पाटोदा येथे सामाजिक समता सप्ताहानिमित्त भव्य काव्यसंमेलन – कवींच्या प्रभावी सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध
Group phota of Poet &Staff पाटोदा येथे सामाजिक समता सप्ताहानिमित्त भव्य काव्यसंमेलन – कवींच्या प्रभावी सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध #सामाजिकसमता#आंबेडकरीचळवळ#समतेचा संदेश#BahujanVoices#EqualityThroughPoetry#VoiceOfTheVoiceless महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समतेचा जागर करणारे एक प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी काव्यसंमेलन नुकतंच पाटोदा येथील शासकीय निवासी शाळेत पार पडलं. "डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह" या उपक्रमांतर्गत झालेल्या याकविसंमेलनात नामवंत कवींनी सहभाग घेत रसिकांची मनं जिंकली.'DrAmbedkarJayanti' कार्यक्रमाची सुरुवात – दीपप्रज्वलन आणि प्रेरणास्थानांना अभिवादन कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित कवींचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. नितीन तरकसे यांनी केलं."Ambedkar-Thoughts" कवींची सामाजिक भानाने परिपूर्...