पोस्ट्स

गुंतता ह्रदथ हे..!! भाग 5

इमेज
  भाग 5 तृप्ती हो ना?रात्रं झालीय.” त्याचं लक्षं नव्हतं तिच्याकडं.तृप्ती फ्रेश झाली होती.तिनं कपडे ही चेंज केलं. निलेशचं चित्तं कुठं जाग्यावर होतं? रेवाच्या अनेक छबी त्याच्या डोळया समोरून हालत नव्हत्या. खरतर त्याला यातलं काहीचं आठवायचं नव्हतं पण आठवणीची पण उबळ असेल न थोपवता येणारी.आठवणीची मळमळ त्याला सहन होत नव्हती.माणूस  त्या उपसून नाही टाकू शकतं.                                रेवाची अनेक वर्षची रूप त्याच्या डोळयासमोर उभी राहिली. हासरी ,लाजरी,भित्री,रागातली,प्रणयातूर,लटक्यारागतली व संतृप्तं.अश्या अनेक भाव मुद्रा तिच्या  निलेशच्या मनावर उमटतं. काही क्षण त्याला वेडावत नि अदृश्य होतं. रेवा अशी आज नको होती भेटायला. आपल्याला हवं तसचं सारं नाही होऊ शकतं. ती अचानक भेटली. भेटली तर भेटली पण तृप्ती सोबत असताना तरी नको होती भेटायाला.तिला असं काहीच बोलता आलं नाही.तिच्या डोळयात ही पहाता आलं नाही. डोळ तरी कसं वाचणार?  खर तर ती पाहील्यानंतर सुरवातीला प्रचंड भिती वाटली. रेवा येऊन जर काही बोललं तर तृप्त...

"छावा (Chaava) मराठी चित्रपट – बॉक्स ऑफिसवर तुफान गाजतोय!"

इमेज
छावा, चित्रपट तुम्ही पाहिलायं का?  याचं उत्तर तुमचं 'नाही' असं असेल तर हे काय हे जिणं तुमचं..!! पहा, ना मग उशीर कसला करताय? तुम्हाला तो पाहायचा तर आहेच ना? मग बघा ना लवकर...!! उशीर का करता..?  हे पहा तो थिएटरला जाऊन पाहयचा आहे.कुठं ही आणि कसा ही पाहयचा नाही. मज्जा नाही येणार? साॅरी..!! छावा चित्रपटाची मज्जा नाही घेऊ शकत कुणीचं.आपलं काळिज कुणी होरपळून काढताना कुणी सिनेमा एन्जॉय करू शकत का? ते शक्य नाही. धडपडणारे जर ह्रदय तुम्हाला असेल तर तुम्ही न रडता तो चित्रपट पाहू नाही शकत. काय म्हणता? इतकं इमोशनल का होताय.साधा चित्रपट तो? फार तर तो छान जुळून आला आहे असं म्हणा.कलाकाराचं कौतुक करा फार तर.  चित्रपट तो.एक कलाकृती म्हणूनच पहा ना? कुणाचं पात्र कसं रंगलय? हे सांगत बसा.आहो,रडताय काय तुम्ही? ही एक कलाकृतीची आहे याचं भान ठेवा.ते सारं सारं खोटं असतं.सारं रंगवलेलं असतं. चित्रपट गृहातचं शिवगर्जना वगैरे .... हे फार अति होत हं...!! खरं तुमचं.ते सारं रंगवलेलं आहे. मला माहिती ही आहे ते सारं खोटं घडतयं.इफेक्ट दिलेले सीनस् आहेत ते सारे. सारं सारंचं खोटं पण आम्हाला खरं का वाटतय...

