पोस्ट्स

तुला पहाते रे

इमेज
#TulaPhateRe तुला पहाते रे एका अतृप्त आत्म्याची प्रेम कथा मी पराग.नवीन शहर, नवा जाॅब.पुणे हे माझ्यासाठी नवीनचं शहरं होतं. पुण्याला,जाॅब लागला आणि एका अपार्टमेंटमध्ये मी खोली घेतली ती पण तिसऱ्या मजल्यावर.पहिलाचं दिवस होता.झोप येत नव्हती.  नविन जागा म्हटलं की झोप सहसा लागत नाही.जागाचं होतो.बाहेर लख्ख चांदण पडलं होतं.मी खिडकीत उभा राहिलो.बाहेरच्या अंधारात काहीतरी हलतंय असं वाटलं.माझं लक्ष गेले.बाजूच्या गॅलरीत  एक सुंदर स्त्री  उभी होती.ती टक लावून माझ्याकडेच पहात होती.एकटक .!! मी तर घाबरलोच.अशी अनोळखी स्त्री अशी आपल्याकडे पहाते आहे  ही कल्पनाच मला विलक्षण व विचित्र वाटली.असल्या  चांदण्या रात्री.  'तुला पहाते रे'         मी फार वेळ तिच्या कडे पाहू शकलो नाही. नजरानजर झाली.चक्क तिन मंद स्मित केल.माझ्या अंतरंगात  अनोख चांदण  बरसून गेलं.ती कुमारिका नव्हती तरी मला ती खूप आवडली.कुणी पहाते आहे म्हणून आपल्या प्रेमात आहे असं कसं समजावं? असा मी कोण लागून गेलो होतो?पहिल्याच नजरेत माझ्या कुणी परस्त्री प्रेमात पडायला?तिच्याकडे पाहण्याचं मला धाड...

प्रेमाची जादू: ‘सय्यारा’ आणि जेन झेडच्या हृदयाला स्पर्श करणारी कथा

इमेज
आध्यात्मिक गुरू श्री एम यांनी म्हटले आहे, "प्रेम ही तर्काच्या पलीकडे जाणारी शक्ती आहे, जी अशक्य गोष्टी शक्य करते." प्रेम हे कोणतेही गणित किंवा हिशोब नाही; ही एक खोलवरची अनुभूती आहे, जी पवित्र आणि परिवर्तनकारी आहे. जेव्हा प्रेम स्वार्थाच्या पलीकडे जाते, तेव्हा ते भक्ती बनते, जिथे प्रिय आणि प्रेमी एकरूप होतात, आणि फक्त समर्पणच शिल्लक राहते. या विचाराला आधार देणारी एक सुंदर सूफी कथा आहे, जिथे प्रेमी आपल्या प्रियेच्या दारावर ठोठावतो. प्रत्येक वेळी प्रश्न येतो, "कोण?" आणि तो उत्तर देतो, "मी." दार उघडत नाही. शेवटी, जेव्हा तो म्हणतो, "तू," तेव्हाच दार उघडते. ही कथा प्रेमात ‘मी’ पासून ‘तू’ होण्याची प्रक्रिया अधोरेखित करते. आणि याच भावनेला जेन झेड पिढीसाठी बनलेला बॉलिवूडचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘सय्यारा’ नव्या  ‘सय्यारा’: प्रेमाची एक आधुनिक गाथा ‘सय्यारा’: प्रेमाची एक आधुनिक गाथा अवघ्या दोन आठवड्यांत २५० कोटींचा व्यवसाय करणारा ‘सय्यारा’ हा चित्रपट प्रेमाची ती अवस्था दाखवतो जिथे प्रेम आणि संसार एकत्र साधले जातात. ही कथा पूर्णपणे ‘मी’ चे ‘तू’ होणे नाही, पण ‘मी...

