पोस्ट्स

DNA आख्यानं

इमेज
 DNA आख्यान तुमचा डीएनए  कोणता? असा प्रश्न कुणी तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय करणार? आहो,दात ओठ काय खाता? सध्या हा प्रश्न कुणी ही कुणाला विचारू शकत? DNA ही गोष्टं तितकीशी  खाजगी पण राहिली नाही. ती एक सार्वजनिक  बाब झाली आहे. जीवाचा व त्याचा वंशवृक्षचा डीएनए असतो.DNA ची  एक लिपी पण असते.तिचे अर्थ ही उमगले आहेत.DNA ही एक सूक्ष्म जीवशास्त्रीय  संज्ञा आहे. विज्ञान या क्षेत्रात  प्रचंड  गतीने प्रगती करत आहे. DNA चे आख्यान व ज्ञान पाजळण्याचा हेतू नाही माझा.मग कोणता हेतू?  ..तर राजकरणात या DNA शब्दांचा फार वापर सुरू झाला आहे.महाराष्ट्राच्या झणझणीत  राजकीय  भाषेत  DNA ला पर्यायी शब्द आहे आवलाद. जीनस्...?? म्हणजे तुमची अवलाद कुणाची आहे? असा प्रश्न कुणी विचारलं तर लयं गरम नका होऊ.  कुणी कुणाच्या अवलादीवर जाऊ नये.सध्या सर्रास माणसं आवलादीवर जातात.जे जातात त्यांना ही फॉलोअर्स प्रचंड  संख्येने आहेत. लोकशाहीत शेवटी आकडा महत्वाचा असतो. त्यामुळे त्यांचे ही बाहू स्फुरस्फुरतात. नुसता जीव व वंशवृक्ष यांनाच डीएनए नसतो तर राजकीय पक्षाला ...
इमेज
 ‘आरपार’ : एक भावनिक प्रवास आणि प्रेमाची गहनता ॠता आणि ललित  आरपार या चित्रपटात  रोमँटिक  दृश्यात. मराठी चित्रपटसृष्टीत प्रेमकथा हा नेहमीच एक लोकप्रिय प्रकार राहिला आहे, पण तो सामाजिक संदर्भ आणि वैयक्तिक संघर्षांशी जोडला गेला की चित्रपट अधिक प्रभावी होतो. ‘आरपार’ (Aarpar) हा २०२५ चा मराठी चित्रपट असा एक चित्रपट आहे, जो प्रेम, विश्वासघात आणि भावनिक संघर्ष यांचा एक सुंदर संगम साधतो. दिग्दर्शक गौरव पाटकी यांच्या या चित्रपटाने १२ सप्टेंबर २०२५ रोजी प्रदर्शनाला येताच प्रेक्षक आणि समीक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. IMDb वर ८.२ च्या रेटिंगसह हा चित्रपट रोमँटिक ड्रामा म्हणून उभा राहिला आहे, ज्यात ललित प्रभाकर आणि हृता दुर्गुळे यांच्या अभिनयाने सिनेमाला एक वेगळी उंची मिळवली आहे. कथानक: प्रेमातील खोलवर खणलेले जखम चित्रपटाची कथा कॉलेजमधील दोन प्रेमळ जोडप्यावर आधारित आहे. अमर रांडिवे (ललित प्रभाकर) आणि प्राची दीक्षित (हृता दुर्गुळे) हे दोघे कॉलेजमधील मित्र आहेत, जे एकमेकांवर वेड्यासारखे प्रेम करतात. त्यांचे प्रेम अतिशय निष्कपट आणि उत्कट आहे,जे कॉलेजच्या वातावरणात उमलते. मात्र...

