तुमचा गाल आमची थप्पडं
तुमचा गाल आमची थप्पडं मी काॅलेजला असताना एक एकांकीका पहिली होती.पूर्वी एकांकिकाचे टायटल फार भन्नाट असतं.सोशल मिडीया नव्हती तेव्हा नाहीतर एका एका टायटेलनं तुफान राडा केला असता सोशल मिडीयावर....!! 'तुमचा गालं..!!, आमची थप्पड..!!" अशी भन्नाट टायटल असलेली सामाजिक व राजकारणावर भाष्य करू शकेल अशी एकांकिका एका स्पर्धेत पाहण्यात आली होती. एका सामान्य नागरिकाची कशी ससेहोलपट केली जाते या व्यवस्थेमध्ये याची काही प्रसंग मोठ्या कौशल्याने त्या एकांकिकेत गुंफले होते. आम आदमीची प्रत्येक वेळेला कशी प्रत्येक टप्प्यावर हारेशमेन्ट केली जाते हे दाखवण्याचा अफलातून प्रयत्न त्यात केला होता. या व्यवस्थेचे आणि तुमचं नात काय ?, तुमचा गाल आणि आमची थप्पड..!! तुम्ही फक्त मुकाटयाने गाल पुढे करा....आम्ही एक थप्पड लावतो. थप्पड लगावण्यात एक प्रकारचा परमानंद असतो.हा आंनद दुस-याला देताना तुम्ही तक्रार करू नका.हसू नका पण सोसा.रडू नका फक्त कण्हा. तुमच्या गालात जर कुणी जोरात थप्पडं मारली तर तुम्ही काय कराल? आपल्या चिंतनशीलतेला भरपूर वाव देणारा हा प्रश्न आहे. ए...