पोस्ट्स

एका काॅलगर्लची डायरी भाग 2

इमेज
  Marathi story                                                                       भाग -2 ब्ल्यूस्टार हॉटेलच्या भव्य हॉल मध्ये लग्‍नाच्या गर्दीत राधा मॅडमला अचानक आवाज आला.त्या वर्दीतच होत्या.त्याचं एकमेव महिला त्या लग्नात असतील की त्या साडीत नव्हत्या.नटलेल्या,सजलेल्या नव्हत्या. त्या ऑनडीयुटी सहभागी झाल्या होत्या.त्यामुळे वर्दीतच होत्या. “तुम्ही राधा.. देसाई ना?”ओळखीचा चेहरा.ओळखीचा आवाज.कोण असावा याचा अंदाज त्या बांधत बसल्या.खरतर त्यांना काहीच आठवत नव्हतं.गर्दीत असं कुणी तरी अचानक येते आणि डायरेक्टं नावानंच बोलत.त्यावेळी इतकं गोंधळून तर माणूस जाणारच ना?एक सुंदर बांधेसूद तरूण महिला त्यांच्याकडे हासत येत होती.काही क्षण त्या नुसत्या तिच्याकडे पहात राहिल्या.त्या एकटयाचं तिच्याकडे पहात नव्हत्या.अनेक नजरा तिच्यावर खिळल्या होत्या.ती बाई नटलेली असली तरी ओव्हर मेकअप मुळीच केला नव्हाता ति...

रावण: राजा राक्षसांचा वेगळा दृष्टीकोन देणारी कांदबरी

इमेज
 रावण: राजा राक्षसांचा वेगळा दृष्टीकोन देणारी कांदबरी शरद तांदळे यांची रावण राजा राक्षसांचा (४३२ पृष्ठे, न्यू एरा पब्लिशिंग हाऊस) ही कादंबरी मराठी साहित्यातील एक महत्त्वाची संशोधनात्मक कृती आहे. पारंपरिक रामायणात रावण हा केवळ अहंकारी खलनायक म्हणून दाखवला जातो, पण तांदळे यांनी रावणाच्या दृष्टिकोनातून त्याचे पूर्ण जीवन चित्रित केले आहे. ही कादंबरी रावणाला एक महान नेता, विद्वान, शिवभक्त आणि न्यायप्रिय राजा म्हणून उभी करते, ज्याने दैत्य, दानव, असुर आणि भटक्या जमातींना एकत्र करून सोन्याची लंका निर्माण केली. लेखकाने अनेक पौराणिक संदर्भांचा अभ्यास करून काल्पनिक अतिशयोक्ती टाळली आहे, ज्यामुळे कथा वास्तववादी आणि विचारप्रवर्तक वाटते. Ravan:Raja Rakshncha Novel कादंबरी रावणाच्या बालपणापासून सुरू होते – त्याच्या कौटुंबिक कलह, आई-वडील, आजोबा सुमाली आणि भावंडांशी असलेले नाते. रावण हा ब्राह्मण वंशज असूनही राक्षस संस्कृतीत वाढतो. त्याची महत्त्वाकांक्षा, ज्ञानाची भूक आणि अन्यायाविरुद्ध बंडखोरी यातून तो लंकेचा राजा बनतो. तो देवांना पराभूत करतो, पण त्याचे निर्णय नेहमी न्याय आणि स्वाभिमानावर आधारित अस...

. एका काॅलगर्लची डायरी भाग 1 | प्रेम, वेदना आणि समाजाच्या वास्तवाची सत्यकथा

इमेज
एका काॅलगर्लची डायरी | प्रेम, वेदना आणि समाजाच्या वास्तवाची सत्यकथा Marathi story मराठी कथा भाग एक पहाटेचे पाच वाजले होते.पूर्वेला तांबडा रंग दाटून आला होता.वारं मंद वाहत होतं.थंडी ही चांगलीचं बोचत होती.स्वेटर,मफलिरी गुंडाळून माणसं चालत होती.स्ट्रीट लाईट जळत होत्या.गुलमोहरांच्या फुलांचा खचीचं खच पडला होता रस्त्यावर.कुणाकुणाच्या दारात पारिजाताकांचा सडा पडला होता.त्यांचा मंद पण धूंद गंध मनाला मोहित करीत होता.पाच वाजून गेल्या होत्या तरी माणसांची वर्दळ फारसी नव्हती.तुरळक तुरळक माणसं टोळक्या टोळक्यांनी चालत होते.काही नवीन पोरं पळूपळू घाम काढीत होते.            राधा देसाई ही जाँगींग करत होत्या.रनिंग केल्यामुळे अंग सारं घामेजून गेलं होतं त्यांच.अंग सारं  थबथबलेलं होतं.थोडसं थकल्या ही होत्या त्या.तेवढयात मोबाईल वाजला.               इतक्या सकाळी फोन एकतरी घरीहून तरी असावा नाहीतर पोलिस स्टेशनवरून तरी.दुसरा कॉल या नंबरवर शक्यचं नव्हतं कारण त्यांचा हा प्राव्हेट नंबर होता.अ...

