एका काॅल गर्लची डायरी -भाग 3
तिसरा भाग झिमझिम पाऊस सुरू होता.राधा मॅडम बाल्कनीत उभ्या होत्या.सारं शहरं पावसात चिंब भिजत होतं.पावसाचा पण एक सूर असतो ना? झिमझिम…! रिमझिम…!! थंडगार वारं अंगास झोंबत होतं.तसं त्यांनी अंग चोरलं. एक गोड शहरा अंगभर पसरत गेला.वा-यावर उडणारे केस त्यांनी सावरले.पाचव्या मजल्यावर त्या उभ्या होत्या.पाऊस बरसत असला तरी रोडवरील गर्दी कमी नव्हती.दुथडी भरून रस्ते वाहत होते.वेगवेगळया रंगाचे रेन कोटस्, छत्र्या ,वाहनं रंगीत ठिपक्यांची दिसत होते. एक विलक्षण दृश्य दिसतं होतं.माणसंच काय वाहन ही इवल्या इवल्या रंगीत ठिपक्यासारखे दिसत होती. पाऊस म्हणजे धरती आणि आकशाचा प्रणयचं ना? धूवाधार पावसाला सोसत राहणारी धरती.हिरवागार शालू परिधन करून पाऊस झेलत,शोषत उतावीळ प्रणयीचं ना? राधा मॅडमला उगीच कुठं तरी वाचलेली ही कवी कल्पना आठवली.बाल्कनीतच ...