केसरी चॅप्टर २: द अनटोल्ड स्टोरी ऑफ जलियांवाला बाग -

इमेज
Kesari 2 केसरी चॅप्टर २: द अनटोल्ड स्टोरी ऑफ जलियांवाला बाग" हा चित्रपट १९१९ च्या जलियांवाला बाग हत्याकांडानंतरच्या घटनांना केंद्रस्थानी ठेवून, भारतीय वकील आणि बॅरिस्टर सी. शंकरन नायर यांच्या कायदेशीर लढ्याची कथा सादर करतो. रघु पलात आणि पुष्प पलात यांच्या द केस दैट शूक द एम्पायर या पुस्तकावर आधारित, हा चित्रपट ऐतिहासिक सत्य आणि काल्पनिक नाट्य यांचा सुंदर मिलाफ आहे. १३ एप्रिल १९१९ रोजी अमृतसरमधील जलियांवाला बागेत ब्रिगेडियर जनरल रेजिनाल्ड डायरच्या आदेशानुसार ब्रिटिश सैन्याने निःशस्त्र भारतीयांवर गोळीबार केला, ज्यामध्ये शेकडो निष्पाप लोक मारले गेले आणि हजारो जखमी झाले. या क्रूर घटनेनंतर ब्रिटिश सरकारने सत्य दडपण्याचा प्रयत्न केला, आणि त्याविरुद्ध नायर यांनी लंडनमधील कोर्टात ऐतिहासिक लढा दिला.   चित्रपटाची कथा नायर यांच्या दृष्टिकोनातून उलगडते, जे ब्रिटिश सरकारने हत्याकांडाच्या चौकशीसाठी नियुक्त केलेल्या हंटर कमिशनचे सदस्य होते. त्यांचा अहवाल, जो सत्य उघड करणारा होता, ब्रिटिश सरकारला मान्य नव्हता, आणि यामुळे नायर यांना वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर मोठ्या आव्हानांना सामोरं जावं...

सत्यवती: एक शापित कुमारी

इमेज
 सत्यवती: एक शापित कुमारी  सत्यवती: एक शापित कुमारी अकाशातून सूर्य सृष्टीवर सोनसळी प्रकाशाचा अभिषेक घालत होता.झाडांच्या पानापानावर ते सोन पिवळ उन्हं सा॔डलं होतं.यमुनेच्या गहि-या खोल प्रवाहाच्या उरावर ते  नाचत होतं.पक्ष्यांचा मंजूळ कुंजरव भवतालात सर्वदूर पसरला होता.यमुना संथ वाहत होती पण त्यात एक लयं होती.दूर पाण्यात कुणी दोन तीन नौका पैलतीरी सोडल्या होत्या. यमुनेच्या शांत निळ्या गहि-या पाण्यावर कुणी तरी ओल्या जलरंगात चित्र रेखाटवं तसं ते सारं विलोभनीय दृश्य दिसतं होतं .सत्यवती-एक- शापित- कुमारी  झाडं वेली बहरली होती.फुलं आपल्या गंधराशी वा-याच्या हवाली करत होते.तो मंद गंध  सर्वत्र दरवळला होता. रानवेली रंगबेरंगी फुलांनी डवरून आल्या होत्या. फुलपाखरं? फुलावर घिरट्या घालत होते.इतक्या शुभवेळी प्रभात समयी महर्षी पराशर मंद पावलं टाकीत किना-याकडे चालत होते.वर बांधलेल्या जटा.टोकदार दाढी.काळी पांढरी. भगवं उत्तरीय पांघरलेले.शुभ्र धवल पितांबर नेसलेले...हातात कमंडलू.लाकडी पादुकाचा टकटक अवाज करत होत्या.लाल गर्द मऊशार माती त्या पवित्र चरणस्पर्शासाठी अतुर  झालेली..!!  ...

संशयाचा व्हायरस

इमेज
  संशयाचं व्हायरस फोटो सौजन्य pinterest  माझ्या लग्नानंतर काही आठवड्यांनी रवीच्या जवळच्या नातेवाइकांच्या लग्नाला आम्ही गेलो होतो. रवीच्या नातेवाईकांच्या लग्नात मी सुंदर दिसले पाहिजे अशी रवीचीचं खूप इच्छा होती.तिथं मला न पाहिलेले अनेक नातेवाईक असणार आहेत.त्यात मी कशी उठून दिसले पाहिजे अशी रवीची इच्छा होती.नटायला सजायला कुणाला आवडणार नाही?       मी गुलाबी रंगाची साडी, हलका मेकअप आणि माझ्या आवडीचं मंगळसूत्र घातलं होतं.रवीने मला तयार होताना पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं. "रचना, तू आज खूपच सुंदर दिसतेस.मला गर्व आहे की तू माझी बायको आहेस,"तो म्हणाला आणि मिठ्ठी मारली. त्याच्या या अतितायीपणाचा मला राग आला.माझं सारं मेकअप ही खराब होऊ शकला असता आणि साडी चुरगाळली पण असते.एक झालं माझं मन भरून आलं.नव-याच्या असल्या गोड हरकती कुणाला नको असतात?  "रवी, हे काय केलस? मी फक्त तुझीच आहे ना? मग इतका उतावीळपणा का?" मी लटकेच राग चेह-यावर पसरवला.त्याने माझा हात हलकेच दाबला,आणि चक्क गालावर ओठ...  माझं अंग शहारून आलं.मी त्याला लाडात येऊन गुद्दे घातले.तसा तो बाहेर पळाल...

