसतो तर राजकीय पक्षाला ...