तुला पहाते रे

इमेज
#TulaPhateRe तुला पहाते रे एका अतृप्त आत्म्याची प्रेम कथा मी पराग.नवीन शहर, नवा जाॅब.पुणे हे माझ्यासाठी नवीनचं शहरं होतं. पुण्याला,जाॅब लागला आणि एका अपार्टमेंटमध्ये मी खोली घेतली ती पण तिसऱ्या मजल्यावर.पहिलाचं दिवस होता.झोप येत नव्हती.  नविन जागा म्हटलं की झोप सहसा लागत नाही.जागाचं होतो.बाहेर लख्ख चांदण पडलं होतं.मी खिडकीत उभा राहिलो.बाहेरच्या अंधारात काहीतरी हलतंय असं वाटलं.माझं लक्ष गेले.बाजूच्या गॅलरीत  एक सुंदर स्त्री  उभी होती.ती टक लावून माझ्याकडेच पहात होती.एकटक .!! मी तर घाबरलोच.अशी अनोळखी स्त्री अशी आपल्याकडे पहाते आहे  ही कल्पनाच मला विलक्षण व विचित्र वाटली.असल्या  चांदण्या रात्री.  'तुला पहाते रे'         मी फार वेळ तिच्या कडे पाहू शकलो नाही. नजरानजर झाली.चक्क तिन मंद स्मित केल.माझ्या अंतरंगात  अनोख चांदण  बरसून गेलं.ती कुमारिका नव्हती तरी मला ती खूप आवडली.कुणी पहाते आहे म्हणून आपल्या प्रेमात आहे असं कसं समजावं? असा मी कोण लागून गेलो होतो?पहिल्याच नजरेत माझ्या कुणी परस्त्री प्रेमात पडायला?तिच्याकडे पाहण्याचं मला धाड...

प्रेमाची जादू: ‘सय्यारा’ आणि जेन झेडच्या हृदयाला स्पर्श करणारी कथा

इमेज
आध्यात्मिक गुरू श्री एम यांनी म्हटले आहे, "प्रेम ही तर्काच्या पलीकडे जाणारी शक्ती आहे, जी अशक्य गोष्टी शक्य करते." प्रेम हे कोणतेही गणित किंवा हिशोब नाही; ही एक खोलवरची अनुभूती आहे, जी पवित्र आणि परिवर्तनकारी आहे. जेव्हा प्रेम स्वार्थाच्या पलीकडे जाते, तेव्हा ते भक्ती बनते, जिथे प्रिय आणि प्रेमी एकरूप होतात, आणि फक्त समर्पणच शिल्लक राहते. या विचाराला आधार देणारी एक सुंदर सूफी कथा आहे, जिथे प्रेमी आपल्या प्रियेच्या दारावर ठोठावतो. प्रत्येक वेळी प्रश्न येतो, "कोण?" आणि तो उत्तर देतो, "मी." दार उघडत नाही. शेवटी, जेव्हा तो म्हणतो, "तू," तेव्हाच दार उघडते. ही कथा प्रेमात ‘मी’ पासून ‘तू’ होण्याची प्रक्रिया अधोरेखित करते. आणि याच भावनेला जेन झेड पिढीसाठी बनलेला बॉलिवूडचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘सय्यारा’ नव्या  ‘सय्यारा’: प्रेमाची एक आधुनिक गाथा ‘सय्यारा’: प्रेमाची एक आधुनिक गाथा अवघ्या दोन आठवड्यांत २५० कोटींचा व्यवसाय करणारा ‘सय्यारा’ हा चित्रपट प्रेमाची ती अवस्था दाखवतो जिथे प्रेम आणि संसार एकत्र साधले जातात. ही कथा पूर्णपणे ‘मी’ चे ‘तू’ होणे नाही, पण ‘मी...

केसरी चॅप्टर २: द अनटोल्ड स्टोरी ऑफ जलियांवाला बाग -

इमेज
Kesari 2 केसरी चॅप्टर २: द अनटोल्ड स्टोरी ऑफ जलियांवाला बाग" हा चित्रपट १९१९ च्या जलियांवाला बाग हत्याकांडानंतरच्या घटनांना केंद्रस्थानी ठेवून, भारतीय वकील आणि बॅरिस्टर सी. शंकरन नायर यांच्या कायदेशीर लढ्याची कथा सादर करतो. रघु पलात आणि पुष्प पलात यांच्या द केस दैट शूक द एम्पायर या पुस्तकावर आधारित, हा चित्रपट ऐतिहासिक सत्य आणि काल्पनिक नाट्य यांचा सुंदर मिलाफ आहे. १३ एप्रिल १९१९ रोजी अमृतसरमधील जलियांवाला बागेत ब्रिगेडियर जनरल रेजिनाल्ड डायरच्या आदेशानुसार ब्रिटिश सैन्याने निःशस्त्र भारतीयांवर गोळीबार केला, ज्यामध्ये शेकडो निष्पाप लोक मारले गेले आणि हजारो जखमी झाले. या क्रूर घटनेनंतर ब्रिटिश सरकारने सत्य दडपण्याचा प्रयत्न केला, आणि त्याविरुद्ध नायर यांनी लंडनमधील कोर्टात ऐतिहासिक लढा दिला.   चित्रपटाची कथा नायर यांच्या दृष्टिकोनातून उलगडते, जे ब्रिटिश सरकारने हत्याकांडाच्या चौकशीसाठी नियुक्त केलेल्या हंटर कमिशनचे सदस्य होते. त्यांचा अहवाल, जो सत्य उघड करणारा होता, ब्रिटिश सरकारला मान्य नव्हता, आणि यामुळे नायर यांना वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर मोठ्या आव्हानांना सामोरं जावं...

