पोस्ट्स

युध्द पेटले आहे – जगण्याचा चंग आणि संघर्षाच्या गर्जना करणा-या माणसांच्या कविता.

इमेज
युध्दं पेटले आहे – जगण्याचा चंग आणि संघर्षाच्या गर्जना करणा-या माणसांच्या कविता. 'युध्द पेटले आहे 'हा बाळासाहेब नागरगोजे यांचा पहिलाच कविता संग्रह.महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेतून अनघा प्रकाशना मार्फत प्रसिद्ध करण्यात आला आहे.तो नुकताच वाचण्यात आला. पिढयानपिढया वाटेला आलेला संघर्ष व काळजात घर करून राहिलेल्या वेदनांचा परिपाक म्हणजे हा कविता संग्रह आहे. होरपळत गेलेली स्वप्न,व्यवस्थेने खुडून घेतल्या गेलेल्या जगण्याच्या आशा,वाटयाला आलेलं दारिद्रय व उपेक्षित जिणं.मराठवाड्यातील ग्रामीण भागातील वास्तव,त्याचे चटके,उपेक्षितांचे प्रश्न,सामाजिक विषमतेमध्ये भरडत गेलेले माणूसपण.जातीवादाचे उसळलेले डोंभ,दांभिक राजकारणात होरपळत जाणारी पण जगण्यासाठी पराकोटीचा संघर्ष करणारी माणसे इ.गोष्टीने कवीचं भावविश्व आकारत गेलेले असावं याचा प्रत्ययं आपल्याला कविता वाचतानी सतत येत राहतो.संपूर्ण शोषण मुक्तसमाज हे भगतसिंगाचं स्वप्न उरी घेऊन कवी धडपडतो आहे.हीचं हया कवीची काव्यप्रेरणा आहे असे आपल्याला अनेक कविता वाचताना जाणवते.                ...

शिमगा: बोंबलायचा आणि धम्माल करण्याचा सण..!!!

इमेज
शिमगा सण म्हणजे बोंबलायचा सण.शिमग्याला होळी म्हणतात,हे लयीत उशीरा कळलं आम्हाला एक मारकुटे मास्तर होत कुलकर्णी  ते फार शुध्द बोलायचं त्यानं आमच्याकडून होती हा शब्द घोटून घेतला होता पण आम्हाला शिमगा आवडायचा.शिमग्याला बोंबलायचं नि पोळी दुधावर वरपायची हेच माहित होतं.होळी रे होळी नि पुरणाची पोळी.. !!!  एकाचं एक सण असा होता तो आमच्यावर फुल डिपेंन्ड  असायचा.पोरा नि जर शिमगा लयं सिरीअस  नाही घेतला तर आमच्या भेटू पाटलांकडून लयं टेन्शन यायचं.लाकडं गोव-या कश्या आणणार.लोक लयीत दिलदार असत्यात.त्यांना म्हटलं कुणी लाकड किंवा गोव-या आणा तर कोण आणतोय. सारं हात हालवली येणार.त्यामुळे पाटलांकडून आमची म्हणजे बाप्पाची व परम्याची गँग लागे.तेव्हा  सरकारला नापासाची चिंता नसे.आमचा बाॅस बप्या सलग पाच बा-या नापास झाला होता.त्याच्या बरूबरची पोरं पार दहावीला गेले.हा आमच्याच वर्गात.सा-यात टोंगळा..!! त्याची सरकारला नाही व कधी त्याच्या बापाला ही नापास होतोय म्हणून चिंता वाटली नाही. बप्या तर डेंजरस माणूस होता. टेन्शन लेने का नही देने का? हा त्याचा मंत्र. भैरू पाटील देई आम्हाला चिमकून.पाटलाचा पाठ...