नरकातील स्वर्ग – संजय राऊत यांचे कारागृहातील अनुभवकथन Narkatil Swarg by Snjay Raut

इमेज
  नरकातील स्वर्ग – संजय राऊत यांचे कारागृहातील अनुभवकथन   Narkatil Swarg by Snjay Raut लेखक: संजय राऊत प्रकाशक: New Era Publications प्रकाशन दिनांक: 17 मे 2025 प्रकार: आत्मकथन / मराठी राजकीय साहित्य मिट्ट काळोखाची अखेर नजरेला सवय होतेच. समाजाला आणि माणसांनाही. म्हणून कोणालाही मिट्ट काळोखाची भीती वाटणं काही कमी होत नाही. ज्या काळोखाची पुढे सवय होते, त्या काळोखाला अगोदरच आव्हान देऊन त्यात उडी मारणारी माणसं फार कमी असतात. मुळात ती माणसं तशीच जन्मत असतात की घडत जातात, हाही एक विवाद्य विषय आहे. संजय राऊत हा असाच एक माणूस. २०१४ साली भारतात फॅसिस्ट काळोखाची छाया पसरू लागली. २०१६ च्या मनमानी नोटबंदीने तो काळोख देशभर पसरवला, अधोरेखित केला. त्यानंतर भाजप संघप्रणीत राजवटीचे स्वमर्जीने स्लीपर सेल बनलेल्या अस्सल भारतीय गेस्टापो एजन्सीज, आयटी, ईडी, सीबीआय, एनएसए आणि एनसीबी यांनी सत्तापक्षाच्या राजकीय विरोधातल्या सर्व व्यक्ती, संस्था आणि राजकीय पक्ष यांना लक्ष्य बनवले. देशभर खोट्या आरोपपत्रांद्वारे विरोधातल्या व्यक्ती, शक्ती, उद्योगपती आणि पक्ष यांच्यावर लाखो पानांची आरोपपत्रं लिहिली ग...

झापूक झुपूक मराठी चित्रपट समीक्षा | Zapuk Zupuk Marathi Movie Review in Marathi | Suraj Chavan | Kedar Shinde

इमेज
  झापूक झुपूक : हास्य, हृदय आणि हिट संगीत यांचा परिपूर्ण मेळ..!! झापूक झुपूक मराठी चित्रपट   Suraj Chavan | Kedar Shinde झापूक झुपूक मराठी चित्रपट समीक्षा | Zapuk Zupuk Marathi Movie Review in Marathi | Suraj Chavan | Kedar Shinde प्रदर्शन तारीख : २५ एप्रिल २०२५ दिग्दर्शक : केदार शिंदे मुख्य भूमिका : सूरज चव्हाण, जुई भागवत, इंद्रनील कामत, मिलिंद गवळी प्रकार : रोमँटिक कॉमेडी ड्रामा कथासारांश: 'झापूक झुपूक' म्हणजे प्रेमाची गंमत "झापूक झुपूक" ही गावातील निरक्षर शिपाई सूरजची (सूरज चव्हाण) प्रेमकथा आहे. त्याला नव्या शिक्षिका नारायणी (जुई भागवत) वर प्रेम जडते, पण तिला इम्प्रेस करणं हे काही सोपं नसतं. प्रेमपत्र लिहिण्यापासून ते गावकऱ्यांच्या कुजबुजीपर्यंतचा प्रवास थट्टा-मस्करीतून उलगडतो. मात्र शिक्षिकेच्या भूतकाळातील गुंतागुंतीमुळे आणि तिच्या आमदार वडिलांच्या दबावामुळे गोष्टी वेगळ्या वळणावर जातात. Reel Star to Hero अभिनय: सूरज चव्हाणची चमकदार एंट्री हा चित्रपट सूरज चव्हाणसाठी अभिनयातील पहिलं पाऊल आहे, पण त्याची सहजता आणि नैसर्गिक अभिनय शैली डोळ्यात भरते. गावातील टि...