एपस्टीन फाइल्स १९ डिसेंबरला उघड: भारतातील सत्तापालटाची अफवा की सत्य? पूर्ण विश्लेषण

इमेज
  जगाच्या राजकारणात काही तारखा अशा असतात, ज्या केवळ कॅलेंडरवरच्या आकड्यांपेक्षा जास्त काही दर्शवतात. १९ डिसेंबर २०२५ ही अशीच एक तारीख ठरली आहे, ज्याकडे केवळ अमेरिकेच नव्हे, तर जगभरातील अनेक देशांच्या राजकीय वर्तुळांचे लक्ष लागले आहे. अमेरिकेतील कुख्यात जेफ्री एपस्टीन सेक्स स्कँडलशी निगडित गोपनीय कागदपत्रे – ज्यांना 'एपस्टीन फाइल्स' म्हणतात – या दिवशी अमेरिकन न्याय विभागाकडून (DOJ) सार्वजनिक होण्याची शक्यता आहे. ट्रम्प प्रशासनाने नोव्हेंबरमध्ये 'एपस्टीन फाइल्स ट्रान्स्परन्सी अॅक्ट' कायद्यावर स्वाक्षरी केली, ज्यामुळे ३० दिवसांत ही फाइल्स उघड करण्याची बंधनकारकता आली. आता वेळ जवळ आली आहे, आणि या फाइल्समधून काय बाहेर येईल, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. जेफ्री एपस्टीन हा नाव अमेरिकेच्या उच्चभ्रू वर्तुळातले एक काळे पडदे उघडणारा आहे. धनाढ्य उद्योगपती, राजकारणी, सेलिब्रिटी आणि प्रभावशाली व्यक्तींशी जवळीक असलेला हा माणूस, अल्पवयीन मुलींच्या माध्यमातून एक घाणेरडे जाळे विणत होता. हनीट्रॅप, सेक्स ट्रॅफिकिंग आणि ब्लॅकमेलिंगचे आरोप त्याच्यावर होते. २०१९ मध्ये तुरुंगात त्याचा मृत्य...