सिनेमाचे पडद्यावरचे पात्र आणि समाजाची भावना: एक वास्तव विचार

इमेज
बरेच माणसं आता मेंदूचा वापर कमी करू लागले आहेत. ह्रदयचं त्यांच मेंदूचं काम करू लागले आहेतं. ह्रदयाला काही बुध्दी नसते.तिथं नुसता भावनांचा कल्लोळ असतो. मेंदूचं कन्फ्यूज झाला आहे. त्यामुळे बरीचं माणसं विचित्र बोलतात.वागतात. त्या जुवेकरचचं घे ना? तो चक्क अक्षय खन्नाला अजून ही बोलत नाही. का म्हणून काय विचारता ?  अक्षय खन्नाने औरंगजेबाचा रोल केलाय ना? नुसता रोल करेना का?कुणी कुणाचा ही रोल करते पण इतका हुबेहुब रोल करत असतेत का कुठं?  काय डेंजरस रोल वठवला गड्यांनी? तो खरचं औरंगजेब वाटतोय.  तो रोल केल्यामुळे भयंकर राग आलाय त्या जुवेकरला त्या अक्षय खन्नाचा.त्याने (म्हणजे औरंगजेबाने अक्षय खन्नाने नव्हे) इतका शंभू महाराजाना त्रास दिला.त्याला कसं बोलायचं? नुसती चीड येते हो त्याची.संताप पण. आता चित्रपटात माणसं रोल करतात म्हणजे...?? ते खरे थोडेच असतात?जुवेकरला हे मान्य नाही. खरचं तो नाही बोलला त्या अक्षय खन्नाला.अजून पण नाही बोलत तो त्या खन्नाला. त्या विकी कौशल सोबतचं तो राहयचा? असचं नाही.विकी कौशल म्हणजे साक्षात शंभू राजेच त्याला वाटत असतील.असं नक्की त्याला फिलींग येतचं असणार.अक्षय ...

अनोळखी सखी: जिंदगीची हुरहूर

इमेज
ती बस स्टॉपवर भेटली.ती सुंदर होती. मी बराचं वेळ पहात होतो. ती खूप चंचल होती. तिचं चालणं पहाणं मोहक होत. मला ती आकर्षित करून घेऊ शकली होती. माझीच नाही अनेकांच्या नजरा ही तिच्याकडेच रोखलेल्या होत्या.असा एखादा चेहरा असल्या अनोळखी गर्दीत असतोच असं माझं निरीक्षण आहे. हआपल्यावर इतक्या नजरा खिळल्या हे तिच्या लक्षात ही आलं असावं तिच्या प्रत्येक हालचालीत एक लय होती. माझ्या मनात अनेक गाणी रूंजी घालू लागली होती. खरतर मी ती गाणी गुणगुणू ही लागलो होतो.माझं ही वय तसं फार नव्हतं.मी नववीत असेल? आणि ती? मला कुठं माहित होतं? ती माझ्या पेक्षा वयानं थोडी लहान असेल.पाठीवर सोडलेले मोकळे केस.पोपटी रंगाचा कुर्ता.. व्हाईट रंगाची टाऊजर.छानशी गुलाबी रंगाची ओढणी.पाठीवर सॅक बहुतेक तिचं ते दप्तर असावं.मला नक्की आज ही आठवतं.तिनं आपल्या ड्रेसला मॅच होईल असे टिकली लावलेली होती.तिचा रंग गोरा होता. तारुण्याच्या खूणा तिच्या अंगा खांदयावर स्पष्ट झाल्या होत्या. या सा-या रंग संगतीमुळे,ती कमालीची आकर्षक दिसतं होती.हाय..हाय..अंधारात!! मर जाऊ..!!!अश्या विशिष्ट वयात साधारण सर्वच मुली सुंदर दिसतात. तारुण्याची झाक सौंदर्...

गुंतता ह्रदथ हे..!! भाग 5

इमेज
  भाग 5 तृप्ती हो ना?रात्रं झालीय.” त्याचं लक्षं नव्हतं तिच्याकडं.तृप्ती फ्रेश झाली होती.तिनं कपडे ही चेंज केलं. निलेशचं चित्तं कुठं जाग्यावर होतं? रेवाच्या अनेक छबी त्याच्या डोळया समोरून हालत नव्हत्या. खरतर त्याला यातलं काहीचं आठवायचं नव्हतं पण आठवणीची पण उबळ असेल न थोपवता येणारी.आठवणीची मळमळ त्याला सहन होत नव्हती.माणूस  त्या उपसून नाही टाकू शकतं.                                रेवाची अनेक वर्षची रूप त्याच्या डोळयासमोर उभी राहिली. हासरी ,लाजरी,भित्री,रागातली,प्रणयातूर,लटक्यारागतली व संतृप्तं.अश्या अनेक भाव मुद्रा तिच्या  निलेशच्या मनावर उमटतं. काही क्षण त्याला वेडावत नि अदृश्य होतं. रेवा अशी आज नको होती भेटायला. आपल्याला हवं तसचं सारं नाही होऊ शकतं. ती अचानक भेटली. भेटली तर भेटली पण तृप्ती सोबत असताना तरी नको होती भेटायाला.तिला असं काहीच बोलता आलं नाही.तिच्या डोळयात ही पहाता आलं नाही. डोळ तरी कसं वाचणार?  खर तर ती पाहील्यानंतर सुरवातीला प्रचंड भिती वाटली. रेवा येऊन जर काही बोललं तर तृप्त...

