पक्षफुटी,सदू आणि बंडया
पाराजवळ सकाळ सकाळ एक टोळकं जमा झालं होतं.सकाळ पासूनचं दोन चार गाबडी नुसती तोटं वाजवीत होतं. सकाळ सकाळचं ठो..ठो... बारं व्हायला लागलेत म्हणल्यामुळे गलका तर होणारच ना? त्यांच्या भोवती येणारी - जाणारी माणसं गराडा टाकित हुती.जसा जसा गरदा जमा होतं व्हता.तसं ती गाबडी चेकाळतं व्हती.त्या रामा सावकाराच्या बंगल्याकून डीजेचा भी आवाज येतं हुता.नेमकं कशाचं काय ? हे ब-याचं जनाला कळतं नव्हतं. सदू यटण पाठीवर टाकून झपाझपा शॅतात निघाला होता.एवढा गराडा पाहून तेव्हं भी थांबला.उग आपला उल्लीकसा टायेम पास करावा म्हणूनचं तेव्हं तिथं घुटमळला व्हता. "अरं कमून असं बारं करित्यात रं? "सबागती त्यांनी बंडयाला परशन केला. कुठं काय घडलं?त्याला काय माहित ? तेव्हं शेतकरी माणूस.लयं कुणाच्या राड्यात पडतचं नाय. "आरं काल मोठा भूकंप झालायं की...तुला नाय व्हवं ठावं?"बंड्या त्याच्या हातावर टाळी देत बोलला. "भूंकंप...??कुठं ?कवा ?" सदू हादरला ना?त्याला काही इश्यचं ठाऊक नव्हता.तेव्हं हादरायचं नाय तर काय?दोन च्यार थोबाडातून नुसते दातं विचकले.उगाच दाताड विचकल्यामुळे तर सदू एकदमचं ...