महाराज, हे पाप कशाने धूवायचे? कीर्तनाला ही गर्दी होऊ शकते.इंदुरीकर तरुणाईला कीर्तनाकडे मोठया संख्येने आकृष्ट करून घेण्यात कमालीचे यशस्वी झाले. त्यांची भाषा विनोदी आहे.उपहासात्मक आहे.व्यंग निर्माण करणारी आहे.ती अस्सलं बोली भाषा आहे.प्रमाण भाषेचा वापर ते करत नाहीत. इंदुरीकर लोकप्रिय होण्याची कारणे अनेक असले तरी ते फार स्पष्टं बोलतं.स्पष्टं आणि खरं बोलले लोकांना आवडतं. त्यामुळेच लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले होते. इंदोरीकरच्या कीर्तनाची भाषा ग्राम्य असली तरी ती अनेकदा अश्लील व शिवराळ असते.लोक इंदुरीकरला शिव्या खाण्यासाठी पैसे देतात असं ही बोललं जातं. "या बोंकाडी बसा..!!" पठ्याच्या एका डायलॉवर गाणं निघालं.अनेक वरातीत गाजलं.अनेक बेवडे त्यावर थिरकले पण. समाजातील व्यसनाधीनतेवर व अनिष्ट रूढी परंपरेवर ते प्रखर बोलतं असतात. इतकं कटू बोलणं ही लोक एन्जॉय करायचे. इंदुरीकर यांच कीर्तन या व्याख्येत बसत नाही अशी ओरड काही दिवस चालू होती.पुन्हा असल्या विनोदी कीर्तनाची लाटचं आली. कपात माशी पडली तर दूध फेकून देतात येतं. दुधाच्या कढईत जर माझी पडली तर काय करणार? स्वच्छ पाणी शिंपडून कढईतले दूध पवित्र करण्याची प्रथा आहे. तसचं झालं. लोकांनी कीर्तनाच्या नावाखाली कसले ही जोक विनोद सहन केले. वारकरी संप्रदायात कीर्तनाचा एक साचा आहे.त्याची एक शैली आहे.त्याची एक अचारसंहिता आहे.वारकरी संप्रदायाच्या पडठीत इंदुरीकराचं कीर्तन बसत नाही. हल्ली अनेक कीर्तनकाराची कीर्तने वारकरी संप्रदायाचे अचारसंहिता न पाळणारे आहेत. इंदोरीकर एकटेच नाहीत. व्हाटस्ॲपवरचे जोक सांगून,किस्से सांगून करमणूक करणारे कीर्तनकार ही शेकड्याने आहेत. विनोदाचार्य,समाजप्रबोधनकार,गायन सम्राट अशी बिरुदावली घेऊन कीर्तनाचे धंदा करणारे उदंड झाले आहेत. पक्ष व पुढा-यां मागे लाळ घोडमारे ही अनेक पाहिले आहेत. इंदुरीकर व तश्याच धाटणीच कीर्तनकार वारकरी संप्रदायातील लोकांना आवडत ही नाहीत. त्यांना नाही आवडलं तरी लोकांना ते फार आवडतात. आज ही इंदुरीकरांच्या दोन दोन वर्षाच्या तारखा बूक असतात.लोकांना, ते हसवतात.डोळ्यांत, अंजन घालतात.लोकांना इंदुरीकरचं कीर्तन जाम आवडतं. ते,अध्यात्मिक आनंद देते असं नाही पण ते एन्टरटेनमेंट चांगल करतं. इंदुरीकर एका अखंड हरिनाम सप्ताहातील कीर्तनात स्पष्टं बोलले होते की लाख दीड लाखाचा इंदुरीकर व पाच सहा लाखाचा ढोक महाराज ऐकण्याची ऐपत नाही तुमची तरी तुम्ही तो खर्च करता. देव तुमचं भलं करो. इतकं स्पष्टं बोलून ही त्यांच किर्तन लोक आज ही ठेवतात.ऐकतात. आता कीर्तन हा धंदा झाला आहे.उदरनिर्वाहाचं साधन झाले आहे. अनेक जण त्याच्या कडे करिअर म्हणून पाहतात. त्यातील अध्यात्मिक ढाचा गळून पडला आहे. धंदा कुणी कोणता ही करू शकते.कीर्तनाचा धंदा करणं हाडाच्या वारक-याला आवडणार नाही. त्यांना ते पचत नाही. लोकांना मनोरंजन प्राधान्य किर्तन आवडतात. कीर्तनकार ही तसचं किर्तन करतात. लोक वर्गणी करून लाखाच्या खर्चाचे सप्ताह करतात.काही संस्थानाच्या सप्ताहाच्या कीर्तनाचे बजेट कोटीत असतात.लोक वर्गणी करून ते खर्च करतात.लोकांना ते परवडत पण. हरी किर्तन करताना पैसे घेऊ नयेत.तिथं जेऊ,नये.चंगळीत व चैनीत जीवन जगू नये असे अनेक संत प्रमाण आहेत.किर्तनकार सांगतात पण तसं वागत नाहीत. उलट किर्तनकार भलं मानधन घेतात त्याचं ही समर्थन करतात. गावागावात स्पर्धा लावून सप्ताहाचे मोठे इव्हेंट साजरे करून घेतले जातात.महागाडया गाड्या घेतात. ख-या सुखाची व्याख्या करताना अनेक कीर्तनकार भौतिक सुखात गुरफटत जातात. 'संसार दुःख मूळ' आहे हे सांगताना अनेक किर्तनकार त्यात जखडून गेले आहेत. ऐश्वर्य तर ते जमा करतातचं पण त्याचं प्रदर्शन ही करतात. मत्सर तर महाराज लोकांत पराकोटीचा असतो. कोणत्याही जीवाचा ना घडो मत्सर हे कोण्या तोंडानी महाराज सांगतात काय माहित? अध्यात्मिक मूल्य जोपासणारे अनेक महाराज अडगळीत पडले आहेत.लाखोचे मानधन स्वीकारून अनेक बड्या नेत्याच्या,वाढदिवसाला हे महाराज लोक किर्तन करतात. आपले मानधन वाढवून ते आपला बाजार भाव ही वाढवून घेतात. मार्केटिंगचे अनेक फंडे ते आमलात आणतात.आपलं नाणं टिकलं पाहिजे. ते वाजले पण पाहिजे. असा आटोकाट त्यांचा प्रयत्न असतो. 'बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले" असं म्हणतात. बोलणं सोप असतं. तसं वागणं अवघड असतं. इंदुरीकर महाराजांचं पण हेच चुकलं आहे. ते ज्या प्रमाणे बोलत आले तसं वागणं अपेक्षित होते. लोक अपेक्षा ठेवणारं. त्यांना ते जमलं नाही. समाजप्रबोधनकार इंदुरीकरचा त्यांच्यातला बापाने पराभव केला. मोहमायात ते गुतत गेले. षट्कार विजय मिळवणे सोपे नाही. आता अनेक महाराज इंदुरीकरचं समर्थन करताना तुम्हालाच दिसतील. ते अनेक वाईट प्रथाच उदात्तीकरण करताना ही दिसतील. मराठा समाज मुलीच्या लग्नात बडेजावपणाने मोठा खर्च करतात.हे एक मराठा समाजाच्या अर्थिक मागासलेपणाचे कारण आहे. सकल मराठा समाजाने हगवणे हुंडाबळीच्या प्रकरणा नंतर साधेपणाने लग्न करण्याचा एक मनोदय व्यक्त केला होता. जे करून ह्या प्रथेला आळा बसेल. ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी खर्च केला तर काय होते? विवाह सोहळ्यावर ही अनेकांची पोटं भरतात असा ही युक्तिवाद केला जातो. श्रीमंत व प्रसिध्द लोकांनाच सामान्य लोक फालो करत असतात.श्रीमंत लोकांनी साधे लग्न केले तरचं हा पायंडा पडणार आहे.तरच गरीब लोक कर्ज काढून लग्न करणार नाहीत. हे पायंडे कुणी पाडायचे? गरीब लोकांना तर आपण श्रीमंत आहोत याचा आव आणायचा असतोच.भिका-याला हि भिकारी म्हणून नसतं मरायचं. इंदोरीकर महाराज,तुम्ही साधं लग्न करायचं. लोकांनी डोक्यावर घेतलं असतं तुम्हाला.आता किर्तन कसले बंद करता? का फेटा ठेवता? वारकरी संप्रदायातील ही घाण कोण साफ करणार आहे? इथून पुढ जर काही चांगलच करायचं असेल तर फुकट किर्तन करा.कशाला मानधन घेता? व्हा की जरा खरं संत. किर्तनकार पैसे घेणे हे जर तुम्हाला पाप वाटत नसेल तर तुम्ही वारकरी संप्रदायाशी व संतपंरपरेशी प्रतारणा करत आहात. दया फुकट सल्ले. कीर्तनाच्या गादी कलंकित करण्याचं पाप शेकडो महाराज करत आहेत. हे पाप कशाने धूवायचे? घ्या शपथ की एक रूपया ही मानधन घेणार नाही. तुम्ही जसं स्पष्टं बोलतात ना तसचं बोला पण तसं वागायचा प्रयत्न करा. पुढा-यांच्या दावणीला बांधलेले काही महाराज आहेत त्यांची सुटका करा.या,दास्यातून...!! पक्षाची तळी उचलणारे भटीगंण त्यांच्या डोळ्यांत थोडं अंजन घाला. जाती जातीची पाटलाकी करून जातीयवाद पोसणा-याच्या गढया पण उध्वस्त करा. इंदुरिकर महाराज पुन्हा किर्तन करा...!! शेवटी ही सारी घाण कुणी काढयाची? वारकरी संप्रदायाची निर्मळ गंगा अखंड वाहिली पाहिजे मानव जातीच्या कल्याणासाठी. या विश्वस्वधर्म सूर्य पाहण्यासाठी....!!!

