जरा नेत्यांना पण समजून घ्या
अहो, नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुका आल्या की सगळे पक्षीय नेते एकदम “कुटुंबप्रेमाने” पछाडले जातात. बायको, पोरे, पोरी, सून, नातू, पुतणे, मेहुणे, सासरे-सासू... अगदी त्यांच्या घरातल्या कुत्र्यालाही तिकीट द्या असं वाटावं इतकं प्रेम उफाळून येतं. कार्यकर्ते मात्र रडकुंडीला आलेत. 'आम्ही फक्त सतरंज्या उचलायच्या का ? ' का फक्त बॅनर लावायची? पण अरे, हे बघा ना, नेता बिचारा किती असहाय्य आहे? तिकीट वाटपाचा फॉर्म्युला शोधताना त्याच्या डोक्यात कॅल्क्युलेटर फिरत असतं. "एक तिकीट आणि शंभर इच्छूक. कुणाला दयायचं तिकीट? एकाला दिलं की दुसरा नारज,दुस-याला दिलं की तिसरा नाराज. नाराजी नाटय नुसतं रंगत जातात. फूस लावायला ना कार्यकर्ते पळवायला तर सारेच टपलेले. हल्ली गद्दा-या पण किती वाढल्यात बरं? राजकरणात असचं असतं. अस सारेच म्हणतात.गद्दा-या करणं ही एक कला आहे अशी मान्यता आपण दिल्लीचं की. कुटूबांच्या बाहेरच्या माणसाला तिकीट दिलं की ५० कार्यकर्ते नाराज, २० बंडखोर, १० विरोधात.हातची सीट जाण्याची पण रिस्क मोठी असते. जग बुडलं तरी चालेल पण हातची सीट गेली तर काय उपयोग? सीट गेली तर पक्षश्रे...