इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नावर मोठा खर्च? सोशल मीडियात चर्चेला उधाण”


माणसानं गरीब नसावं.अतिशय गरीब तर कुणीच नसावं.वै-यानं पण गरीब नसावं. 

श्रीमंत  असावं.फार फार श्रीमंत  असावं.आपण जगात सर्वात श्रीमंत  असावं असं प्रत्येक माणसाला वाटतं असतं.ते एक स्वप्नच असतं.सुप्त असतं पण ते सां-याचं असतं.माणसानं पैशा कमवला पाहिजे कारण कोण म्हणतंय? पृथ्वी सूर्याभोवती फिरते? पृथ्वी तर पैशाभोवती फिरते.

पैसा कमवा.प्रचंड  पैसा कमवा.कसा ही कमवा पैशाला महत्व आहे.

सर्व माणसं श्रीमंत  होत नाहीत.जगातील दारिद्र्य  ही कुणी दूर करू शकत नाही.तुम्हाला हे मान्य का? श्रीमंत  लोक हे देवाचे लाडके असतात.श्रीमंती हे वरदान असते.श्रीमंत लोक ज्ञानी आणि हुशार असतात.गरिब  लोक हे मंद बुध्दी व मूर्ख असतात.गरीबी ही शाप असते. त्यामुळे तुम्ही श्रीमंत  व्हा.

    मुक्ती, मोक्ष, चिरंतन  आनंद वगैरे या गोष्टी ख-या नाहीत. पैसा आला की सर्वत्र आनंदी आनंद असतो. आशा, लोभ हे दुःखाचं मूळ नाही.पैसा नसणं हे खरं तुमच्या दुःखाचं कारण आहे. षडविकारावर मात करणं हे शक्य नसतं.ऐश्वर्य आहेत तर ते भोगलं पाहिजे.दाखवलं पाहिजे.ऐश्वर्य  दाखवण्यात पराकोटीचा आनंद असतो.भावकीच्या नाकावर टिच्चून ऐश्वर्याचे प्रदर्शन करा. खरचं भारी आनंद असतो.भिकारडे या सुखापासून फार दूर असतात.

हे सारे विचार माझे नाहीत. अनेक वर्ष आपल्याला परमार्थाचे ज्ञान देणारे व  भौतिक सुखाचा त्याग करा असे  सांगणारे महाराष्ट्रातील ख्यातकिर्त  समाज प्रबोधनकार  इंदुरीकर महाराज व त्यांच्या लग्नात जमलेल्या थोर  स्वयंघोषित संतजणाचे हे महान विचार आहेत. 

उगी टाळ कुटू नका.पैसा कमवा.पैसा.. !!!

बोला रामकृष्ण हारी...!!!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

युध्द पेटले आहे – जगण्याचा चंग आणि संघर्षाच्या गर्जना करणा-या माणसांच्या कविता.

. एका काॅलगर्लची डायरी भाग 1 | प्रेम, वेदना आणि समाजाच्या वास्तवाची सत्यकथा

भोंदूबाबा कॅप्टन खरात आणि मूर्ख राजकारणी.