इमेज
 महाराज, हे पाप कशाने धूवायचे? कीर्तनाला ही गर्दी  होऊ शकते.इंदुरीकर तरुणाईला कीर्तनाकडे मोठया संख्येने आकृष्ट करून घेण्यात कमालीचे यशस्वी झाले. त्यांची भाषा विनोदी आहे.उपहासात्मक आहे.व्यंग निर्माण करणारी आहे.ती अस्सलं बोली भाषा आहे.प्रमाण भाषेचा वापर  ते करत नाहीत. इंदुरीकर लोकप्रिय होण्याची कारणे अनेक असले तरी ते फार स्पष्टं बोलतं.स्पष्टं आणि खरं बोलले लोकांना आवडतं. त्यामुळेच  लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले  होते. इंदोरीकरच्या कीर्तनाची भाषा ग्राम्य असली तरी ती अनेकदा अश्लील व शिवराळ असते.लोक इंदुरीकरला शिव्या खाण्यासाठी पैसे देतात असं ही बोललं जातं.  "या बोंकाडी बसा..!!" पठ्याच्या एका डायलॉवर गाणं निघालं.अनेक वरातीत गाजलं.अनेक बेवडे त्यावर थिरकले पण. समाजातील  व्यसनाधीनतेवर  व अनिष्ट  रूढी परंपरेवर ते प्रखर बोलतं असतात. इतकं कटू बोलणं ही लोक एन्जॉय  करायचे. इंदुरीकर यांच कीर्तन या व्याख्येत बसत नाही अशी ओरड काही दिवस चालू होती.पुन्हा असल्या विनोदी कीर्तनाची लाटचं आली.  कपात माशी पडली तर दूध फेकून देतात येतं. दुधाच्या कढईत जर माझ...