सत्यवती: एक शापित कुमारी

इमेज
 सत्यवती: एक शापित कुमारी  सत्यवती: एक शापित कुमारी अकाशातून सूर्य सृष्टीवर सोनसळी प्रकाशाचा अभिषेक घालत होता.झाडांच्या पानापानावर ते सोन पिवळ उन्हं सा॔डलं होतं.यमुनेच्या गहि-या खोल प्रवाहाच्या उरावर ते  नाचत होतं.पक्ष्यांचा मंजूळ कुंजरव भवतालात सर्वदूर पसरला होता.यमुना संथ वाहत होती पण त्यात एक लयं होती.दूर पाण्यात कुणी दोन तीन नौका पैलतीरी सोडल्या होत्या. यमुनेच्या शांत निळ्या गहि-या पाण्यावर कुणी तरी ओल्या जलरंगात चित्र रेखाटवं तसं ते सारं विलोभनीय दृश्य दिसतं होतं .सत्यवती-एक- शापित- कुमारी  झाडं वेली बहरली होती.फुलं आपल्या गंधराशी वा-याच्या हवाली करत होते.तो मंद गंध  सर्वत्र दरवळला होता. रानवेली रंगबेरंगी फुलांनी डवरून आल्या होत्या. फुलपाखरं? फुलावर घिरट्या घालत होते.इतक्या शुभवेळी प्रभात समयी महर्षी पराशर मंद पावलं टाकीत किना-याकडे चालत होते.वर बांधलेल्या जटा.टोकदार दाढी.काळी पांढरी. भगवं उत्तरीय पांघरलेले.शुभ्र धवल पितांबर नेसलेले...हातात कमंडलू.लाकडी पादुकाचा टकटक अवाज करत होत्या.लाल गर्द मऊशार माती त्या पवित्र चरणस्पर्शासाठी अतुर  झालेली..!!  ...

संशयाचा व्हायरस

इमेज
  संशयाचं व्हायरस फोटो सौजन्य pinterest  माझ्या लग्नानंतर काही आठवड्यांनी रवीच्या जवळच्या नातेवाइकांच्या लग्नाला आम्ही गेलो होतो. रवीच्या नातेवाईकांच्या लग्नात मी सुंदर दिसले पाहिजे अशी रवीचीचं खूप इच्छा होती.तिथं मला न पाहिलेले अनेक नातेवाईक असणार आहेत.त्यात मी कशी उठून दिसले पाहिजे अशी रवीची इच्छा होती.नटायला सजायला कुणाला आवडणार नाही?       मी गुलाबी रंगाची साडी, हलका मेकअप आणि माझ्या आवडीचं मंगळसूत्र घातलं होतं.रवीने मला तयार होताना पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं. "रचना, तू आज खूपच सुंदर दिसतेस.मला गर्व आहे की तू माझी बायको आहेस,"तो म्हणाला आणि मिठ्ठी मारली. त्याच्या या अतितायीपणाचा मला राग आला.माझं सारं मेकअप ही खराब होऊ शकला असता आणि साडी चुरगाळली पण असते.एक झालं माझं मन भरून आलं.नव-याच्या असल्या गोड हरकती कुणाला नको असतात?  "रवी, हे काय केलस? मी फक्त तुझीच आहे ना? मग इतका उतावीळपणा का?" मी लटकेच राग चेह-यावर पसरवला.त्याने माझा हात हलकेच दाबला,आणि चक्क गालावर ओठ...  माझं अंग शहारून आलं.मी त्याला लाडात येऊन गुद्दे घातले.तसा तो बाहेर पळाल...