"छावा (Chaava) मराठी चित्रपट – बॉक्स ऑफिसवर तुफान गाजतोय!"

इमेज
छावा, चित्रपट तुम्ही पाहिलायं का?  याचं उत्तर तुमचं 'नाही' असं असेल तर हे काय हे जिणं तुमचं..!! पहा, ना मग उशीर कसला करताय? तुम्हाला तो पाहायचा तर आहेच ना? मग बघा ना लवकर...!! उशीर का करता..?  हे पहा तो थिएटरला जाऊन पाहयचा आहे.कुठं ही आणि कसा ही पाहयचा नाही. मज्जा नाही येणार? साॅरी..!! छावा चित्रपटाची मज्जा नाही घेऊ शकत कुणीचं.आपलं काळिज कुणी होरपळून काढताना कुणी सिनेमा एन्जॉय करू शकत का? ते शक्य नाही. धडपडणारे जर ह्रदय तुम्हाला असेल तर तुम्ही न रडता तो चित्रपट पाहू नाही शकत. काय म्हणता? इतकं इमोशनल का होताय.साधा चित्रपट तो? फार तर तो छान जुळून आला आहे असं म्हणा.कलाकाराचं कौतुक करा फार तर.  चित्रपट तो.एक कलाकृती म्हणूनच पहा ना? कुणाचं पात्र कसं रंगलय? हे सांगत बसा.आहो,रडताय काय तुम्ही? ही एक कलाकृतीची आहे याचं भान ठेवा.ते सारं सारं खोटं असतं.सारं रंगवलेलं असतं. चित्रपट गृहातचं शिवगर्जना वगैरे .... हे फार अति होत हं...!! खरं तुमचं.ते सारं रंगवलेलं आहे. मला माहिती ही आहे ते सारं खोटं घडतयं.इफेक्ट दिलेले सीनस् आहेत ते सारे. सारं सारंचं खोटं पण आम्हाला खरं का वाटतय...

तुमचा गाल आमची थप्पडं

इमेज
 तुमचा गाल आमची थप्पडं मी काॅलेजला असताना एक एकांकीका पहिली होती.पूर्वी एकांकिकाचे टायटल फार भन्नाट असतं.सोशल मिडीया नव्हती तेव्हा नाहीतर एका एका टायटेलनं तुफान राडा केला असता  सोशल मिडीयावर....!!  'तुमचा गालं..!!, आमची थप्पड..!!" अशी भन्नाट  टायटल असलेली सामाजिक  व राजकारणावर भाष्य करू शकेल अशी  एकांकिका एका स्पर्धेत  पाहण्यात आली होती. एका सामान्य नागरिकाची कशी ससेहोलपट केली जाते या व्यवस्थेमध्ये याची काही प्रसंग मोठ्या कौशल्याने त्या एकांकिकेत गुंफले होते. आम आदमीची प्रत्येक वेळेला कशी  प्रत्येक टप्प्यावर हारेशमेन्ट केली जाते हे दाखवण्याचा अफलातून  प्रयत्न त्यात केला होता. या व्यवस्थेचे आणि तुमचं नात काय ?, तुमचा गाल आणि आमची थप्पड..!! तुम्ही फक्त  मुकाटयाने गाल पुढे करा....आम्ही एक थप्पड  लावतो. थप्पड लगावण्यात एक प्रकारचा परमानंद असतो.हा आंनद दुस-याला देताना तुम्ही तक्रार करू नका.हसू नका पण सोसा.रडू नका फक्त कण्हा. तुमच्या गालात जर कुणी जोरात थप्पडं मारली तर तुम्ही काय कराल? आपल्या चिंतनशीलतेला भरपूर वाव देणारा हा प्रश्न आहे. ए...