टीईटीचं भूत शिक्षकांच्या मानगुटीवर

इमेज
टीईटी परीक्षेचे भूत शिक्षकाच्या मानगुटीवर  प्रस्तावना १ सप्टेंबर २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने (न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व मनमोहन) दिलेल्या निर्णयानुसार, कक्षा १ ते ८ पर्यंत शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट (टीईटी) उत्तीर्ण होणे अनिवार्य ठरले आहे. हा नियम २०११ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांनाही लागू होतो. या लेखात या निर्णयाची पार्श्वभूमी, परिणाम, तथ्ये आणि शक्य उपाय यांचा वस्तुनिष्ठ आढावा घेतला आहे. १. आरटीई २००९ कायद्याची भूमिका राइट टू एज्युकेशन (आरटीई) कायदा २००९ हा भारतातील प्राथमिक शिक्षणाचा कायदेशीर आधार आहे. या कायद्याच्या कलम २३ अंतर्गत शिक्षकांच्या कमीतकमी पात्रतेची अट निश्चित करण्यात आली. त्यानुसार, राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद (एनसीटीई) ने २९ जुलै २०११ रोजी टीईटी अनिवार्य केली. टीईटी पेपर १: कक्षा १ ते ५ टीईटी पेपर २: कक्षा ६ ते ८ उत्तीर्ण गुण: १५० पैकी ९० (६०%) २०११ पूर्वी नियुक्त शिक्षकांना ही अट लागू नव्हती. आता मात्र सर्वोच्च न्यायालयाने ती सर्वांसाठी बंधनकारक केली आहे. २. इतर देशांतील शिक्षक पात्रता व दर्जा देश पात्रता सामाजिक स...

तुफानातील दिवे

इमेज
 तुफानातील दिवा...!!! अंधार दाटला आहे. गच्च  सभोवती.अशात उजेडाची सुतराम शक्यता नाही.अश्या काळया कुट्ट अंधारात  एक पणती तेवत आहे. तेवढयात वादळ ही सुटलं आहे. आता कसं तेवायचं..?? कसं अंधाराच्या उरावर नाचायचं..??? अंधार असो नाहीतर वादळ असो. ते क्रूरचं असतं. ते तेवत राहिले.. भिडत राहिले.... इवलीशी पणती शरण येत नाही.हा कदाचित तिचा विजय नसतो पण त्या क्रूर अंधाराचा नि वादळाचा सपशेल पराभव नक्कीच असतो. संजय राऊत साहेब, तुम्ही अनेकदा पराभूत केले या भयंकर संकटांना. तुमची झुंज फार कडवी. तुमच्या रक्तातचं आहे ती. तुम्ही या गंभीर आजाराला हरवून ही लवकर बरे व्हालं असा विश्वास ही आहे. पण काही छोटी माणसं मात्र... तुमच्या आजाराला राजकीय संधी बनवतायत. कीचड उडवतायत. दिल ही छोटासा है..!! खरा योध्दा तर आपल्या शत्रूवर  ही प्रेम करतो. तेच तर खरं शौर्याचं तेज असतं. आज राजकारण बाजूला ठेवूया.माणुसकी पुढे येऊ द्या.  मा.पंतप्रधान नरेंद मोदींनी लवकर बरे होण्येसाठी  शुभेच्छा दिल्या.पवार साहेबांनी फोन केला.फडणवीसांनी संवेदना  व्यक्त केल्या.हीच महाराष्ट्राची शान आहे.हीच भारताची माणुसकी आ...