तुमचा गाल आमची थप्पडं

इमेज
 तुमचा गाल आमची थप्पडं मी काॅलेजला असताना एक एकांकीका पहिली होती.पूर्वी एकांकिकाचे टायटल फार भन्नाट असतं.सोशल मिडीया नव्हती तेव्हा नाहीतर एका एका टायटेलनं तुफान राडा केला असता  सोशल मिडीयावर....!!  'तुमचा गालं..!!, आमची थप्पड..!!" अशी भन्नाट  टायटल असलेली सामाजिक  व राजकारणावर भाष्य करू शकेल अशी  एकांकिका एका स्पर्धेत  पाहण्यात आली होती. एका सामान्य नागरिकाची कशी ससेहोलपट केली जाते या व्यवस्थेमध्ये याची काही प्रसंग मोठ्या कौशल्याने त्या एकांकिकेत गुंफले होते. आम आदमीची प्रत्येक वेळेला कशी  प्रत्येक टप्प्यावर हारेशमेन्ट केली जाते हे दाखवण्याचा अफलातून  प्रयत्न त्यात केला होता. या व्यवस्थेचे आणि तुमचं नात काय ?, तुमचा गाल आणि आमची थप्पड..!! तुम्ही फक्त  मुकाटयाने गाल पुढे करा....आम्ही एक थप्पड  लावतो. थप्पड लगावण्यात एक प्रकारचा परमानंद असतो.हा आंनद दुस-याला देताना तुम्ही तक्रार करू नका.हसू नका पण सोसा.रडू नका फक्त कण्हा. तुमच्या गालात जर कुणी जोरात थप्पडं मारली तर तुम्ही काय कराल? आपल्या चिंतनशीलतेला भरपूर वाव देणारा हा प्रश्न आहे. ए...

पुष्पा-2:- राडाच पण हवाहवासा..!!

इमेज
पुष्पा-02:- एक हवाहवसा राडा..!! 'पुष्पा-02 तुम्ही  पाहिला का?' हा प्रश्न सध्या जनरली तुम्हाला कुणी ही कुठं ही विचारू शकतं.तुम्ही शाॅकेब्लस् व्हायचं नाही.साधा पिक्चर  आहे तो ..!!  नाही पाहिला तर नाही पाहिला त्यात काय एवढं? असं तर बिलकुल म्हणायचं नाही.मग 'पुष्पा-01चांगला होता की पुष्पा-02 ?' ओटीवर पाहिला की थेटरात?अशी अनेक प्रश्न तुम्हाला विचारली जाणार मग या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय देणार? आहे की नाही पंचाईत? पुष्पा-02  न पहाणं म्हणजे दिवाळीच्या सणाला लाडू न केल्यासारखं आहे.गटारी साजरी न केल्यासारखा कमी पणा आहे. अजून यांनी पुष्पा -2 नाही पाहिला रे.बिच्चारा...!! तुमची अशी कुणी कीव ही करू शकतं. तुम्ही चहा पितात,नास्ता करता,सिगारेट  ओढता ,जेवण  करता,पानं खाता आणि पुष्पा- 2 पाहत नाही? का पहात नाही तो? छे..छे..!! तुम्ही एक भयंकर चूक करत आहात. पुष्पा-2 पहाणं फार अपरिहार्य  करण्यात आलेलं आहे.कुणी केलेयं इतकं अपरिहार्य..?? तुम्ही  मला केलं.मी तुम्हाला केलं.आपणचं आपल्याला. पुष्पा-2 ने तुफान राडा केला बाॅक्स  ऑफिसवर...!! त्या राडा करणा-या गर्...

सकारात्मक विचारांची कला: अनुमानांच्या पलीकडे एक प्रवास

इमेज
  सकारात्मक विचारांची कला: अनुमानांच्या पलीकडे एक प्रवास  जीवनाच्या गुंतागुंतीच्या नृत्यात, आजचा दिवस निव्वळ सट्टेबाजीचा दिवस वाटतो.  मानवी मन हे एक गूढ आहे - गुंतागुंतीचे, अप्रत्याशित आणि खोलवर भावनिक.  सर्व प्रगती असूनही, मानवी हृदयाची प्रवृत्ती मोजण्यासाठी सक्षम असे साधन आपण अद्याप विकसित केलेले नाही.  आणि जरी असे उपकरण अस्तित्वात असले तरी ते भावना, आशा आणि स्वप्नांचे प्रमाण कसे ठरवेल? मतदान आणि अंदाज: एक सदोष विज्ञान? लाखो लोकांची सामूहिक मानसिकता समजून घेण्याचा दावा करणाऱ्या पोल, सर्वेक्षणे आणि भविष्यवाण्यांबद्दल आपण अनेकदा ऐकतो.  पण प्रामाणिकपणे सांगू - आपण इतक्या लोकांच्या विचारांचे आणि भावनांचे खरोखर विश्लेषण करू शकतो का?  या पद्धती जरी विज्ञानाच्या वेषात घातल्या असल्या तरी बऱ्याचदा आधुनिक काळातील अंधश्रद्धा वाटतात.        तज्ञ आणि विश्लेषक अनेकदा आत्मविश्वासाने बोलतात, त्यांचे निष्कर्ष परिपूर्ण सत्य म्हणून सादर करतात.  पण प्रत्यक्षात, या तथाकथित वैज्ञानिक निष्कर्षांवर आपण किती वेळा प्रश्न विचारतो?  बहुतेक लोक, अगद...

मनोज जरांगेचा जीव महत्वाचा: आरक्षणाच्या लढ्याचे नायक

इमेज
  म नोज जरांगेचा जीव महत्वाचा: आरक्षणाच्या लढ्याचे नायक मनोज जरांगे, मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील प्रमुख चेहरा, आज केवळ एका व्यक्तीचा नाही तर लाखो मराठा समाजाच्या हक्कासाठी लढणाऱ्या आवाजाचा प्रतीक बनला आहे. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून आंदोलनाचा एक सशक्त लढा उभारला आहे. त्यांच्या या संघर्षामुळेच मराठा समाजाचे हित सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सरकारवर मोठा दबाव आला आहे. जरांगे यांनी आपल्या आंदोलनादरम्यान केलेल्या उपोषणामुळे शारीरिक अवस्था खालावली, ज्यामुळे त्यांचा जीव धोक्यात आला होता. मात्र, त्यांचा जीव फक्त त्यांच्या कुटुंबापुरता मर्यादित नसून, मराठा समाजाच्या एकात्मतेचे प्रतीक बनला आहे. जरांगे यांचा जीव सुरक्षित राहणं म्हणजे मराठा समाजाच्या संघर्षाचं चालू राहणं आणि त्यांच्या मागण्यांसाठी लढण्याची शक्ती कायम राहणं होय. जरांगे यांचा जीव महत्वाचा आहे कारण त्यांची लढाई फक्त एका समाजापुरती मर्यादित नसून, हा लढा सामाजिक न्यायासाठी आहे. त्यांच्या नेतृत्वाने मराठा समाजातील असंतोषाला आवाज दिला आहे आणि त्या समाजाच्य...

कर्णाच्या भावविश्वाचं चित्रण करणारी कांदबरी –मृत्यूजंय

इमेज
"मृत्युंजय" ही शिवाजी सावंत यांनी लिहिलेली मराठी कादंबरी आहे, जी महाभारतातील कर्णाच्या जीवनावर आधारित आहे. ही कादंबरी कर्णाच्या जीवनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकते आणि त्याच्या संघर्षमय जीवनाची कथा सांगते. कर्णाच्या दृष्टीकोनातून लिहिलेल्या या कथेच्या माध्यमातून लेखकाने समाजातल्या विषमतेविरुद्धचा त्याचा लढा, त्याची दुःखे, त्याच्या नैतिकता आणि त्याचे विचार यांचा सखोल अभ्यास केला आहे. कथानक: "मृत्युंजय" कादंबरी सात भागांमध्ये विभागली आहे, आणि त्यामध्ये कर्णाच्या जीवनाचे विविध टप्पे उलगडण्यात आले आहेत. कादंबरीत मुख्यतः कर्णाचा संघर्ष, त्याचे दानवीरपण, त्याची मैत्री, त्याचे राजनिष्ठा आणि त्याच्या आयुष्यातल्या विविध घटना यांचा समावेश आहे. कर्णाला जन्मतःच समाजाने नाकारले, कारण त्याच्या जन्माची गोष्ट गुप्त ठेवली गेली होती. सूर्यदेवाचा पुत्र असूनही त्याला समाजात स्थान मिळाले नाही. त्याच्या अंगावर कवच कुंडले असतानाही तो आपल्या जन्माच्या सत्यामुळे अपमानित होत राहिला. मात्र त्याने स्वतःच्या सामर्थ्याने आणि निष्ठेने आपली ओळख निर्माण केली. कर्णाच्या जीवनातील मोठी घटना म्हणजे त...